गडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’!

“स्वतंत्र होण्यासाठी विदर्भ आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही”, असा कबुलीजबाब देऊन भाजपचे वजनदार नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकाच वेळी अनेक बाबी मान्य करण्याचं धाडस अखेर दाखवलं आहे यात शंकाच नाही. गेली अनेक वर्ष स्वतंत्र विदर्भाला विरोध करतांना विदर्भातील संयुक्त महाराष्ट्रवाद्यांनी नेमका हाही मुद्दा मांडलेला आहे. संयुक्त महाराष्ट्रवादी, उच्च विद्याविभूषित, माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांनीही हे प्रतिपादन ठोस स्वरुपात, अगदी आंकडेवारीसह लेखी स्वरुपात मांडलेलं आहे. डॉ. जिचकार यांचं हे प्रतिपादन पुस्तकाच्या स्वरुपातही प्रकाशित झालेलं आहे.

ही चर्चा पुढे नेतांना नवीन वाचकांसाठी थोडीशी माहिती देतो – चाळीस वर्षांच्या पत्रकारितेतील २५पेक्षा थोडा जास्तच वर्षांचा काळ मी नागपूर-विदर्भात आणि विदर्भाच्या राजकारण तसंच सांस्कृतिक जीवनात सक्रीयतेने घालवलेला आहे. ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा एक वार्ताहर ते ‘लोकसत्ता’ सारख्या ख्यातनाम आणि विश्वासार्ह असलेल्या दैनिकाच्या नागपूर आवृत्तीचा संपादक असा माझा प्रवास या चार दशकांच्या काळात झालेला आहे. विदर्भाचा विकास आणि विकासाचा अनुशेष या संदर्भात विपुल लेखन केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे, विदर्भावर विकासाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे हे मान्य असलं तरी, मी संयुक्त महाराष्ट्राचा कट्टर समर्थक म्हणजे, पर्यायानं स्वतंत्र विदर्भाचा विरोधक आहे. पण, ते असो, मूळ मुद्दा असा की- महाराष्ट्राला जी वीज आणि कोळसा व अन्य खनिज संपदा विदर्भ पुरवतो त्या वीज आणि खनिज संपदेची जर बाजारभावाने विक्री केली तर विदर्भ राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकेल; त्या रकमेएवढाही निधी राज्य सरकारकडून विकास कामांसाठी विदर्भाला मिळालेला नाही असा एक लोकप्रिय युक्तीवाद कायम केला जातो पण, तो तथ्यहीन कसा आहे हे वारंवार सिद्ध करण्यात आलेलं आहे. मुळात जितकी वीज आणि खनिजे विदर्भाने उर्वरित राज्याला पुरवली त्याच्या मोबदल्यापेक्षा किमान चौपट तरी जास्त निधी राज्य सरकारने विदर्भावर खर्च केलेला आहे. शिवाय महाराष्ट्रातील ज्यांनी वीज वापरली त्या अशासकीय आणि खाजगी क्षेत्राने विदर्भातील हज्जारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे मात्र, मोबदला म्हणून तो कधीच गृहीत धरला जात नाही. (२०१२मधे वाचलेल्या एका बातमीनुसार नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यातील किमान ३० हजार लोक पुणे आणि नगर परिसरात नोकरी करतात.) ही सर्व प्रतिपादने या आधीही झालेली आहेत; प्रस्तुत लेखकानेही या संदर्भात विपुल लेखन व विदर्भवाद्यांचा व्यासपीठाचा वापर या प्रतिपादनासाठी अनेकदा केलेला आहे.

विदर्भवाद्यांचा आणखी एक भोंगळपणा म्हणजे, आर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम होऊ शकत नाही ही जर वस्तुस्थिती असेल तर स्वतंत्र राज्याची मागणी पूर्णपणे अतार्किक आणि अव्यावहारिक ठरते, कारण हे राज्य पहिल्या दिवसापासूनच भिकेचा कटोरा घेऊन उभे राहिल, हे विदर्भवादी कायमच डोळ्याआड करत आलेले आहेत. एकिकडे विकास झालेला नाही, विकासाचा अनुशेष वाढतच आहे असं रडगाणं गायचं, विकासाच्या प्रश्नावर विविध पातळ्यांवर लढे उभारायचे तरी अशा दुबळ्या विकसित स्थितीत स्वतंत्र राज्य सक्षम कसे काय ठरेल, या मुद्द्याला विदर्भवादयांकडून कायमच बगल देण्यात आलेली आहे. या संदर्भातला आणखी एक मुद्दा म्हणजे, राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार १९९५साली सत्तेत आलं तेव्हा काँग्रेसचे दत्ता मेघे, रणजित देशमुख प्रभृती नेत्यांनी विकासाच्या २४ निकषांवर शासकीय आकडेवारीचा आधार घेऊन आढावा घेतला असता मराठवाडा सर्वाधिक मागासलेला आणि त्यानंतर कोकणाचा नंबर होता; त्या अहवालाचा आता तर विदर्भ समर्थक उल्लेखही करत नाहीत!

स्वतंत्र विदर्भाच्या बाबतीत एक मुलभूत मुद्दा लक्षात घेतला पाहिजे- नागपूर महसूल विभाग आणि अमरावती (म्हणजे व-हाड) महसूल विभाग अशा दोन भागात विदर्भ विभागलेला आहे. यातील नागपूर विभागात काही प्रमाणात तर व-हाड भागात अत्यंत अल्प प्रमाणात स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा आहे ही वस्तुस्थिती असतांना या मागणीला संपूर्ण विदर्भाचा आणि तोही एकमुखी पाठिंबा असल्याचं भ्रामक चित्र निर्माण केलं जातं. मतदारांचा कौल हा निकष लावला तर; अलिकडच्या पंचवीस वर्षात जांबुवंतराव धोटे, नानाभाऊ एंबडवार, रणजित देशमुख किंवा बनवारीलाल पुरोहित यांच्यासारखे काही मोजके अपवाद वगळता काँग्रेस किंवा भाजपच्या एकाही नेत्यानं स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव मुद्दा घेऊन विदर्भात कोणतीही निवडणूक लढवलेली नाही आणि याच एका मुद्द्यावर निवडणूक लढणाऱ्या यापैकी एकाही नेत्याला अनामत रक्कम वाचवता यावी, एवढंही मतदान मिळालेलं नाही हे कटू सत्य आहे. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवणारे बनवारीलाल पुरोहित यांना लोकसभा आणि रणजित देशमुख यांना विधानसभा निवडणुकीत तर, स्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नातील राजधानीतल्या मतदारांनी- नागपूरकरांनीही साफ नाकारलेलं आहे! व-हाड भागात कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी असणाऱ्या शिवसेनेचे तीन खासदार आणि सहा ते आठ आमदार निवडणुकीत विजयी होतात ते वेगळ्या विदर्भाला विरोध करुनच, याचा विसर पडू देता कामा नये!

यापूर्वी अनेकदा नावनिशीवार लिहिलं आणि जाहीरपणे बोललो असल्यानं, विदर्भवाद्यांवर टीका केली की कोण-कोणत्या काँग्रेस आणि भाजप नेत्यांचे अभिनंदनाचे फोन येत, कोणाला ती टीका जाम आवडत असे, हे पुन्हा न उगाळता सांगतो, राजकीय आघाडीवर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा वापर कायम स्वार्थासाठी करण्यात आलेला आहे. २०१४चा अपवाद वगळता कायम कॉंग्रेसला पाठिंबा देणाऱ्या विदर्भातील एकाही काँग्रेस नेत्यानं स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी कधी स्वत:चं कोणतंही पद पणाला लावलेलं असल्याचं एकही उदाहरण नाही किंवा या मागणीसाठी पूर्ण झोकून देऊन (पक्षी : तेलंगनाचे के. चंद्रशेखर राव) कोणतीही चळवळ उभारलेली नाही; लोकसभा-विधानसभेची उमेदवारी आणि नंतर सत्तेचं पद मिळालं नाही की लगेच स्वतंत्र विदर्भाची आरोळी ठोकायची हाच आजवरचा काँग्रेसी पायंडा आहे! दत्ता मेघे ते रणजित देशमुख आणि विलास मुत्तेमवार ते विजय दर्डा असा हा कागदी वाघांचा आणि विदर्भाच्या मागणीचा स्वहितासाठी ‘बाणेदार’ वापर करुन घेण्याचा राजकारण्यांचा इतिहास आहे. अगदी तेलंगना राज्य अस्तित्वात आणण्याच्या निर्णायक हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर दिल्लीत सुरु झाल्या तेव्हाही विदर्भातल्या कॉंग्रेसच्या एकाही काँग्रेसी वाघाने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी कधी आग्रहाची स्वाभिमानी शेपटी पक्षश्रेष्ठींसमोर ताठ कशी केलेली नव्हती, याचा प्रस्तुत पत्रकार साक्षीदार आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, इकडे अन्याय झाल्याच्या आरोळ्या ठोकायच्या आणि तिकडे मुंबई-पुण्यात गुंतवणूक आणि घरं करायची, ही तर बहुसंख्य काँग्रेस नेत्यांची आवडती ‘कार्य’शैली आहे.

राष्ट्रीय आणि राज्य कॉग्रेसलाही वेगळा विदर्भ नकोच आहे कारण राज्यातील सत्ताप्राप्तीसाठी शेवटी विदर्भातील संख्याबळ कामी येतं असा मामला आहे. संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाल्यापासून कॉंग्रेसला सत्तेत येण्यासाठी विदर्भाने कायमच कशी मदत केलेली आहे, याची साक्ष प्रत्येक निवडणुकीतील निकालाचे आकडे देतातच. १९७७च्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाची लाट असूनही उर्वरीत महाराष्ट्र कॉंग्रेसच्या तर विदर्भ मात्र इंदिरा कॉंग्रेसच्या बाजूने असंच चित्र होतं. जनता पक्ष ९९, काँग्रेस ६९ आणि इंदिरा काँग्रेस ६२ जागा, असा कौल राज्याने तेव्हा दिला होता; म्हणूनच एप्रिल १९७७मधे कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि इंदिरा कॉंग्रेसचे विदर्भातील नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले होते. (त्यानंतर जुलै १९७८मधे महाराष्ट्राच्या राजकारणातला गाजलेला ‘खंजीर प्रयोग’ सादर झाला आणि वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं!) मोदी लाटेतल्या २०१४च्या निवडणुकीतही विदर्भानं भरघोस पाठिंबा दिल्यानेच विधानसभेत भाजपला १२२ हा आकडा गाठता आलेला आहे, हे लक्षात घ्यायला हवं. महत्वाचं म्हणजे, महाराष्ट्राचे तुकडे केल्याची पावती आपल्या नावे फाडण्याची काँग्रेस आणि भाजपची मुळीच तयारी नाही कारण असं काही केलं तर, उर्वरीत महाराष्ट्रात हे दोन्ही पक्ष नामशेष होतील इतका संतापाचा भडका तीव्र असेल याची जाणीव या दोन्ही पक्षांना आहे. या दोन्ही पक्षांना जर स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा एवढं पुळकाच आहे तर मग या दोन्ही पक्षांच्या किमान विदर्भातील सदस्यांनी तरी एकजूट दाखवत वेगळ्या विदर्भाचा किमान अशासकीय ठराव तरी विधानसभेत का मांडला आणि लावून धरत सरकारला का अडचणीत आणलेलं नाही? या प्रश्नाचं उत्तर कोणीही देणारच नाही, याचं गुपित उघड आहे!

