छत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…

पंतप्रधान न होऊ शकलेले ; गेला बाजार राज्यात स्वबळावर सत्ता संपादन न करू शकलेले आणि संयमी, विचारी, मनात काय चाललंय याची पुसटशीही चुणूक चेहेऱ्यावर उमटू न देण्याचं कौशल्य असणारे, ‘जाणता राजा’ अशी प्रतिमा असणाऱ्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा छत्रपती-पेशवे म्हणजे ‘मराठा-ब्राह्मण’ वाद उकरून काढला आहे. स्वत: इतकी दशकं सत्तेत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाला त्यांनी कधी राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर नियुक्त केलं नाही उलट; निवडणूक लढवायला लाऊन छत्रपतींचे वारस पराभूत कसे होतील याचीच काळजी घेतली. राष्ट्रवादीचेच खासदार असूनही सातारकर राजांशी ते पंगा घेत नाहीत कारण, आपण शरद पवार यांच्या नव्हे तर स्वत:च्या पुण्याईनेच निवडून येतो ही सातारकारांची खात्री आहे. सोशल इंजिनीअरिंग’च्या वावड्या उठवत बहुजन आणि दलितांना गाजर दाखवत मोजक्या मराठ्यांसाठी सत्तेचं राजकारण करणं ही शरद पवार यांच्या राजकारणाची दिशा आजवर कायम राहिली आहे. त्यांच्या या ‘मराठा कार्ड’चं महत्व कमी होतं चाललंय, ही खंत सतत बोचत असल्यानंच पवार असे वाद उकरून काढत असावेत.

निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चड्डीचा उल्लेख करत भटा-ब्राह्मणांच्या हाती सत्ता देणार का, अशी पृच्छा शरद पवार यांनी केली होती, त्याआधी एकदा पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं तेव्हा राजू शेट्टी यांच्याही जातीचं स्मरण पवार यांना झालेलं होतं. युतीची सत्ता आली तेव्हाही शरद पवार यांनी अशीच हिणकस शेरेबाजी केली होती, हे अनेकांना आठवत असेलच. सोनिया गांधी यांच्या उदयानंतर कॉंग्रेसमधील आपलं महत्व आता घटलं असून सोनिया गांधी कॉंग्रेस अध्यक्ष असेपर्यंत पंतप्रधानपदाचं स्वप्न साकार होणार नाही हे उमजल्यावर पवार यांना सोनिया गांधी याचं ‘परदेशी’पण आठवलं होतं. (राहुल गांधींच्या विरोधामागेही हेच ‘इंगित’ आहे!) सत्तेच्या राजकारणातलं स्थान डळमळीत झालं की शरद पवार यांना समोरच्याची जात आठवते, त्याचा धर्म स्मरतो, कुणाचं परदेशीपण दिसतं आणि त्यांच्याकडून सभ्यता आणि सुसंस्कृतपणाची पातळी सुटते हा असा अनुभव आहे.

राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचा उदय होईपर्यंत (ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या भाषेत सांगायचं तर-) ‘मराठा-महार-माळी’ अशी मोट बांधून सत्ता कायम आपल्याकडे राखायची, असं कॉंग्रेसमधील मराठ्यांचं योजनाबद्ध आवडतं समीकरण होतं. याच समीकरणाचे शरद पवार हे एक वारसदार. सत्तेचं हे मराठाप्रणित समीकरण मोडण्याचा मान गोपीनाथ मुंडे यांचा. जातीचं एक नवं समीकरण त्यांनी राज्याच्या राजकारणात रूढ केलं. ऐंशीच्या दशकात पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यावर त्यांनी सत्तेपासून कायम वंचित असणाऱ्या छोट्या व मध्यम जातींना संघटित केलं. त्यामुळे दोन गोष्टी घडल्या- एक म्हणजे ‘भटा-ब्राह्मणां’चा पक्ष ही भाजपची प्रतिमा पुसली गेली आणि बहुजनांचा पक्ष असा चेहेरा भाजपला मिळाला. सेनेशी युती झाल्यावर तर हा चेहेरा अधिक उजळला कारण सेनेत जात-धर्म बघून निवडणुकीत उमेदवारी दिली जात नाही. दुसरं म्हणजे, उपेक्षित छोट्या आणि मध्यम जातींना राजकारणात स्थान मिळू लागल्यान ही म्हणजे ‘माधव’ मोळी, ‘मराठा-महार-माळी’ या मोळीपेक्षा म्हणजे कॉंग्रेसजनांना, डोईजड होईल अशी मोठी आणि बळकट झाली. त्यामुळं ‘बहुजनांचं राजकारण’हा नवा प्रभावी गट राजकारणात आला. यातून राज्यातील कॉंग्रेसच्या मराठा लॉबीसमोर एक मोठं आव्हान उभं करण्यात मुंडे यशस्वी झाले. याला उत्तर म्हणून छगन भुजबळ यांना शरद पवार यांनी पुढे केलं. पण, नंतर (गोपीनाथ मुंडे यांच्याशी अघोषित युती करून) छगन भुजबळांनीच त्यांची ताकद अशी काही वाढवली की शरद पवार यांचासमोर भुजबळ नावाचं एक आव्हान निर्माण झालं. राजकारणात कोणी डोईजड होऊ लागला की मग समानतेचा विचार बाजूला ठेऊन राजकारणातल्या सोंगट्या हलवणं आणि आव्हान लहान करणं हाही शरद पवार यांचा आवडता खेळ आहे. यासंदर्भातली एक उपकथा अशी- भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना दिल्लीच्या महाराष्ट्र सदन बांधकामात केलेल्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश तत्कालिन गृहमंत्री आर.आर, पाटील यांनी २१ सप्टेबर २०१२ रोजी दिले असल्याचं मंत्रालयात बोललं जातं. शरद पवार यांना सांगितल्याशिवाय किंवा पवार यांनी सांगितल्याशिवाय स्वपक्षाच्या बड्या नेत्याविरुद्ध असा आदेश आर. आर. यांनी दिला नसणार हे उघड आहे. म्हणूनच महाराष्ट्र सदन चौकशीचे समन्स आल्यावर प्रतिक्रियेत भुजबळ यांनी ‘खंजीरा’चा सांकेतिक वापर केला होता. राज्यात वसंतदादा पाटील यांचे सरकार पडून ‘पुलोद’चं सरकार स्थापन होणं हा राजकारणातला ‘खंजीर प्रयोग’ म्हणूनही ओळखला जातो, असा तो संदर्भ आहे.

अलिकडच्या काही वर्षात गोपीनाथ मुंडे यांना पर्याय म्हणून शरद पवार यांनी ‘शहनशाह-ए-वाचाळ’ जितेंद्र आव्हाड यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला पण, ‘आडातच नसल्यानं पोहोऱ्यात येणार कुठून’, या न्यायानं तो फसला. नंतर मोदी लाट, मुंडेंचा बहुजन प्रयोग, आधी रामदास आठवले मग, राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यांची मोट भाजपसोबत बांधली जाणं, या आणि अशा अनेक कारणांमुळे लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रात दणकून मार पडला. सेनेला डावलून सत्तेत वाटा मिळवण्याचा शरद पवार यांचा घाईघाईत झालेला प्रयत्न भाजप-सेनेनं हाणून पाडला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे या पक्षांशी जोडलेल्या मराठ्यांच्या हातची सत्ता दीर्घकाळासाठी गेली आणि त्यात जखमेवर मीठ म्हणजे, महाराष्ट्राचं नेतृत्व एका ब्राह्मणांच्या हाती आलं! आता तर सत्तेतले सेना-भाजप आपापसात इतके भांडत आहेत की ‘सत्तेतलाच विरोधी पक्ष’ अशी नवी ‘टर्मिनॉलॉजी’च महाराष्ट्रातल्या राजकरणात उदयाला आली असून, विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्व नगण्य ठरलं आहे!