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याबाबत वैदर्भीय जनतेचा कॉंग्रेसवर असणारा विश्वास उडालेला होता, कारण विकासाचा अपेक्षित वेग तर सोडाच विकासाच्या अनुशेषाचाही अनुशेष अशी स्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळे काँग्रेसबद्दल तीव्र नाराजी होती. म्हणूनच २०१४च्या निवडणुकीत विदर्भवादी मतदार भाजपच्या बाजूने वळला. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी वेगळ्या विदर्भवाद्यांना आशेचं गाजर दाखवलं. मात्र सत्तेच्या उबदार खुर्चीत बसल्यावर त्या गाजराचा शिरा करून भाजपचे लोक खात असल्याचं सध्याचं चित्र आहे. एक मात्र नि:संशय खरं, विकासाचा जो वेग वैदर्भीयांना अपेक्षित होतां तो गाठून देण्यात म्हणण्यापेक्षा विकासाची गंगाच विदर्भाकडे वळवण्यात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना गेल्या तीन वर्षात यश आलेलं आहे यात शंकाच नाही. म्हणूनच आता आधी विकास मग स्वतंत्र राज्य अशी उपरती भाजपला झालेली आहे. स्वतंत्र विदर्भाबद्दल आज गडकरी यांनी घुमजाव केलंय, उद्या भाजपचे अन्य नेते त्या सुरात सूर मिसळून विकासाचा राग आळवू लागतील, हे स्पष्टच आहे.

अशा परिस्थितीत स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचं काय, या प्रश्नाचं उत्तर आहे- या मागणीसाठी विश्वासार्ह नेतृत्वाखाली एक व्यापक अराजकीय चळवळ उभी राहिली तरच आता स्वतंत्र विदर्भाचं स्वप्न साकारण्याची काही शक्यता आहे. तेलंगना राज्याच्या मागणीसाठी उभारलेल्या चळवळीला पूर्णपणे झोकून देणारं के. चंद्रशेखर राव यांच्यासारखं नेतृत्व विदर्भाला हवं आहे. हे नेतृत्व देण्याची क्षमता विदर्भातील कोणाही भाजप किंवा कॉंग्रेसच्या नेत्यात नाही; त्या आघाडीवर राष्ट्रवादीला कोणतीही अंधुकसुद्धा संधी नाही आणि शिवसेनेचा प्रश्नच निर्माण होतं नाही. असं नेतृत्व मिळण्याच्या बाबतीत अनेकजण ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांच्याकडे आशेने बघतात. विश्वासार्ह, संघटन कुशल आणि नि:स्वार्थ असले तरी श्रीहरी अणे हाही विदर्भवाद्यांचा एक भाबडेपणाच आहे. श्रीहरी अणे यांनी मुंबईत राहून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची चळवळ खऱ्या अर्थानं व्यापक लोकचळवळ करणं म्हणजे, उंटावरून शेळ्या हांकण्याचा प्रकार आहे.

-थोडक्यात काय तर, स्वतंत्र विदर्भ म्हणजे तूर्तास तरी ‘मुंगेरीलाल के हसींन सपने’ आहेत आणि कोणाचाही स्वप्न बघण्याचा अधिकार हिरावून घेता येत नसतो…च!

(छायाचित्र सौजन्य- गुगल)


-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | [email protected]
============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट

 • Hemant Gadkari ….
  वेगळा विदर्भ म्हणजे फालतुपणा, विदर्भ हा मुळात एकदम अविकसित नाहीच, तुकडे करून विकास होतो हे मूर्खपणा चे लक्षण आहे, सरकार ची नियत साफ असली तर विदर्भ अजून विकसित होईल त्या करिता महाराष्ट्रा चे तुकडे करण्याची गरज नाही, आतातर विदर्भाचा माणूस मुख्यमंत्री आहे करा वाट्टेल तेवढा विकास रोखलं कोणी आहे

  • Sachin Dixit · ….
   किमान मागील 15 वर्ष सरकारचे पंचशील पुण्यातच गुंतलेले होते,आता उशीर झाला.हाय कमांड ला टाळून 15 वर्ष नाईक ह्यांना जे जमले नाही ते फडणवीस कसे जमावतील? दोन चार प्रकल्प ठीक आहे पण त्यांचे टार्गेट हे ठरलेलं असणार
   सर म्हणतात त्याप्रमाणे साधे रियल इस्टेट इन्व्हेस्ट करायचे तर मुंबई पुणे पट्टा शिवाय पार्याय नाही.नागपूर ला किती ही मेट्रो आलिया तरी हे असे wealth builtup नाकारणे शक्य होत नाही.सरकारची नियत साफ असणे ही मूक मोर्चा काळात शक्य राहिलेलं नाही त्यामुळे वेगळे करून सरकारला पर्याय ठेवू नये.त्याचवेळी विदर्भ पेक्षा पश्चिम महाराष्ट्र वेगळा केला तर राज्याचे खूप भले होईल, असे मला सुचवायचे होतो

 • Deven Kapse ·….
  @प्रवीण बर्दापूरकर सर आपले विचार पटले. या लेखाची मी वाट पाहत होतो. स्वतंत्र विदर्भाबद्दल माझी देखील हीच भूमिका राहिली आहे आणि असेल.
  Image may contain: textImage may contain: text

 • Shrikant Umrikar ….
  मला तुमचा लेख आवडला पण विचार पटला नाही.. GST लागू झाल्यावर बरेच संदर्भ बदलले आहेत.. पूर्वीची राज्याची जी संकल्पना होती ती आता बदलावी लागणार आहे.. विदर्भ केला काय आणि नाही केला काय तसेही प्रशासना साठी रचना बदलावी लागणार आहेच.. मुळात सरकारचे स्वरूपच बदलत आहे.. रस्ते वीज पाणी रेल्वे हे विषय आता एखाद्या प्रदेशापुरते मर्यादित नाही राहू शकत.. सगळ्या देशाची बाजारपेठ एक करायची झाल्यास राज्याच्या सीमा फारश्या महत्वाच्या नाही ठरत.. तंत्रज्ञानाने खूप बदल होत चालला आहे.. ज्याची कोणी दाखलच घ्यायला तयार नाही..आसो पण तुम्ही आतिशय परखडपणे सध्याचे जे विदर्भवादी आहे त्यांची पोल खोल केली हे बरे झाले.. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने जी मागणी करत आहोत ती फक्त वेगळ्या विदर्भाची नाही.. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि कोंकण अशी विदर्भासह ६ राज्ये असावीत अशी ती मागणी आहे…

  • Arunoday Bhatkar ·….
   मुंबई कोकणातच येते.

   • Shrikant Umrikar….
    Shrikant Umrikar नाही… आम्ही मांडणी करताना मुंबई आणि त्याला लागून असणार्‍या ९ मनपा असा एक घटक मानतो… ज्याला मुंबई राज्य म्हणता येईल…

    • Padmanabh Pathak Shrikant. ….
     सद्यस्थितीत तू म्हणतोयस ते अगदी योग्य आहे. विशेषत: 2016 नंतर.

 • Suresh Bhusari ….
  sir badhiya

 • Kapil Idde ….
  जय विदर्भ

 • Ratnakar Mahajan ….
  गडकरी हेच पूर्वी खासगीत म्हणत असत ; आता सत्तेने त्यांना भानावर अाणले आहे .

  • केवळ नितीन गडकरीच नाही तर गोपीनाथ मुंडेही ! मी हे अनेकदा लिहिलं आहे , बोललोही आहे .

 • Shrikant Deshpande ….
  माफ करा सर, पण श्रीनिवास खांदेवाले सर, यांनी वेगळ्या विदर्भ निर्मितीसाठी जे आर्थिक निकष लावले ते गृहीत असतील तर ते चुकीचे आहेत हे पुढे सप्रमाण सिद्ध झाले, मुळात वेगळा विदर्भ हा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, केवळ खनिज, व अन्य वन्य संपत्तीच्या बळावर वेगळे राज्य आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होणे शक्य नाही !

  • Shrikant Umrikar ….
   आर्थिक विचार करून राज्य निर्माण केले असे एक तरी उदाहरण सांगा?

  • Padmanabh Pathak ….झारखंड.

   • Shrikant Umrikar ….उत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड, तेलंगण यापेक्षा विदर्भ काय वेगळा आहे?

 • Sachin Dixit · ….
  खूप चुका आहेत तुमच्या ह्या पोस्ट मध्ये. विदर्भ आज(पर्यंत) जसा आहे तसा आर्थिक दृष्ट्या संपन्न नसेल. पण त्या प्रमाणे छत्तीसगढ,हरियाणा किंवा सीमाआंध्र पण नव्हते, उत्तर पूर्व ची राज्ये आपण विशेष बाब म्हणून सोडूयात आणि त्यावेळचा झारखंड पण अति मूल्यवान खनिज असे कागदोपत्री मनुयात.त्यामुळे वेगळा करतानाची आर्थिक स्थिती आणि वेगळा झाल्यावर ची शक्यता ह्याचा इतर राज्यांना लागू केलेला तर्क आपण इथे का लावत नाही ह्याचा विचार झाला पाहिजे. इथे पुण्यात खराडी विकसित व्हायचे तेव्हा हिंजेवडीत 8 वर्ष एकही प्रकल्प आलाच नाही त्यावरून शक्यतेचा खेळ समजावा. खुद्द औरंगाबाद 95 वेळी सगळ्यात वेगवान वाढीचे शहर होते,मग ह्या विकासाचे चाकण कुठे रुतले आणि त्याच वेळीच 5स्टार शेद्रा आणि बुटीबोरी चे dynamics आपण कसे विसरता. ह्याच ध्यागला धरून तिकडेच 30हजार लोक इकडे कामाला आहेत हे वाक्य थोडे कुजकट वाटते(आपला हेतू तसा नसणारच). साधे इंजिनेरिंग प्लेसमेंट बघितले तर विदर्भातील कॉलेज चे आकडे अधिकच वाईट झालेले दिसतील,ह्याला करण lifestyle साठी पुण्याचे कॉलेज निवडणे,पण ह्यामुळे प्लेसमेंट,कॉगेज रँकिंग आणि परत ऍडमिशन असा विशीयस सायकल झालेले आहे.नांदेडचे गुरुगोविंद चा cutoff कोथरड च्या MIt खाली आहे,हे सगळे सत्य,शक्यता आणि संकल्प ह्याचे खेळ आहेत हे विसरू नये आणि IT सारखे बिनभडवली उद्योग फक्त sez आणि विदयार्थी बघून येतात….
  मुळात औद्योगिक विकास हा घडवून आणावा लागतो हे आजचे sez सत्य आपण विसरलात का ही शंका येते, ती का, त्यासाठी नायडूचे आंध्रतील धोरण किंवा उत्तर कर्नाटक मधील फासलेला औद्यीगिक विकास बघावा.साधा अकोला वाशिम खचिगुडा रेल्वे मार्ग ब्रॉड करताना शिवसेनेच्या महिला खासदार ते तेलंगण मधील प्रतिनिधी ह्यांनी कापसमुळे वाढलेले potential असा अहवाल मांडला, आज त्याच मार्गामुळे बंगलोर ते दिली डायरेक्ट रेल्वे वऱ्हाडातून जाते आणि पूढे खांडवा मार्ग पूर्ण झाला की भुसावळ आणि नागपूर असे उत्तर दक्षिण रेल्वे कॉरिडॉर मध्ये वर्हाड जाऊन बसेल, विकासाचे कुठले मॉडेल हे नाकारते?आणि ह्या हिशेबाने स्वतंत्र राज्य झाल्यावर 5 वर्षात काहीएक सवलतीच्या सेझ आणून हेच 30 हजार लोक घरच्या विकासाला जोडता येतील वगैरे. लोणार दुर पडते पण भुलेश्वर आणि खिद्रापूर काय छान आहे,इथून सुरुवात असल्याने पर्यटन आणि फूड प्रोसेसिंग आणि सौर उतपादन मधील पोटंटशील 1990 च्या अभ्यासात दिसत नाही. कुणी ठरवले तर,तुमचा -माझा मेहेकर चा बालाजी एकटा अति श्रीमंत संस्थान होऊन वऱ्हाडचा भले करेल…
  त्याचवेळी विदर्भापेक्षा कोंकण आणि मराठवाडा कमी विकसित झाले ही तेव्हाची आकडेवारी आणि अलीकडील राजकीय अ-संतुलन ह्याचा विचार आपण मांडला की विदर्भातील तेव्हचा इन्फ्रा अनुशेष आणि आजचे औद्योगिक मागासले पण विरुद्ध हे दोन प्रदेश अशी मांडणी तार्किक मांडणी होईल आणि त्यावर आपण विवेचन केलेत तर बरे होईल. बाकी राजकीय लॉलीपॉप इत्यादी बरोबर. विदर्भ वेगळा होऊ नये करण झालाच तर ते एक हिंदी भाषी राज्य असेल… पण त्याची अशी गरिबीची करणे अस्थानी आणि आजच्या अर्थ चौकटीत गैरलागू आहेत ,किंबहुना ह्याच आऊट ऑफ सिंक विथ टाइम विचारसरणी मुळे अजूनही विदर्भ (आणि आता मराठवाडा) मगासच राहील असे माझे म्हणणे आहे.

 • Vijay Nagare ·….
  वेगळा विदर्भ घेण्यापेक्षा संपुर्ण महाराष्ट्र आम्ही मुखमंत्री महोदयांना दिला आहे.

 • Sachin Dixit ·….
  विदर्भ पेक्षा पश्चिम~सह्याद्री महाराष्ट्र वेगळा केला तर राज्याचे खूप भले होईल

 • P Gade ·….
  लेख मुद्देसूद नाही. आरडाओरडा फार.

 • Suresh Narayan Khedekar ….
  सर, खूप अप्रतिम लेखन…

 • Milind Jiwane ….
  सरं, द्यावे ठोकोनी हि शैली आपल्या सारख्या भिडस्ताला शोभत नाही. शिवसेनेचे उमेदवार तरी विदर्भात महाराष्ट्र प्रेमा मुळे नक्कीच निवडुन येत नाही .भिकारी विदर्भ महाराष्ट्रा येण्यापु्र्वी दगडांच्या देशाच्या बर्यापैकी पुढेचं होता ही आकडेवारीत आहे बरं . पाण्यासाठी भांडणारी औलाद हि महाराष्ट्राची खरी ओळख . नोकरीनीमीत्य बराच काळ प. महाराष्ट्राची मुशाफीरी चालु आहे त्यामुळे ओरबडणे हाच महा(राष्ट्रीय) स्थायी भाव आहे हे लक्षात एव्हाना यायला लागलंय अपमान पचवतां येत नाही म्हनुण वैदर्भीय शेतकरी गळफास जवळ करतो इतका वैदर्भीय समाज संवेदनशील आहे असं शरद जोशींच निरीक्षण आहे .गारद्याची वंशावळी प महाराष्ट्राची .आम्हालाही दरोडेखोर कुनीतरी म्हणावं असं खुप वाटत पण स्व:त ची लाज म्हनुण काही असते. नं मराठवाडी गुलामी मानसीकता आमच्यात नाही हे बघुन थोडं स्वतं बद्दल बर वाटतं तुमच्या महाराष्ट्राचे वर्णन काय करू तुमच्या ब्लागंची भट्टी या शुक्रवारी तरी जमली नाही म्हणून मी पण थोड्यात संपवतो तुम्ही अामच्या सारख्यां भिकारी प्रांताला सोडुन अमेरिके पेक्षाही पुढे जावं हि मनस्वी इच्छा आहे

  • प्रिय मिलिंद जीवने ,
   बाकी सगळं ठीक आहे पण , मी भिडस्त कसा काय बुवा ?
   भिडस्तपणासाठी मी ओळखला जात नाही आणि भिडस्त असतो तर इतकं स्पष्ट लिहिलं असतं का ?
   असो !

   • Shrikant Umrikar ….
    तुम्हाला काय पश्चिम महाराष्ट्राबद्दल बोलायचे आहे ते बोला.. पण मराठवाडा काय आणि कसा आहे हे जाणून घेतल्या शिवाय टिपणी करू नका.. विनंती आहे.. विदर्भ वेगळा होणार आसेल तर आम्ही मराठवाडा घेतल्याशिवाय राहणार नाही.. तेंव्हा ह्या संघर्षात निदान तुम्ही तरी आम्हाला तुमच्या विरोधात जावे आसे वागू बोलू नका.. एकदा सातवाहनाच्या काळात पैठण आणि नंतर देवगिरी राजधानी राहिली आहे हे विसरू नका.. मराठवाड्याला गुलाम म्हणत आसताना हे लक्षात ठेवा.. १९३७ ते १९४८ इतकी ११ वर्षे निजामा विरुद्ध लढून आम्ही स्वातंत्र्य मिळवले आहे..

    • P Gade ·….
     जीवने साहेब,
     शिवसेना विदर्भात संपल्यासारखी आहे. पण राका जशी विदर्भाचे प्रकल्प पळवायची तसे सेनेने सत्तेत असताना केले नाही. खरे तर विदर्भ वेगळा होणे हे भाजप सोडून अन्य पक्षांच्या हिताचे आहे, त्यांचा दबदबा वाढेल. फडणवीस ज्या तर्‍हेने राज्य करताहेत, अनुशेष काही प्रमाणात तरी भरून निघेल. असो. वेगळे झाल्यावर छत्तीसगढचा तरी विकास होताना दिसतोय.

    • प्रिय श्रीकांत उमरीकर ,
     इसापनीतीतील कथा माहिती आहे नं ?
     सध्या चर्चा सुरु आहे ती विदर्भावर आणि तीही स्वतंत्र विदर्भावर .
     मराठवाड्याचा नंबर यायचाय अजून .
     वेळ आल्यावर त्या विषयावरही बोलू यात की .

 • Prabhakar Kondbattunwar ….
  आमचे मित्र आणि सहव्यवसायी प्रविण बर्दापूरकर यांची भूमिका सातत्याने विदर्भविरोधाचीच राहिली आहे. त्यांच्या बाजूने असलेल्यांची मतेही वाचली. लहान राज्याची संकल्पना भाजपाने सातत्याने यापूर्वी घेतली. आज सत्तेसाठी भाजपा विदर्भाला विसरली हे खरेच आहे. विदर्भ मिळवून देऊ असे भाजपाने सांगितले होते म्हणूनच विदर्भवाद्यांनी भाजपाच्या झोळीत मते टाकली. पार्टी विथ डिफरन्स या बिरूदाला ती जागेल ही आशा फोल ठरली. याचा अर्थ विदर्भ राज्याची मागणी चुकीची आहे असे नव्हे.
  विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात गेल्या आठ दहा वर्षात प्रसिद्ध अर्थतज्न डॉ. खांदेवाले यांची पुस्तिका प्रकाशित झाली. त्यानंतर माझा स्वत:चा ” आरसा विदर्भाचा” हा संदर्भग्रंथ प्रकाशित झाला. त्यानंतर नावाजलेले कायदेपंडित श्रीहरी अणे यांचा ग्रंथ बाजारात आला. किती विदर्भविरोधांनी आरसा विदर्भाचा वाचले आहे? किंवा खांदेवाले सर आणि अणे साहेबांचे पुस्तक वाचले आहे? विदर्भ राज्याची मागणी समजून घेण्यासाठी हे साहित्य वाचण्याची गरज आहेच.
  डमरू वाजवून प्रेक्षकांची गर्दी जमविणे ही उपजत कला आम्हाला अवगत नाही किंवा त्याबाबतीत आम्ही आजही मागास आहोत असे माझे स्वत:चे मत आहे.
  पत्रकारीतेतील अनेक चढउतार मी अनुभवले आहेत. गल्ली ते दिल्ली , थेट काश्मिर सीमेवरील कारगीलचा 1999चे युद्ध ( घुसखोरांना पिटाळण्यासाठी भारताने केलेली लष्करी कारवाई, असे माझे मत) मी पाहिले आहे. वार्डातील नेत्यांना मंत्री , मुख्यमंत्री होताना पाहिले आहे. बातमी छापून यावी म्हणून त्यांनी दाखविलेली सलगी अनुभवलेली आहे. विलासराव देशमुख मित्र होते. आज फडणविसही मित्र आहेत. त्याचा गवगवा मी करीत नाही .दूरून डोंगर साजरे.
  विदर्भाविषयी नेत्यांच्या भूमिका काय आहेत याची थोडीफार जाण आम्हाला आहे. झारखंडसाठी झालेला जनलढा माहीत करून घेतला पाहिजे. छत्तिसगढ न मागताच मिळाले. हे विसरता येत नाही.
  विदर्भविरोधकांना एक विनंती आहे. त्यांनी त्यांच्या सोयीने कुठेही वैचारिक चर्चासत्र वा वादविवाद आयोजीत करावे. मते मांडावीत. विदर्भवाद्यांनाही बोलवावे. तसे झाल्यास त्यांनाही विदर्भाची मागणी समजेल.

  • प्रिय प्रभाकरपंत ,
   ती तिन्ही पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि मी ती वाचलेली आहेत !
   बाकी तुझाच काय , अन्य कुणाचाही प्रतिवादाचा हक्क मी कधीच नाकारलेला नाहीये .

 • Rajesh Kulkarni ….
  अणेसाहेबांच्या अाजोबांची अत्ृप्त इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त विदर्भाच्या त्यांच्या मागणीला काही अर्थ नाही.
  मागासलेपणाची ओरड होते म्हणजेच पुढारी बिनकामाचे होते असे नाही का? शिवाय उद्या अमरावतीवाल्यांनी नागपूरकरांवर तोच अारोप करणे शक्य नाही का? तेव्हा त्यात काही दम नाही. गडचिरोलीहून मुंबईला येण्यात केवढा वेळ जातो हे विचारले जाते. कोणत्या कामांसाठी मुंबईला हेलपाटे घालावे लागावेत याबाबत डिसेंट्रलायझेशन केले जात अाहे.
  विदर्भ अापल्या पायावर उभा राहू शकेल का असा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. कारण मी म्हटले तसे वैयक्तिक कारणापोटी भावना भडकवू पाहणारे अणेसाहेब म्हणतात की अामचे अाम्हाला वेगळे होऊ द्या, उभे राहण्याचे अाम्ही पाहू. तुम्ही काळजी करू नका.