गोपीनाथ मुंडे यांना अंडरएस्टीमेट करण्याची जी चूक शरद पवार यांच्यासकट सगळ्या कॉंग्रेसजणांनी केली त्याचीच पुनरावृत्ती देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घडली आहे. कालचा हा ‘बच्चा’ (पक्षी : देवेंद्र फडणवीस) भारी पडेल अशी अपेक्षा बाळगली जात नव्हती; बच्चा फेल जाणार(च) आणि दुसरा मराठा मुख्यमंत्रीपदी येणार याची खात्री होती; भाजपातले दोघे-तिघे मराठा मुख्यमंत्री होण्यासाठी बाशिंग बांधून तयार होते पण, त्या आशेचा पार धुव्वा उडाला. चुचकारत का होईना शिवसेनेला बांधून ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले आहेत. त्यात सेनेला आणखी वाढू न देणं आणि सत्ता टिकवण्यासाठी अन्य कुणाची म्हणजे राष्ट्रवादीची मदत घेण्याची वेळ न येऊ देणं असे भाजपचे दोन हेतू दिसत आहेत. बाय द वे- माझ्याकडे असलेल्या ‘ऑफ द रेकॉर्ड’ आणि ‘अनकन्फर्म’ माहितीनुसार डिसेंबरच्या आसपास सेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत सेना आणि भाजप याच दोन पक्षात प्रमुख लढत होईल आणि निवडणुकीनंतर पुन्हा युती होईल, अशीही एक शक्यता असल्याचा हा संकेत आहे.

जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेनंतर मराठ्यांच्या ताब्यातील साखर आणि अन्य सहकार क्षेत्राला फटका बसला. मग, सहकारातला हा सधन मराठा वर्ग शिक्षण क्षेत्रात शिरला. फडणवीस सरकारने (पक्षी : शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणजे, मराठा!) नवा शिक्षण कायदा आणून खाजगी शिक्षण संस्थातील प्रवेशावर सरकारचं नियंत्रण, सरकारच्या संमतीशिवाय शुल्क वाढ नाही, उल्लंघन केल्यास दंड व शिक्षेची तरतूद आणि मान्यता रद्द करण्याची टांगती तलवार अशा मुसक्या आवळल्या आहेत. सहकारी संस्थातील (इथेही पक्षी : सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे, पुन्हा मराठाच!) गैरव्यवहार करणाऱ्या संचालकांना दहा वर्ष निवडणूक लढवण्यास आणि मतदानापासून वंचित ठेवण्याचा दणका दिला. शिक्षण व सहकारी कारखाने-बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या हे ग्रामीण आणि निमग्रामीण राजकारणावर हुकमत ठेवण्याचं कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांचं एक प्रमुख हत्यार आहे. शिक्षण आणि सहकारावर नियंत्रण आणल्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अड्डे झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली आहे; इथेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणजे, लोहा लोहे को काटता है! राजकारणात सोशल इंजिनीअरिंग हा शरद पवार यांचा हातखंडा प्रयोग. पण भाजपनं रामदास आठवले, राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत असा खेळ मांडला आणि परतीचे दोर कापून टाकत सत्तेच्या दरवाज्यावर या सर्वांना ताटकळवत ठेवलं. हे कमी की काय म्हणून नरेंद्र जाधव, डॉ. विकास महात्मे आणि आता तर साक्षात शिवाजी महाराजांच्या वारसदारालाच खासदारकी दिली; नवबौद्ध-धनगर आणि मराठा असा टोला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्मावर बसणं स्वाभाविकच होतं.