 • Rohan Kamble ….
  Koni kahi mnu dya aaple rajye VIDHRBA bs vishye sampla

 • Jaypalsing Shinde ….
  CHUNAVI JUMLA fir se chunav aanepar dohraya jayega.

 • Hemant Supekar….
  विस्तृत आणि योग्य विश्लेषण , स्वतंत्र विदर्भ ?
  (shared a post to the group: वंजारी समाज युवा परिषद महाराष्ट्र.)

 • ‘स्वतंत्र विदर्भ’ म्हणजे काय रे भाऊ?

  दिवसभराचे कामकाज आटोपून आपल्या घरी निघालेल्या एका मध्यमवर्गीय पांढरपेशा वैदर्भीय कर्मचाऱ्याला मी विचारले – ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हायला पाहिजे का?’ एखादा मनोरुग्ण भेटावा अशा तऱ्हेने माझ्याकडे बघत तो म्हणाला ‘‘स्वतंत्र विदर्भ म्हणजे काय रे भाऊ? महाराष्ट्रापासून विदर्भ जर वेगळा झाला तर नक्की कोणाचे भले होणार भाऊ? केवळ कागदोपत्रीच असणाऱ्या रस्त्यांचे की अस्तित्वात असलेल्या रस्त्यांमधील लोणार सरोवराच्या आकाराशी स्पर्धा करणाऱ्या खड्ड्यांचे? ग्रामीण भागातील जीवघेण्या पाणी टंचाईने हैराण झालेल्या जनतेचे की कर्जाच्या वरवंट्याखाली चिरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे? ग्रामपंचायतीपासून तर महाराष्ट्राच्या उपराजधानीपर्यंत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे, की त्याला सक्रीय मदत करणाऱ्या पुढाऱ्यांचे? माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला वेगळ्या विदर्भाशी काहीही देणेघेणे नाही. माझ्यासारख्या असंख्य वैदर्भीयांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे एवढीच माझी राज्यकर्त्यांकडून माफक अपेक्षा आहे.’’ असं म्हणून काही क्षणातच तो आपल्या घराकडे चालता झाला. त्याने माझ्यावर केलेल्या प्रश्नांच्या भडिमारामुळे मी अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला ‘विदर्भ खरंच स्वतंत्र झाला तर त्यामुळे नक्की कोणाचे भले होईल?’

  विदर्भातील जनतेच्या मतांचा अत्यंत प्रामाणिकपणे कौल घेतला तर वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी नाही हे स्पष्ट होईल. असं असताना ‘स्वतंत्र विदर्भ’ ही नक्की कोणाची व कशासाठी मागणी आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे ही जनतेची नाही तर पराकोटीच्या लोभी, स्वार्थी व अत्यंत सत्तापिपासू नेत्यांची मागणी आहे. वैदर्भीय जनतेच्या दुर्दैवाने महाराष्ट्रापासून विदर्भ जर वेगळा झालाच तर त्याचे काय भवितव्य असेल याची ही छोटीशी झलक.

  १. श्रेय घेण्याच्या वादातून मिहान प्रकल्पाच्या प्रगतीत खीळ घालण्यासाठी अहमहमिकेने भांडणारे कर्तृत्वशून्य नेते विदर्भातील एकही प्रकल्प यशस्वी होऊ देणार नाहीत.

  २. विदर्भातील गरीब शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये हडपून साखर कारखाने लिलावात काढणारे दिवाळखोर नेते पुन्हा नविन उत्साहाने साखर कारखाने व सूतगिरण्या उभ्या करून शेतकऱ्यांना पूर्णतः नागवतील व अफाट माया जमवतील.

  ३. पेन्शनीत निघालेले, अडगळीत पडलेले, व मतदारांनी दूर सारलेले नेते स्वतःची ‘सोय’ लावण्यासाठी राज्यकर्ते बनून वैदर्भीय जनतेच्या उरावर बसतील. अशा नेत्यांना विदर्भाच्या भल्याचे काडीचेही सोयरसूतक नसेल याचा मुद्दाम उल्लेख करण्याची गरज नाहीच!

  ४. विदर्भातील सर्वसामान्य जनतेला आंदोलने करायला व पोलिसांच्या लाठ्या खायला लावून वेगळ्या विदर्भाचे श्रेय स्वतः लाटत हे लोकप्रतिनिधी राज्य करण्याच्या बहाण्याने अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून अफाट संपत्ती गोळा करतील व आधीच अस्तित्वात असलेल्या त्यांच्या साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करतील.

  ५. एकूण लोकसंख्येत तब्बल ६५ टक्के वाटा असलेल्या शेतकऱ्यांना वेगळा विदर्भ नव्हे तर सन्मानाचं जीणं हवं आहे याचा स्वार्थी नेत्यांना जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा खूप उशीर होऊन गेलेला असेल.

  ६. ‘एकाही नेत्याला एकही पैसा खर्च करण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र विदर्भाचा कारभार एखाद्या खाजगी कंपनीसारखा कॉर्पोरेट पद्धतीने चालविल्या जाईल’ असं जर विदर्भातील नेत्यांना स्पष्ट शब्दात बजावलं तर स्वतंत्र विदर्भासाठी अत्यंत उत्साहाने रस्त्यावर उतरणारे हेच अप्पलपोटे नेते सर्व काही विसरून जनतेला विचारतील – ‘‘स्वतंत्र विदर्भ म्हणजे काय रे भाऊ?’’

  (जन्म, शिक्षण, नोकरी, व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने तब्बल ४५ वर्षे विदर्भात आलेल्या माझ्या अनुभवांवर आधारित.)

  श्रीकांत पोहनकर
  98226 98100
  [email protected]

 • P Gade ·….
  महाराष्ट्र खूप मोठा आहे. छोट्या राज्याचा प्रयोग तसा यशस्वी आहे. छत्तीसगड निश्चित प्रगत झाला आहे. उत्तर प्रदेश चे ही विभाजन आवश्यक आहे

 • Atul Deshpande ·….
  Smaller states is the key to faster development. When younger brother leaves his father’s home, he works harder for growth.
  Numbers (income and expenditure)does not necessarily prove that seperate Vidarbha will no be self sufficient.

 • Anand Manjarkhede ….
  नवीन राज्य आयोग लोकसंख्या या निकष वर गठित करून छत्तीसगढ़, उत्तराखंड, झारखंड, तेलंगाना अशे येता 10 ते 20 वर्षात होईल अशे वाटते.

 • Mandar Bhalerao

  Praveenji
  While I agree that no one cares about seperate Vidarbha, is there any other way to compensate for lack of development and political will shown towards Vidarbha? Today since CM and union minister is from Nagpur, it is getting some attention and drawing some investors but once BJP loses power and again some west Maharashtra leader becomes CM what is the guarantee that Nagpur will get the attention it deserves.
  You say 30k people are working in Pune. The figure is absurdly understated. It has to be in lacs. Every kid who graduates from Vidarbha has to move to Pune or Mumbai for employment.
  You say Vidarbha has got atleast four times more funds than the resources it has provided. If the government talks like this, then who is responsible for developing backward areas? God? This argument is not only utterly ridiculous but also almost insulting.
  Lastly about talent migration. Today most of people working in Pune are migrants. At the beginning of IT revolution had Nagpur been given its fair share of political will, it would have attracted​ investors and today Vidarbha may have been sustainable.
  Before evaluating economic feasibility of Vidarbha, this background has to be considered.
  As long as decades of development backlog persists, Vidarbha as you say is mungerilal ke sapne.

 • P Gade · ….
  महाराष्ट्र खूप मोठा आहे. छोट्या राज्याचा प्रयोग तसा यशस्वी आहे. छत्तीसगड निश्चित प्रगत झाला आहे. उत्तर प्रदेश चे ही विभाजन आवश्यक आहे

  • Hemant Gadkari ….
   छत्तीसगड चा रायपूर थोडं सोडल्यास कुठला भाग विकसित आहे? काहीही बोलायचं गेले होते का कधी पूर्ण छत्तीसगड मध्ये कांकेर, राजनांदगाव, दंतेवाडा, बस्तर, सुकमा, व अन्य भागात जा दाखवा विकास आहे का? रायपूर मध्ये थोडं सिमेंटीकरण झालं देशातील बहुतांश छोटी राज्य अविकसित आहेत , तसेच प्रत्येक छोटं राज्य काहींनाकाही प्रॉब्लेम फेस करीत आहे, या उलट गुजरात मध्ये थोडीशी विकासाची पाउले पडली त्यांनी नाही सौराष्ट्र , कच्छ असे तुकडे केले, शेवटी कुठल्याही भागाचा विकास होण्यासाठी सरकार व तेथील अधिकारी यांची नियत साफ पाहिजे, व जनता जागृत पाहिजे तेव्हा होतो विकास त्याचा भौगोलिक परिस्थिती छोटी की मोठी यांचेशी काहीही संबंध नसतो .
   जशी खांदेवलेची आकडेवारी आहे न तशीच अखंड महाराष्ट्र प्रेमी डॉ श्रीकांत जिचकार यांचीही आकडेवारी बघा

   • P Gade ·….

    http://www.indiaspend.com/…/jharkhand-uttarakhand-the…

    Jharkhand, Uttarakhand & Chattisgarh; The Post Split Growth…
    Former Uttar Pradesh Chief Minister Mayawati…

    • Hemant Gadkari ….
     ते विदर्भातुन निघणाऱ्या वृत्तपत्रा चे मालक (विशिष्ट जातीचे) हे विदर्भाच्या बाजूने आहे म्हणून तो विषय पेपरमध्ये येतो, अन्यथा राजकीय बेरोजगारांच्या या चळवळीला कोणी विचारत नाही हा विषय सम्पला आहे

     • P Gade ….
      तुम्हाला प्र्गातीची माहिती हवी होती. वर दिलेली आहे. ती चूक आहे का?

     • Hemant Gadkari ….
      गाडे , अशी फालतु प्रोफाइल मी खूप पाठवू शकतो

     • P Gade ·….
      planning commission डाटा आहे.

     • Hemant Gadkari ….
      100% चूक आहे मी स्वतः या सर्व भागात गेलो आहे वास्तव्य केले आहे

     • P Gade · ….
      निश्चित गरीबी आहे. पण ती आधीच्यापेक्षा अधिक वेगाने हातात आहे असे आकडे म्हणतात.

     • Hemant Gadkari अश्या डाटा वर आपण विश्वास ठेवला तर भारत जगातील सर्वात विकसित राष्ट्र वाटेल गाडे साहेब

     • P Gade · ….
      मी हे पाहिले किंवा मी ते पाहिले यापेक्षा डाटा महत्वाचा. प्लॅनिंग कमिशन बरेच कष्ट करून डाटा गोळा करते. कुठल्याही पॉजिटिव डाटा साठी गोळा करणार्‍याला पुरावे लागतात.

     • Hemant Gadkari ….
      वस्तुस्थिती बघणं कसला डाटा घेऊन बसला गेला का कधी दंतेवाडा, सुकमा भागात तसेच आसाम, ओरिसा, मेघालय, बिहार, झारखंड मध्ये

     • P Gade · ….
      तुलना अशी आहे की जर छत्तीसढ वेगळे झाले नसते तर अधिक बर्‍या स्थितीत असते काय?