एका ‘बच्चा’ एका पाठोपाठ एक असे जोरदार धक्के देत असल्यानं शरद पवार यांची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी होणं, अपरिहार्यच आहे. अशा अवस्थेत त्या माणसाच्या मुखातून जीवघेण्या वेदनेचा हुंकार बाहेर पडतो, असं वैद्यक शास्त्र सांगतं. ‘छत्रपती-पेशवे’ हे शरद पवार यांचे कुत्सित उद्गार अशाच वेदनेनं तळमळणाऱ्या राजकारण्याचे हुंदके आहेत आणि त्यामागची वेदना आपण समजून घेतली पाहिजे शिवाय, बहुसंख्य जनतेला पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत असत की पेशवे छत्रपतींची नियुक्ती करतात यात आता काहीही रस नाहीये.

शेवटी- देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिलेल्या उत्तराचं मिडियात फार कौतुक होतं आहे पण, ते उत्तर राजकारणात मुरल्याचं आणि वास्तवाचं भान असल्याचं लक्षण नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे छत्रपतींचे नव्हे तर रयतेचे सेवक आहेत! राजेशाही आणि पेशवाई इतिहासजमा झाली असून आपण आता लोकशाहीत राहतो आहोत. कुणा राजा किंवा पेशव्यानं, कुणा मंत्र्यांना सरकारात किंवा अधिकाऱ्यांना प्रशासनात ‘नियुक्त’ केलेलं नाहीये; हे सरकार रयतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं आहे, याचा विसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी-कध्धीच पडू देता कामा नये.

===अधिक संदर्भासाठी वाचा-
(१) (महा)राष्ट्रावादी निराशा – http://goo.gl/3PD9Zz (२) पवारांना पर्याय नाही! – http://goo.gl/KtHcRW

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९
[email protected]
भेट द्या- www. Praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट

 • Mahajan Milind….
  बदलत्या परिस्थितीत आपल्या हाती काही च पडत नाही आणि कूणी विचारत नाही ही घालमेल पदोपदी व्यक्त होत राहते

 • Sushilkumar Redasni ·….
  एक नंबर

 • Tanmay Deodhar ….
  Sunder lekh

 • Kalyanee Hardikar ….
  Kitti nemki mrme ulgdlit…
  Chan lekh!!!!

 • Avadhut Prabhakar Galphade….
  लोकशाही सर्व-मान्य आहे . भारतीय लोकशाही ही भारताची शान आहे , असे आपण जगाला अभिमानाने सांगतो . असे असतांना एका केवळ तीन टक्के असलेल्या ब्राह्मण समाजाचे विरोधात बहुसंख्य विचारी मराठा समाजाचे माथे भडकवून राजकारण शरद पवार करीत असल्या मुळे , महाराष्ट्राचा कधीही भरुन न येणारा अपमान आणि लोकशाहीची अपरिमीत हानी केल्या गेली आहे . मराठा समाजातील श्री छत्रपती , शाहु महारांजां अभ्यासक आणि आदर्श माननारे जास्त संख्येत असल्या मुळे शरद पवारांना समलेच नाही असे नाही . मतलबी टोळक म्हणजे सर्व समाज या भ्रमात पवारांनी राजकारण केले . मराठा समाजाचे अभिनंदन करणे आवश्यक आहे कारण , त्यांनी बहुसंख्येच्या जोरावर अल्पसंख्यांक ब्राह्मण समाजावर अन्याय करण्यात पवारांना साथ दिली नाही किंबहुना विरोधच केला . मराठा ईतिहासाची शान कायम ठेवली..लोकशाही मध्ये लोकहिताचीच कामे करून हक्काने मत मागणे अपेक्षीत आहे . आपल्या जातीची मते जास्त असल्यामुळे आपण योग्य नेते आहोत असे म्हणताच येत नाही . काही काळ डोकी भडकवून सत्ता मिळते पण त्याचा ना जातीला उपयोग होतो ना जनतेला . लालू – मुलायम हे करतात मग मी का करु नये हा विचारच चुकीचा होता आणि आहे . पवार हे काही लालू-मुलायम नाहीत. मराठा समाज सूध्दा ईतका अपरिपक्व नाही . उगाच लालू-मुलायम यांचा आदर्श ठेवून , श्री छत्रपती आणि शाहु महारांजांचे आदर्शाचे नुकसान झाले.