     • Hemant Gadkari ….
      गाडे जी तिथली परिस्थिती वेगळी होती आपल्या कडे तुकडे करायची गरज नाही .
      ही केवळ राजकीय अतृप्त आत्मा असणाऱ्या लोकांची मागणी आहे

     • P Gade ·….
      माझे मत असे आहे की नुकसान काही नाही. केंद्र प्रत्येक राज्यात एक आयआयटी देते. विदर्भ वेगळा झाला त्याला मिळेल. हरयाणा पंजाब मधून वेगळे झाले. दोन्ही राज्ये श्रीमंत झाली, लोक शासनाला सहज अप्रोच होऊ शकतात.

     • Hemant Gadkari ….
      शेवटी पैसे दिल्ली तुन येणार ते काही मंगळ ग्रहावरन नाही द्यायचे असल्यास आता ही देऊन सिंचन वाढवू शकतात, सिंचन सोडल्यास कुठला अभाव आहे आपल्या कडे, आपल्या पेक्ष्या मराठवाडा, व कोकण चे हाल बेकार आहे पण ते नाही करत अश्या रिकामचोट मागण्या

     • P Gade · ….
      दिल्लीत पैसे मंगळवरून येत नाहीत. आपलेच पैसे आपल्याला परत मिळतात.

     • Hemant Gadkari ….
      दुदैवाचा भाग काही आपलेच अति शहाणे मराठी लोक आपल्याच मुळावर येतात

     • P Gade · ….
      पण मराठी भाषेचे दोन प्रांत झाले तर मराठी कमजोर कशी होईल. अधिक बळकट होईल. हिन्दी भाषेचे HP,यूपी,एमपी बिहार, हरयाणा, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ असे कितीतरी प्रांत आहेत. हिन्दी कमजोर झाली काय?

     • Hemant Gadkari ….
      ते पैसे मुंबई मुळे महाराष्ट्राला मिळतात उध्या या लक्ष्मी नगरी पासून दूर गेला की छत्तीसगडच्या डवक्या सारखी आपली हलत होईल

     • P Gade · ….
      जीएसटी नंतर स्थिति बदलली आहे. महाराष्ट्राच्या माथ्यावर भरपूर कर्ज आहे.

     • Hemant Gadkari ….
      आज पुणे मुंबईत आपल्या नागपुरातील मुलांना किमान नौकरी तरी मिळते उद्या वेगळे राज्य झालं की नागपुरात काय मिळणार आहे साधा 120 चा खर्रा खायला ही राहणार नाही

     • P Gade · ….
      पुणे मुंबईत सर्व भारतातील लोक नोकरी करतात. विदर्भ वेगळा झाल्यास पाकिस्तानला जोडला जाणार नाही.

     • Hemant Gadkari ….
      ते गुजराती आपल्या मुंबई च्या मागे लागले आहे आणि आपण मूर्ख तिच्या पासून दूर जायच्या गोष्टी करतो .
      भेटणार काय आहे कंद मुळ ?

     • P Gade · ….
      मुंबई आपल्यापासून 1000 किमी दूर आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे अंतर कमी होणे कठीण आहे

     • Hemant Gadkari ….
      काश्मीर 2000 किमी आहे म्हणून देऊन टाकायचे का पाकिस्तानला ?

     • P Gade · ….
      वेगळे राज्य ही केवळ प्रशासकीय व्यवस्थेची सोय आहे. भावानवश विचार होऊ नये. असो. शुभ रात्री.

     • Hemant Gadkari ….
      उगाच ढोंगी विदर्भ वाद्यांच्या नादी लागू नका गाडे जी महाराष्ट्र एकसंघ ठेऊन आपल्या भागाचा अजूनही चांगला विकास होऊ शकतो, शुभ रात्री, जय महाराष्ट्र

 • Atul Deshpande ·….
  Smaller states is the key to faster development. When younger brother leaves his father’s home, he works harder for growth.
  Numbers (income and expenditure)does not necessarily prove that seperate Vidarbha will no be self sufficient.

 • Vijaykumar Kale ….
  Nice

 • Vìñäý Dèúlkär
  मी अस्सल वैदर्भीय आणि वऱ्हाडी… पण वेगळ्या विदर्भाच्या सपशेल विरोधात !
  विषय संपला !!

  • Amol Kashid ….
   बरोबर भाऊ… विदर्भाचा भरपूर विकास करा वाटलच तर राजधानी विदर्भा ला हलवा पण महाराष्ट्र हा अखंडच राहिला पाहिजे.,

 • P Gade · ….

  सर्वात कमी भ्रष्ट राज्ये आहेत, हिमाचल, केरळ व छत्तीसगद्ध. cmss डाटा. ही छोटी राज्ये आहेत.

 • Sudhanshu Hadge · ….
  वेगळ्या विदर्भा बाबत आपले विचार पुर्ण नाहीत. आपल्या लेखात सर्व बाबीचा समावेश नाही. पुष्कळ संदर्भ आपण सोडलेले आहे

 • Amol Kashid ….
  अरे एकजूटीने रहा ना हे काय लावलय स्वतंत्र विदर्भ वगेरे…

 • P Gade ·….

  when children grow up, they stay in separate houses. but remain brothers. it is convenienc

 • Sanchit Nakade ….
  विदर्भाच्या प्रगती करीता वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे,,,,विदर्भ वेगळा होणारच,,,,

 • Vikas Deshmukh · ….
  विनाश काले विपरीत बुद्धि

 • Vijay Sidhawar ….
  Vidrbhadrohi

 • Madhav Bhokarikar ….
  उत्तम !
  बहुंताश राजकीय व्यक्तीमत्वे आपलं अंतर्मन जनतेला कधी सांगतच नाही. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून तरी काही महत्त्वपूर्ण काम एखादवेळेस का होईना, पण करायला हवं. आपलं अंतर्मनाची साद सद्सद्विवेकबुद्धीने सांगीतली तर बऱ्याचशा अडचणी संपतील, काहींचा भ्रमनिरास होईल व काही नवीन पण समस्या उद्भवतील.

 • Rajeev Nawathe ….
  उशिरा सुचलेल शहाणपण !
  1960 पासुन मध्येच कोणतरी उठतयं , मध्येच कोणतरी वारा घालतंय
  परत शांत
  सर्वसामान्याना काय घेणं नाही हो
  राज्यांची नावं बदलुन पोटं भरत नसतांत
  पाऊस पडत नसतो
  उगच सारखी मानेवर तलवार ठेऊन राहील्या सारखं वाटतं
  काय कुणाची ही पर्सनल प्राॅपर्टी आहे काय ?
  आतां परत राज्याला ग्लोबलझेशनच्या काळांत परत 200 वर्षं मागं ढकलू नका
  सध्या एवढ्यावरच थांबतो !

 • िप्रय प्रविण सर,
  आपण ब्लाॅग लिहीणे सुरू केल्यापासून त्याला हिट्स, लाईक्स, शेअर किती होतात याची आकडेवारी आपणांकडे कायम उपलब्ध राहत असेल. परंतु आपल्या लेखणीच्या प्रेमात पडलेली व आपला प्रत्येक लेख दोन तीनदा तरी वाचणारी जी काही मंडळी असेल त्या अॅडमिरेषन क्लबमधील मी एक सदस्य आहे हे मी आपल्याला प्रारंभीच सांगू इच्छितो. त्यामुळे आपल्या ब्लाॅगवर कमेंट किंवा टिका करायची हिंमत झाली नाही. पण विदर्भाचा विषय असल्याने आता थांबू शकत नाही.
  राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री माननीय श्री. नितीनजी गडकरी यांच्या दि. 13 नोव्हेंबरच्या विदर्भावरील कबूली जबाबानंतर आपण काहीतरी प्रतिक्रिया द्यावी असे मनोमन वाटत होते आणि 14 तारखेला आपण आपल्या फेसबुक वर पोस्ट टाकली की शनिवारी 18 तारखेला स्वतंत्र विदर्भ या विषयावर ब्लाॅग लिहीणार आहात. उत्सुकतावष रोज मी आपला पेज काही कमेंट वगैरे आहे काय यासाठी बघत होतो आणि आष्चर्यकारकरित्या शुक्रवारी रात्रीच 8 ते 8.15 वाजताच आपला ब्लाॅग आला या ब्लाॅगच्या पहिल्या काही वाचकांपैकी मी होतो कारण दोनच – विदर्भ आणि प्रविण सर. जसं अपेक्षित होतं तसं आपण विदर्भ, येथील नेते, स्वतंत्र विदर्भ राज्याचे जनआंदोलन या बाबत भरपूर चिरफाड केली. याबाबत आणि आपला अभ्यास बघता आपण कुठलीही दयामाया ठेवणार नाही याबाबत आमच्यासारख्या फॅन्सला अपेक्षा होतीच.
  सर, आपल्या लेखाचा आणि माननीय नितीनजींचा एकच विषय होता की स्वतंत्र होण्यासाठी विदर्भ आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही.
  सर, माझ्यासारख्या अतिसामान्य स्वतंत्र विदर्भवादी कार्यकत्र्याचा आपल्याला आणि माननीय नितीनजींना केवळ एकच सवाल आहे – या देषात आजपर्यंत 29 राज्ये निर्माण केली गेली, त्यापैकी कुठले राज्य निर्माण करीत असतांना आर्थिक संपन्नतेचे निकष लावण्यात आले याचे एकतरी उदाहरण दाखवून द्या. सर, विदर्भाबद्दल बाहेर लोकांना कमी जास्त माहिती असेल पण काही माहिती मी आपल्या मार्फत विदर्भाबद्दल संदेह असणाÚयांना सांगू इच्छितो
   1948 च्या ‘दार कमिटी ञ कडुन स्वतंत्र विदर्भ राज्याची स्पष्ट षिफारस करण्यात आली होती.
   1948 च्या जे.व्हि.पी. (जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल, पी.सितारामय्या) च्या समिती कडुन स्वतंत्र विदर्भाची षिफारस करण्यात आली होती. लक्षात घ्या 1948 साली जवाहरलाल नेहरू देषाचे पंतप्रधान होते, वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते व पट्टाभी सितारामय्या हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
   1953 साली स्थापन केलेल्या व आजपर्यंतच्या एकमेव फजल अली आयोगाने आपल्या राज्य फेररचना अहवालात स्वतंत्र विदर्भ राज्याची षिफारस केली. ”स्वतंत्र विदर्भ राज्य हे व्यवहार्य व आर्थिक दृष्टया संपन्न राहील असे स्पष्ट मत आपल्या अहवालात व्यक्त केले होते.“
   पण विविध प्रलोभने देवून विदर्भाला त्याच्या इच्छेविरूद्ध महाराष्ट्रात सामिल केल्या गेले. विदर्भाच्या त्यागाचा दाखला पंतप्रधान नेहरूंनी सुद्धा दिला होता.
   महाराष्ट्रात आल्यानंतर सुद्धा स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा सुरूच होता.
   1997 च्या भारतीय जनता पक्षाच्या भुवनेष्वरच्या राष्ट्रीय अधिवेषनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव पारित करण्यात आला.
   लोकसभेचे माजी अध्यक्ष स्व. पी.ए. संगमा यांनी लोकसभेत दि. 10 जून 2014 रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाषण करतांना लहान राज्यांच्या निर्मितीचे स्वागत करीत वेगळîा विदर्भ राज्याच्या भूमिकेस पाठिंबा दर्षविला. ते म्हणाले ”30-32 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हîांच्या आदेषानुरूप विदर्भात जाऊन केस हिस्ट्री तयार केली होती. वेगळे राज्यनिर्मितीच्या कसोटीवर विदर्भ पूर्णपणे खरा उतरतो.“
   निवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी आय.आर.एस. अधिकारी व भारत सरकारचे माजी सल्लागार डाॅ. श्री. आर.एल. पितळे हîांनी महाराष्ट्राच्या 2010-11 च्या अर्थसंकल्पावर आधारित स्वतंत्र विदर्भाचा अर्थसंकल्प मांडला होता तेव्हा विदर्भाचा अर्थसंकल्प 96 कोटीनी षिलकीचा होता. टाईम्स आॅफ इंडियाने यावर एक संपूर्ण पान भर लेख सुद्धा प्रकाषित केला होता.
   प्रसिद्ध अर्थतज्ञ डाॅ. श्रीनिवास खांदेवाले यांनी 2013 साली विदर्भ राज्याच्या प्रतिअधिवेषनात रू.110 कोटी षिलकीचा स्वतंत्र विदर्भाचा अर्थसंकल्प मांडला होता. विषेष म्हणजे या अर्थसंकल्पात एकही नविन किंवा प्रचलित करात कुठलीही वाढ केली नव्हती.
   यानंतर परत वर्ष 2017-18 चा स्वतंत्र विदर्भ राज्याचा अर्थसंकल्पही अर्थतज्ञ डाॅ. श्रीनिवास खांदेवाले यांनी मांडला होता जो रू. 1602 कोटींनी सरप्लस होता.
  आपल्याला वाचून आनंद होईल की हा सर्व डेटा आम्ही तत्कालीन अर्थमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्रातील सर्व आमदारांना पाठवला परंतु आजपर्यंत कुठल्याही राज्यकत्र्याने ही थेअरी खोडून काढली नाही किंवा नाकारलीसुद्धा नाही.
  त्यामुळे आपली भिकेचे कटोरे वगैरे थेअरी आपोआपच मागे पडते. विदर्भ हे निर्माण झालेल्या पहिल्या दिवसापासून सरप्लस राज्य राहील.
  असे नाही की विदर्भाची मागणी ही काही भारतातील एकमेव मागणी आहे. भारतात मागील काही काळात जी नविन राज्ये निर्माण झाली त्यांची आणि त्यांच्या मूळ राज्यांची आकडेवारी बघितली तर मोठी मजेषीर आहे.
  11व्या पंचवार्षिक योजनेच्या अंती विकास दर
  मूळ राज्य नविन राज्य
  मध्यप्रदेष – 4.3टक्के छत्तीसगढ – 9.2 टक्के
  बिहार – 4.7टक्के झारखंड – 11.1 टक्के
  उत्तरप्रदेष – 4.6 टक्के उत्तरांचल – 8.8 टक्के
  मागील दोन वर्षात
  (2014-16) आंध्रप्रदेष – 5.5 टक्के तेलंगाणा – 9.8 टक्के
  संदर्भ – प्लानिंग कमिषन गव्हर्नमेंट आॅफ इंडिया
  इलेवन्थ फाईव्ह इयर प्लान
  सर, वरील सर्व नविन राज्ये ज्या वेगाने प्रगती करत आहे ती आपल्यालाही माहिती असेल. या राज्यांमध्ये सोन्याच्या विटा आहे की नाही हे मला माहीत नाही परंतु वरील राज्यांमधून षिक्षित युवकांचे पलायन व शेतकरी आत्महत्या नगण्य आहेत हे तुम्हाला आणि मला चांगले माहीत आहे. बाकी आकडेच स्वयंस्पष्ट आहेत.
  आपण स्व. डाॅ. श्रीकांत जिचकार दादा यांच्या सन 1980च्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे. स्व. श्रीकांत दादांची थेअरी डाॅ. श्रीनिवास खांदेवाले सरांनी तेव्हाच खोडून काढली होती. दुर्दैवाने स्व. श्रीकांत दादा आज आपल्यात नाही आहेत, नाहीतर गेल्या चार दषकात जगात, देषात व राज्यात बदलेल्या अर्थकारणामुळे व महाराष्ट्राने विदर्भाच्या केलेल्या प्रचंड आर्थिक शोषणामुळे कदाचित त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याला आज पाठींबाही दिला असता कोण जाणे !!!
  आपला दुसरा आक्षेप होता की विदर्भ महाराष्ट्राला वीज आणि खनिज पुरवतो आणि त्यामोबदल्यात विदर्भात चैपट निधी दिल्या जातो वगैरे. विदर्भातील युवकांना अषासकीय आणि खाजगी रोजगार पष्चिम महाराष्ट्रात व मुंबईत मिळतो. सर याबाबत महाराष्ट्रात काय कुठेही याबाबत काही निकष असतील हे मला खरे वाटत नाही. विदर्भ काय देतो आणि महाराष्ट्र त्याच्या बदल्यात काय देतो याचा हिषोबच होऊ शकत नाही. जर असच असेल तर मुंबई पुण्यात विदर्भ मराठवाड्यातील युवकांपेक्षा अनेक पटींनी असलेल्या परप्रांतियांचा किंवा अवैधपणे राहणाÚया बांग्लादेषींचा हिषोब कसा केला जातो याबद्दल आपणच प्रकाष टाकलेला बरा.
  आपल्या साराचे उत्तर आपल्याच लेखात दिलेले आहे की पुणे आणि नगर परिसरात नागपूर आणि वर्धा या दोन जिल्हîातील 30 हजारावर लोक राहतात. सर, केवळ पिंपरी चिंचवड आणि भोसरीत विदर्भातील 25 हजाराच्या वरती लोक राहतात. उरलेल्या पुण्यात मुंबईत ठाण्याचा हिषोब आपण इथूनच लावून घ्यावा आणि एकाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात विषमता असावी की विदर्भातील युवकांनी विदर्भात षिक्षण घ्यावे आणि पुण्या मुंबईत जावून नोकरी करावी हा जीवनातील एक भाग होऊन बसला आहे. त्यामुळे गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राला समतोल विकास साधता नाही आला हे अधोरेखित होतं. हीच परिस्थिती मराठवाड्यालाही लागू आहे.
  सर, आपण महाराष्ट्र जणू काय विदर्भाला पोसतोय असे चित्र निर्माण केलेले आहे. मी आपले दि. 03 नोव्हेंबर 2017 च्या ब्लाॅगकडे लक्ष वेधू इच्छितो – फडणवीस नोकरषाहीचे नाही जनतेचे मुख्यमंत्री व्हा ! या लेखात आपणच लिहिलेले आहे की महाराष्ट्र शासनाचे 60 टक्के बजेट हे केवळ पगार आणि पेन्षन देण्यात जातं. यापुढे 15 टक्के बजेट हे आस्थापनेवर खर्च होतं. महाराष्ट्र आज देषातील नंबर 1 चे कर्जबाजारी राज्य आहे (4 लाख 32 हजार कोटी कर्ज) व यापुढे या राज्याला नविन कर्ज मिळू शकत नाही तरी आपण दावा करता की महाराष्ट्र विदर्भाला पोसतोय ?
  आज भिकेचं कटोरं कुणाच्या हाती आहे हे तुम्हीच ठरवा !!!
  आपण तिसरा मुद्दा उचललेला आहे की विदर्भाच्या मुद्यावर कुणीही निवडणूक लढवलेली नाही व ज्याने लढवली त्याची अनामत रक्कम सुद्धा वाचलेली नाही. सर, येथे कदाचित आपण विदर्भाचा राजकीय अभ्यास थोडा कमी केला कारण आपल्याला आठवण करून देवू इच्छितो की 1960 ते 1980 च्या दषकापर्यंत विदर्भवाद्यांचा दबदबा होता. उदाहरण घ्यायचं असल्यास नागपूर लोकसभेतून 1962 साली माधव श्रीहरी अणे, 1967 साली एन.आर. देवघरे, 1971 साली भाऊ धोटे, 1977 साली गेव्ह आवारी व परत 1980 साली भाऊ धोटे केवळ विदर्भ वादी म्हणून निवडून आले. त्यानंतर विदर्भातील आंदोलनाला ओहोटी लागली हे मात्र नक्की. 2004 साली आताचे तामिलनाडुचे राज्यपाल व नागपूरचे माजी खासदार श्री. बनवारीलाल पुरोहित यांनी विदर्भाच्या मुद्दîावर निवडणूका लढवल्या पण त्यांना अपेक्षित यष मिळाले नाही.
  2004 च्या पष्चिम नागपूर विधानसभेच्या निवडणूकीत ज्येष्ठ नेते रणजीत देषमुख यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात स्वतंत्र विदर्भ राज्याचा उल्लेख नाही म्हणून आपला इलेक्षन प्रचार बंद केला होता. पक्षाच्या सरचिटणीसाकडून विदर्भाबाबत पत्र मिळाल्यावर त्यांनी तीन दिवसांनी परत आपला प्रचार सुरू केला. अनेकांच्या मते ही राजकीय हाराकिरी होती व त्याची मोठी किंमत रणजीत देषमुखंाना मोजावी लागली. इतके होऊनही रणजीत बाबूंनी 80 हजार मते घेतली पण त्यांचा 13 हजार मतांनी फडणवीसांनी पराभव केला. जेथे विदर्भाच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी डोळे वटारल्याबरोबर नेते पॅक होतात तिथे रणजीत बाबूंनी दाखवलेली हîा बहादुर देषमुखीची विदर्भाच्या इतिहासात नक्कीच नोंद घेतली जाईल.
  विदर्भाच्या मुद्यावर पक्ष स्थापन करून निवडून येता येणार नाही हे आपले म्हणणे अत्यंत बरोबर आहे. सर निवडणूक लढवणे, निवडून येणे, सत्तेत बसणे, परत निवडून येणे हे आज एक शास्त्र झालेले आहे. आपला रोष हा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थकांविरूद्ध आहे हे मी समजू शकतो व स्वतंत्र विदर्भाच्या लढाईत विदर्भवादी कमी पडले हेसुद्धा मान्य करतो. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी भरोष्याचं नेतृत्व मिळालं नाही हे सुद्धा खरं आहे. पण लढाई अजून संपलेली नाही. इथल्यापैकीही कुणीतरी नक्की पोट्टी श्रीरामालु, के. चंद्रषेखर राव, सुभाष जिषिंग, षिबु सोरेन बनेल. पण ही लढाई केवळ आणि केवळ अहिंसक मार्गानेच होईल. कारण आमची लढाई ही या देषाच्या संविधानाच्या चैकटीत राहूनच पूर्ण होऊ शकते असा आमचा पूर्ण विष्वास आहे.
  सर, तुम्हालासुद्धा एक विनंती आहे. विदर्भातील सध्याच्या सर्व नेत्यांनी काय केलं हे सर्व तुम्हाला माहिती आहे. तुम्हीसुद्धा एकदा लिहा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री या सर्वांचे पायसुद्धा मातीचेच निघाले. आम्ही विदर्भातील जनता यांच्या आमगाव ते खामगाव यात्रा, महाराष्ट्र नको विदर्भ राज्य हवे, स्वतंत्र विदर्भा राज्यासाठी लिहून दिलेले अॅफिडेविट यासर्व गोष्टींना भुललो व बळी पडलो.
  आमच्या याच परिस्थितीवर एक सुंदर शेर आठवतो,
  एक फ़र्द.ए.कलंदर ने अजब बात कही थी !!
  ऐ शख्स तेरे यार वफ़ादार न होंगे !!!
  (फ़र्द.ए.कलंदर . सिद्ध पुरुष)
  आपला विनम्र
  नितीन रोंघे