 • Ganesh Rahane ….
  Khup chan

 • Shreeram Ashtankar ·….
  इतिहास चघळऩे काम कमजोराचे.वर्तमान सुधारने शहानपणाचे

 • Manohar Jaybhaye….
  100% सहमत

 • Shrikant Umrikar….
  नेमके आणि थेट….

 • Nishikant Anant Bhalerao….
  Changale lihiles

 • Jan Sevak Jan Sevak ….
  प्रवीणजी छान लेख। पत्रकार हा कुठल्याही एका पक्षाची बाजू घेणारा नसावा हे तुमच्या लिखाणातून दिसून येते ।

 • Sanjay Patil Kond ….
  अशा कोत्या मनोवृत्तीमुळेच महाराष्ट दिल्लीचे तख्त गाठु शकला नाही अस या पामरास वाटत. बाकी आपण थोर आहातच!!

 • Yashvant Patil ….
  बढिया…

 • Shrikant Chandrayan….
  Badhiya

 • वायाळ आश्रुबा ….
  आवडला

 • Sachin Ketkar….
  युती फुटली तर परत ती होईपर्यंत कुणाच्या पाठींब्यावर राज्य करणार?

 • Narayan Alies Dilip Deodhar….
  काय होणार शेवटी या मराठ्याचं. कै. यशवंतराव शेवट पर्यंत पंतप्रधान होऊ शकले नाहीत. मग आता ?

 • Raja-Shrikant Gijare….
  उत्तम लेख , सर्वानी जरूर वाचावा असा……!!!

 • Rajendra Jawlekar….
  प्रवीणजी एकदम छान , बरोबर लेख लिहीलात.

 • Pradeep Gawande ….
  ही । तो मी नव्हेच। पात्र आहेत।
  Pseudo chatrapati; pseudo Peshawa.

 • Sahebrao Thote….
  छत्रपतीचे पेशवे आहो डाॅ पाटील हा पाटीलच आ

 • Charudatta Jichkar….
  Kon peshwe..? Kon chchatrapati…? rastyawarun chalnarya 10 random lokanna jara hyanche nav vicharun bagha…Bihar chya toppers peksha vait uttar milel !????

 • Madhav Kinhalkar · ….
  Pravin ji, Dr. kinhalkar here. Today read your article. I appreciate the same. wonderful factual article . I posted my reaction on face book on the very day when it appeared in news. same I have posted as comment on your article for your perusal earlier.
  statement and counter statement of Hon. Pawar saheb & hon. chief minister in regard with appointment of Hon. Raje sambhaji as rajya sabha member doesn’t taste good to their statuters. The statement by Hon. pawar saheb although was been done with sarcasm but with political mileage or to score some brownie points against party in power but at the same time what political message he wanted to convey to people of state , Raje sambhaji & hon. chief minister is very clear.
  Hon. chief minister should not have reacted the way he reacted in order to counteract the statement given by Hon. Pawar saheb, as in democratic set up chief minister is the position honoured by people of sovereign country and state to a person and is always of higher than any one in the state even to one who is heir from erstwhile king of kingdom. States chief minister should not have reacted to the statement of Hon. pawar saheb the way he reacted. He should not have forgotten he is at present holding a highest position in democratic set up and people of state honoured him with that position and in any situation he should uphold the honour of common man than heir of erstwhile monarch , I suppose.

 • Manoj Patil · ….
  Pawar Saheb, if you had been given this respect to his honesty Sambhaji Maharaj, you wouldn’t have touch this bottom level of politics, unlike Shri Yashavantrao ji chavan

 • Sharad Deulgaonkar ….
  शरद पवार यांना
  एवढे महत्व आता कशासाठी?
  ओवा खावा
  शरद पवार जिरवावा

 • Bhaskarrao Arbat ….
  Sahi pakade Hai Pradipbhau.

 • Raosaheb Watane ….
  Khara ethihasache vait vatache karn kya? Ugichch boblache. Lokana

 • Narendra Lanjewar….
  सडेतोड माडणी..

 • Giridhar Gogate….
  satta pad nahi aabhav

 • Bhaskar Punde Dishabhool_….
  fakta dishabhool karntasathi “Chhatrapati_Peshva” comment la fodni denyaat aali. Raajyatil itar prashna bajulaa padle. Vishishta varga vinakaran dukhaavla gelaay. Evdhech hote tar Fadnavis he CM che candidate mhanun nivadnukit utraayla pahije hote. Nantar chya election madhe parat ekda CM la candidate mhanun utarava mag apan Gammat pahuya.

 • Uday Bodhankar…. Pity on shri sharadrao for his unwanted Comments

 • Suresh Gawade ….
  तटस्थपणे सडेतोड भूमिका मांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..आज तुमच्या लेख वाचून निष्पक्ष पत्रकारितेची आठवण झाली.

 • Dattatraya Dumbre….
  शरद पवार धुरंधर व्यक्तिमत्व आहे.आजचे पेशवेही त्यांच्याच पाठिंब्यावर तरुन आहेत,याकडेही लक्ष असु द्यात.

  • शरद पवार धुरंदर नेते नाहीत असं मी कधीच म्हटलं नाही , म्हणणारही नाही .
   राजकारणी पवार सर्वांना आवडणारे नाहीत ; त्यातला मी एक पत्रकार-राजकारणाचा अभ्यासक आहे आहे .
   पण , आंधळी किंवा एकारलेली टीका हा माझं स्वभाव नव्हता-नाही-भविष्यातही नसेलच .
   म्हणूनच काही ब्लॉगचे संदर्भ अतिरिक्त वाचनासाठी दिले आहेत .
   आणखी एक देतो- दाऊद प्रकरणी पवारांवर पातळी सोडून आणि गैर टीका झाली तेव्हा गेल्यावर्षीम्हणजे, १८ जुलै २०१५ला मी “पवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…” हा ब्लॉग लिहिला होता .
   त्याची लिंक आहे- http://goo.gl/fsy1CE
   नक्की वाचा !

   • Ramesh Lonkar….
    हे साफ खोटे आहे जर पवार साहेबान शक्य अस्त आणि त्यांचा हातात अस्त तर एक ब्राह्मण माणुस मुख्यमंत्री झाला नस्ता फड़नवीस खुप चांगल काम करत आहेत भविष्यात फडनिस साहेबान हरावण्या साथी पवार सहेबानी जातीच् कार्ड काढल आसव

 • Sagar Muley Patil

  पूर्ण लेख उत्तम रीत्या उतरवला आहे आपण , ९०% योग्य उदाहरणे ही दीली आहेत पन शेवटी , ऱाजे महाराजे , पेशवे इतीहास जमा झाले आहेत , अस म्हणून शेवट जरा कडुच केलात बघा , आता तो माझ्यासाठी कडु कसा हे जर तुम्हाला ठरवायचे असेल तर एक हिण्ट देतो , मि त्याच रयतेत ला एक नागरीक आहे ज्या रयतेने राजे या नावामुळे या सत्तेकडुन आपला कौल दीला , धन्यवाद

  • कृपया लक्षात घ्या , इथे राजे-महाराजे, पेशवे इतिहासजमा झाले म्हणजे आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली असा आहे .