  • प्रिय नितीन ,
   तुझी सविस्तर प्रतिक्रिया वाचली ; आपलं म्हणणं मांडण्यासाठी तू बराच वेळ खर्च केलायेस आणि त्यासाठी अभ्यासही केलेला आहेस , त्याबद्दल कौतुक आणि अभिनंदनही !
   ( कोणताही हेकटपणा किंवा एकारलेपणा न करता ) समोरच्याचा प्रतिवादाचा आणि त्याला त्याची काही मत असण्याचा हक्क मला मान्य असल्यानं सांगतो – तुझा प्रतिवाद मला आवडला पण , त्याच्याशी मी सहमत नाही , सहमत होणं शक्यही नाहीच .
   फक्त एक लक्षात घे मी म्हटलंय ,”मतदारांचा कौल हा निकष लावला तर ; अलिकडच्या पंचवीस वर्षात…” त्यामुळे त्याआधी स्वतंत्र विदर्भ हा मुद्दा घेऊन त्याआधी कुणी निवडून आल्याचं मी अमान्य केलं नाहीये .
   स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीच्या अनुषंगाने श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वाबाबत मी व्यक्त केलेल्या मतावर तुझी कमेंट वाचायला आवडली असती .
   तुझी प्रतिक्रिया कोणतीही काटछाट न करता ब्लॉगवर घेत आहे .
   शेवटी, माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या आदराच्या भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो .
   आपल्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत आणि शत्रुत्व तर मुळीच नाही ; ही भावना सामुहिक पातळीवर काही अपवाद वगळता मावळतीला लागलेली असतांना तुझ्या माझ्यासंबधीच्या आदराच्या भावना खूपच महत्वाच्या आणि आशादायक आहेत !
   हा सद्गुण कायम जपून ठेव , हाच सल्ला .
   तुला खूप खूप शुभेच्छा .
   कळावे / कळवावे ,

   • Narendra Palandurkar ….
    Jay Vidarbha !
    अतिशय सुंदर नितिनजी

    • Shrikant Umrikar ….
     To >> Nitin Ronghe आतिशय उत्तम नेमके आणि मुद्देसूद.. पण मी काही वेगळे मुद्दे तुमच्या विचारार्थ ठेवत आहे.. मी वेगळ्या छोट्या राज्याचा कट्टर समर्थक आहे.. केवळ विदर्भच नाही तर महाराष्ट्राची विभागणी ६ छोट्या राज्यामध्ये झाली पाहिजे आशी मांडणी आम्ही करतो .. विदर्भ -मराठवाडा-उत्तर महाराष्ट्र-पश्चिम महाराष्ट्र-कोंकण- मुंबई.. ही सगळी विभागणी केवळ प्रशासनाची सोय म्हणून आहे… आता GST लागू झाल्यानंतर कुठलीही आर्थिक बाब समोर नाही.. कुठलेही राज्य आता आर्थिक बाबीत स्वयंपूर्ण म्हणता येत नाही.. शिवाय रेल्वे, रस्ते, पाणी-नद्या, वीज हे सगळे मुद्दे केवळ एखाद्या प्रदेशाचा विचार करून मांडता येणार नाहीत.. यावर खर्च होणारा निधी संपूर्ण देशाचा विचार करूनच करावा लागणार आहे.. तंत्रज्ञान पूर्ण बदलत आहे. ज्या सीमा आपण आखल्या होत्या त्या आता कोसळून पडत आहे. जग जाऊ द्या पण भारत तरी निदान एकजिनसी बाजारपेठ होणे गरजेचे आहे.. ह्यासाठी प्रदेश म्हणजे केवळ प्रशासनाची सोय ठरतील.. स्वातंत्र्या पूर्वी भारतात ६०० संस्थाने होती.. आता निदान ५० राज्ये होणे गरजेची आहेत.. यासाठी कुठलेही भावनिक मुद्दे समोर करण्याची गरजच नाही.. आणि केवळ आंदोलन करून राज्य निर्माण झाले असेही नाही.. तेंव्हा हा मुद्दा पूर्ण बाजूला ठेवून शांतपणे छोटी राज्य निर्माण केली पाहिजेत.. समर्थन करताना किंवा विरोध करताना आता जुने मुद्दे कामाचे नाहीत हे लक्षात घ्या…

     • राहुल खारकर ….
      जय विदर्भ राज्यच……

     • Sunil Londhe ….
      Nutinji excellent excellent excellent ,very studied article

     • Archana Mahajan Nandaghale ….
      Atishay Uttam ……

     • Firdos Mirza ….
      Nitin excellent article. There is always an antithesis time any principle. Let apart other reasons but for proper administration there should be small states. We are Indians. Whether we live in Maharashtra or Vidarbha makes no difference, but the quality of life and administration matters. Therefore we need to have Vidarbha and other smaller states.

     • Prabir Chakravorty ….
      As far as trend of voting on Vidarbha issue is concerned, Pravin may kindly note that in 2013, BJP won 44 MLA and 10 MP seats from Vidarbha as they had promised creation of the separate State, if they get majority in Parliament. If they don’t fulfil their promise, they shouldn’t expect similar results in 2019. People of Vidarbha are no more going to be lured by empty arguments of viability.

     • Arun Wasalwar….
      महत्त्वाचे आणि मार्मिक

     • Narendra Palandurkar ….
      Res Shreehari Aney sir Mukesh Samarthji Dinesh Naiduji Deepak Mundheji Neeraj Khandewaleji Swapnajit Sanyalji Adv Nanda Parate ji Dilip Narvariyaji Dr DrGovind Kodwaniji Nana Patoleji Sewakbhau Waghayeji Ramdas Tadasji Sanket Sarode
      Yor comments pls .
      विदर्भातील जनता आपले ही विचार वाचण्यास उताविळ आहेत .
      एका मोठ्या पत्रकाराच्या blog च्या अनुषंगाने चर्चा होणे गरजेचे आहे. मा. Nitin Ronghe नी आपली भुमिका मांडली .आपणही आपली भुमिका मांडा.

     • Govind Kothekar ….
      very well nitin

     • Sunil Navale ….
      तुम्ही खूप छान आणि समर्पक प्रश्न उपस्थित केलेत. परंतु असे करताना आपण आपली सभ्यता सांभाळली याचे खूप कौतुक वाटते राव. कारण आजकाल कुणी लिहायचे अथवा बोलायचे नाही अशी सार्वत्रिक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही आणि प्रवीण सर दोघेही कौतुकास पात्र आहात.

     • Narendra Palandurkar ….
      प्रविणजी अतिशय मोलाचा सल्ला -विदर्भाच्या मागणी करिता अराजकीय आणि विश्वासार्ह चळवळीची आवशक्ता!
      नागपूर ला आलात की एकत्र बसुन आपल्या सोबत चर्चा करायला आवडेल आम्हाला !
      जय विदर्भ !

     • Jitendra Rode ….
      नितिनजी व प्रविणजी विदर्भावरील चर्चा उत्तम

   • Dilip Bhagde ….
    Dearest Pravin , Nitin has Written in detail (MUDDESUDH) , all facts & figures quoted, Pravin “ SIR” (😀) tuza VIDHARBHA VIRODH HA WORLD KNOWN AAHE, BJP Ne Election Purvi kelelya PROMISE (VACHAN) tyani soisker pane bajula kele, teacher Vishveshalan aapan Gadkari (Blog) madhe kele aahe, pan he kartana aapan Ji TAREWARCHI KASRAT KELI TI YOGHA NAHI. NITIN junior Aahe , Uccha Shikshit Kutumbatla unchained shikshit TARUN AAHE, TYAMULE MOTHYANA MAN DENE SWABHAVIK AAHE. Vidharbha war PREM KARA TUMCHA PREMANE LAVKARCH VIDHARBHA RAJYA HOIEL HI APEKSHA, NAMASKAR TABETYICHI KALJI GHYA 🌹🙏🏿🙏🏿🙏🏻🙏🏻

    • प्रिय प्रिय दिलीप ,
     तुम्हा सर्वांचे स्वतंत्र विदर्भाचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी शुभेच्छा !
     इतकी वर्ष स्वतंत्र विदर्भाला विरोध केला आणि राजकारण्यांचा कावा उघड केला आता उर्वरीत आयुष्य बहुदा स्वतंत्र मराठवाड्याला विरोध करण्यात जाणार !
     अयोग्य बाबींना विरोध हे आता जगण्याचं व्यवच्छेदक लक्षणच झालंय !

     • Narendra Palandurkar ….
      पत्रकारांनी निपक्ष लिखान करणे अपेक्षित आहे.
      नितिन रोंघे चा विदर्भ अभ्यास गाढा आहे. विरोधाला विरोध करु नका. नागपूर करारा नंतर विदर्भातील युवकासोबत झालेल्या अन्यायाबद्दल , सिंचना बद्दल लोडशेडींग ची ही वस्तुस्थिती लक्षात घेउन आपण लिहावे .Praveen Bardapurkar दादा

 • Sushila Pi ….
  ही तर गडकरींनी जनतेची केलेली फसवणूक आहे.

 • ////

 • P Gade ·….
  when children grow up, they stay in separate houses. but remain brothers. it is convenience.

 • Sanchit Nakade ….
  विदर्भाच्या प्रगती करीता वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे,,,,विदर्भ वेगळा होणारच,,,,

 • नमस्कार,
  विदर्भ के मामले में नितिन गडकरी के ताजा कथन पर आपका ब्लॉग पढ़ा… आपने विदर्भवादी नेताओं की जमकर खिंचाई की है जिनके खाने के दांत और , खिसियाने के दांत और हैं। एक अध्ययनशील और अनुभवी पत्रकार के रूप में तथा संयुक्त महाराष्ट्र वादी के तौर पर आपने कलम चलाई है। अनेक विदर्भवादियों को शायद आपके विचार रास नहीं आयेंगे परन्तु आपने आइना दिखाया है। जिन लोगों का आपने नामोल्लेख किया है, वे अब कहां है यह जग जाहिर है। एक बात आपने मानी है कि विदर्भ राज्य के मुद्दे का नेताओं और दलों ने जमकर दोहन किया है। आज भी जारी है। आपने भाजपा और गडकरी, फडणवीस से भी पूछना चाहिए कि उन्होंने विदर्भ की जनता के सामने गाजर टांगकर सत्ता पायी की नहीं??? अब उनका घूमजाओ क्यों???
  आपका परिचित ही…
  – दुर्गाप्रसाद अग्रवाल

 • Deven Kapse · ….
  सहमत

 • Sanket Sarode….
  सहमत,
  पण तुम्ही एकांगी विचार करता आणि आंदोलनाला एक व्यक्ती चालवत नसतो.
  अणे कधीही आंदोलनाचे नेता नाही तर पोस्टर बॉय आहेत किंवा ब्रँड आंबस्सडेर आहेत असा समज बहुतांश युवकांचा आहे.
  आपन अनुमान आणि अनुभूती यातून आंदोलना प्रति पूर्वाग्रह बनविले आहेत.आणि त्या पूर्वग्रहांच्या मुळाशी विदर्भ राज्याला तुमचा असणारा विरोध आहे.
  तुम्ही अनुभवी असून ही प्रगल्भ नाही,पक्षपातातून मुक्त नाही.
  मला भेटा जरा picture clear करतो.
  भेटतांनी अहंकार आणि पूर्वाग्रह घरीच सोडून यावे ही विनंती.
  औरंगाबादात राहून आज चा विदर्भ आणि आंदोलन यावर लिहणे हे देखील अणें च्या नेतृत्व शैली सारखेच आहे.
  असो तुम्ही विदर्भ विरोधी असले तरी तुमच्या लिखाणाचा विदर्भवाद वाढविण्यासाठी उपयोग होतो.तुम्ही नकळत विदर्भवाद्यांची बाजू घेता आणि आंदोलनाच्या विचारांना चालना देता.
  त्या बद्दल मनापासून धन्यवाद.
  आणि तुमच्या अणे सरांवर आक्षेपा बद्दल दोन वाक्यात उत्तर:-
  बस आने की खबर सुनी तो जहां जीत लाये ऊनके लिये
  दिवानगी के लिये सुरत का दीदार नही बस नाम का जिक्र ही काफी है

  • Prabhakar Kondbattunwar ….
   संकेत, औरंगाबादेपासून माझी पत्रकारिता सुरू झाली . मराठवाडा त्यावेळी विदर्भाच्या तुलनेत मागास होता. आजही तेच चित्र आहे. म्हणूनच मराठवाडयातही वेगळ्या राज्याची मागणी अधूनमधून उठत असते. खान्देशातून अलिकडच्या काळात खान्देशासह विदर्भाचे राज्य करा अशीही मागणी ऊठली होती. याचा अर्थ महाराष्ट्र हे राज्य म्हणून सक्शम नाही हे विदर्भासह ईतरही भागातील लोकांना जाणवत आहे. हे सर्व चित्र ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र प्रविण बर्दापूरकर यांनाही माहीत आहेच. ते संयुक्त महाराष्ट्रवादी आहेत. म्हणून विदर्भ राज्याच्या मागणीला विरोध करीत आहेत. त्यांच्या मताचा आदर ठेवूनही आपण विदर्भ राज्याच्या मागणीवर ठाम अयलोच पाहिजे. आपणही परखडपणे मत मांडलेच पाहिजे. जय विदर्भ .

 • Suraj Madurwar · ….
  तर काय झाल साहेब चांगल आहे की विदर्भात राहत नसताना सुद्धा विदर्भाबद्दल प्रेम आहे नाहीतर गड़कड़ीसारख सक्षम होउ दया विदर्भ मग वेगळा करू अस म्हटल असत आपन तर पाहातात् विदर्भातील जनता अजूनही झोपेत आहे…श्रीहरि अने किमान प्रयत्न तरी करतोय माहीत नाही विदर्भातील जनता केव्हा रस्त्यावर उतरणार आणि केव्हा यांना कड़नार शरीर आहे पण आत्मा नाही अशी आपली अवस्ता झाली आहे श्रीहरि अने साहेबांच्या कार्याला सलाम…..

  • P Gade ·….
   आंदोलनाची गरज नाही. मुंबई पट्टयात भाजप सबळ झाली की दोन्ही भाग वेगळे होतील. आत्ता वेगळे झाले तर मुंबई वरचा ताबा जाईल. उर्वरित राज्याला त्याचे काही सुखदुःख नाही

  • अहो , अणे माझे खूप छान मित्र आहेत . आमचे वैयक्तिक संबंध ‘अरे-तुरे’चे आहेत . एखाद्या विषयावर मतभेद असले तरी त्यांच्यावर मी टीका केलेली नाहीये , त्यांची तारीफच केलीये हे लक्षात घ्या .

   • Prabir Chakravorty….
    I feel only Shri Srihariji is competent to react. Plz untag me from this post. I am afraid I am not able to agree with Praveenji.

 • Sushila Pi ….
  श्रीहरी अणेच्या या उणेपणावर नेमकेपणाने आपण बोट ठेवले आहे!

 • Rajendra Singh Gour ·….
  जय विदर्भ

 • Kapil Idde ….
  श्रीहरी अने कट्टर विदर्भवादी आहेत यात शंका नाही. मात्र ते विदर्भ चळवळीचे नेते होऊ शकत नाही किंबहुना तेवढी नेतृत्व क्षमता त्यांच्यात नाही. त्यामुळे या चळवळीच्या नेतृत्वासाठी त्यांच्याकड़े आशेने बघण्याची गरज च विदर्भवाद्यांना नाही..

 • Sanjay Nerkar ·….
  जांबुवंतराव धोटे यांचेनंतर विझत चाललेल्या विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनाला विश्वासाने बळकटी देण्याचे काम श्री श्रीहरी अणे यांनी केले आहे. विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी कोण कोठे राहून प्रयत्न करतो यापेक्षाही हे करण्यासाठी जी त्यागभावना नेत्यांनी अंगिकारायची असते ती श्री श्रीहरी अणेसाहेबांनी महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता या पदाचा झटक्यात राजीनामा देऊन दाखविले आहे. आता विदर्भाच्या निर्मितीसाठी कृतिशील असणारे एकमेव विश्वसनीय नेतृत्व श्री श्रीहरी अणे हे आहेत. आपणांस नम्र विनंती, त्यांचे हात बळकट करा. ते शक्य नसेल तर कमीतकमी त्यांचे नेतृत्वाबाबत शंका घेऊ नका. धन्यवाद. जय विदर्भ. जय जय विदर्भ.

  • Sachin Dixit · ….
   He isnt as big as hero u make him to be sir….may be ur proximity and juronalist circle make it feel so..if at all vidarbh movement gains momentum the real heros will be diff and not him….indian ppl know the dynamics of movement very well. That said how about the sectery reshuffle and farm loan goof up as good topics ?

 • Anand Manjarkhede ….
  भारत स्वतंत्र झाला तेव्हा किती सक्षम होता??₹

 • Nitin Ronghe ….
  Sir
  What do I say ? I am too a small person to comment on you or Aney Sir. All I know is that everybody is contributing as per his capability resources and time.
  All that everyone needs is an independent state .

 • Prashant Deshpande ….
  ये मुर्दा परस्तों की है बस्ती… सुस्त, अक्षम, निरंकुश, अल्प संतुष्ट, शिक्षित अज्ञानी, अधे बहरों का श्मशानघाट है विदर्भ. इतिहास मत बताओ इतिहास रचों. छत्तीसगढ़ तेलंगाना से सीखो. सबकुछ है इच्छाशक्ति की कमी है. नेता अपनी रोटी सेख रहे, जनता

  • Prabhakar Kondbattunwar ….
   अर्धसत्य्

   • Prashant Deshpande ….
    आदरणीय इस सत्य को पूरा करे आपके विचार से.

 • Rajeev Nawathe ….
  कशासाठी हा अट्टाहास , कशासाठी हा बळबळच आटापीटा !
  वीकास हा मुद्दा असेल तर वीकास झाल्यानंतर कोण उगाच उकरत बसलं तर वेगळाच वास येतोय !
  बिनकामी अर्धवट लोकांची ,जमल्यास हात धुऊन घेण्याची गाजराची पुंगी !

  • Narendra Palandurkar ….
   विदर्भावर महाराष्ट्रात समावेश झाल्या पासुनचा अन्याय बघा. नागपूर कराराची अंमलबजावणी कीती झाली ? सिंचनाचा अनुषेश ? औद्योगिकरन याची आधी माहीती करुन comment करा .

   • Rajeev Nawathe ….
    Narendra Palandurkar आपण क्रुपया कोकण आणि खानदेशचा दौरा करावा तेथील प्रश्न आणि परिस्थिती जाणून घ्यावी म्हणजे खरा अन्याय काय आहे तो कळेल
    सर्वांनी एकत्र राहुनच प्रगती करण्यावर भर देण्याची गरज !
    आम्हा कोकणवासीयांची आमच्या घासातला अर्धा घास आपल्या तोंडी भरवण्याची तयारी पण तोडातोडीची भाषा नको !

    • Kapil Idde ….
     कोंकण आणि खानदेश करार करुण महाराष्ट्रात सामिल झाले नव्हते. विदर्भाचा करार झाला होता महाराष्ट्रात सामिल होण्यापूर्वी, ज्याच पालन अखंड महाराष्ट्रवाद्यांनी गेली 57 वर्ष केलं नाही. त्यामुळे करार संपला आणि आता आम्हाला महाराष्ट्रात राहायच नाही

     • Vinod Deshmukh ….
      नवाथे , कोकणाचे काही वेगळे राज्य नव्हते विदर्भाचे वेगळे राज्य होते त्याचा प्रत्येक अर्थसंकल्प सरप्लस होता. असे राज्य काही अटीवर महाराष्ट्रात सामील झाले हे लक्षातघ्या .

     • Rajeev Nawathe ….
      पण आपण मराठी भाषक मुद्दयावर एकत्र आलो आहोत हे ही लक्षात क्रुपया घ्यावे
      मराठवाडा ‘मराठ्ठ’असुनही त्यावेळी हैद्राबाद संस्थानला जोडले होतंच की पण म्हणुन ते बरोबर होतं असा अर्थ निघत नाही
      त्यावेळीही फक्त विदर्भ असं वेगळं राज्य नव्हतंच
      आणि त्यावेळी असं होतं म्हणून अत्ता असं पाहिजे आणि असंच पाहिजे हा ही मुद्दा तितकासा पटण्यासारखा नाही !

 • Tuljiram Dhula Thavare ·….
  अणे हे गप्प आहेत सध्या, कोणती मनधरणी झाली असेल बरं? त्यांची जीभ खूपच शांत आहे आजकाल.स्वतःची राजकीय महत्वकांक्षा जागृत झाली की असले स्वतंत्र राज्य मागणारे तयार होता

 • Sharad Diwate ·….
  चळवळीला असे विचार पोषक नसतात

 • P Gade ·….
  फडणवीस, गडकरी आहेत तोपर्यंत आहे ते ठीक आहे. कॉंग्रेस (आत्ताची), सेनाही विद्रभासाठी वाईट नाही. फक्त ही (पश्चिम महा)राष्ट्रवादी कॉंग्रेस संपली पाहिजे.

 • Prashant Deshpande …
  पहली बात विदर्भ को राज्य बनाना कोई कार्यक्रम या आयोजन नहीं है. यह किसी एक व्यक्ति का काम नहीं है. यह कोई धार्मिक अनुष्ठान, महोत्सव या उत्सव नहीं है. विदर्भ पर भाषण देने या निबंध लिखने से इसका निर्माण नहीं होगा. हमे विदर्भ निर्माण के लिए किसी नेता या पार्टी की जरूरत नहीं है. यहा के हर एक नागरिक को नेता बनाना होगा.

 • Narendra Palandurkar ….
  अगदी खर !

  • Sanket Sarode ….
   जनआंदोलन एक निरंतर प्रक्रिया है,राज्य निर्मिती ना तो इस्की शुरुवात है ना अंत

 • Narendra Palandurkar….
  विदर्भवादी काही बोलणार की बर्दापुरकरांनाच विदर्भ राज्याची मांडणी करु देणार

 • Sandhya Saratkar ….
  Agdhi khar ahe sir

 • Surendra Deshpande ….
  We are happy in Maharashtra no vidarbha is demand of common man dhote was last man to fight he was digested by congress