   • Sagar Muley Patil

    आता याचा अर्थ आम्ही असा लावायचा का की शिवाजी महाराजांच्या काळात हुकुमशाही होती म्हनुन ?( आजच्या युगात त्या काळाला हुकुमशाही म्हनत अस्तिल परंतु छत्रपतींनी कधी कुठेही वाईट हेतूने हुकुमशाही गाजवलेले पुरावे आढळत नाही )
    तुमच्या मनात देखिल ही पोस्ट करण्याआधी असे वीचार आले नस्तील हे मिही मान्य करतो , पन शेवटी सगलेच तुम्ही जे दाखवन्याचा प्रयत्न करताय तेच बघतील अस नाहीये.

 • Girish Lad ….
  मी 1996 पासून अमराठी लोकांबरोबर राहिलो आहे, महाराष्ट्राबाहेर फिरतो आहे, त्यामुळं मराठी, महाराष्ट्राकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन बाहेरील अनुभवातून आलेला आहे। अजूनही महाराष्ट्रा बाबत बाहेरच्या राज्यातील लोकांना प्रेम,आदर आहे। पण मी जेव्हा गेल्या 20 30 वर्षांच्या पूर्वीचा आणि आत्ताचा महाराष्ट्र म्हणून विचार करतो तेव्हा अधोगतीच जास्त झालेली दिसते आणि या काळात सगळ्यात महत्वाची भूमिका शरद पवारांची आहे यात कुणाचंही दुमत नसावं। एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणांपेक्षा त्यांच्या कामाची आणि कर्माची नोंद घेतली तर “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा” याचा खरा अर्थ कळू शकेल। वैयक्तिक माणूस म्हणून एखाद्याच कौशल्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एका हुद्द्यावर येण्यासाठी उपयुक्त असते, पण त्यानंतर त्या हुद्याचा, पदाचा वापर कसा आणि कोणासाठी केला, त्याचा परिणाम काय झाला याची मीमांसा केली तर आजच्या आपल्या एकूणच निराशाजनक परिस्थिती ला जवाबदार कोण आहे हे या लेखावरून स्पष्ट होत। म्हणून अजाणती प्रजा आणि ….

 • Santosh Desai ….
  He have not dare to criticise other leader than maharashtra.

 • Surendra Deshpande….
  PAWAR NAVACHE…..JAUDYA TE SUDDDHA KHUP BHAR VAHTAT.

 • Babasaheb Tidke….
  KAHI HI MHANA PAN PESHVHANIHI MOTHE BALIDAN DILE DESHA SATHI CHA SAMBHAJI NANTAR MARATHE KOTHECH DISAT NAHI

 • Dr.Sharad Khare….
  Thrown out of power for long communalist Sharad Pawar is floundering like a fish , therefore the said statement.We must understand.

 • Uday Kulkarni….
  उत्तम लेख, परखड .
  निवडणूकीनंतर लगेच भाजपला पाठींबा देण्यात घाई झाली असं पवारसाहेबांना वाटत असेल का? सेनेचं नाक कापणं हा
  त्यामागे उद्देश होता की सौदेबाजी होती पण ती फेल गेली.

 • Madan Shivam….
  very good analysis of “Janata” Raja’s cast based politics.

 • Adv. Satish Godsay ….
  Well said

 • I have read out your article editorial about above mentioned
  title .you have written fabulous and interesting fact about self said
  Janta Raja of Maharashtra. Who is well playing role of Dhrutrashtra in
  Maharashtra . and now he saw dream to become President of India ,well
  written sir.Thanks for sharing fact.
  Regards,
  Chetan Sharma,
  Jalgaon
  Mob:8605638059.

 • Om Shinde ·….
  काय छान लिहता हो तुम्ही परंतु छत्रपती आनी मराठाव्देष्टा वाटताय तुमचा लिखाणातून.

  • Manohar Jaybhaye ….
   बर्दापुरकर साहेब कुठल्याही राजकीय कींवा जातिय बंधनात संकुचित झालेले नाहित. परंतु तुमच्या चष्म्यामुळे तुम्हाला तसे वाटतेय.
   चष्मा काढून पहा. आणि सत्य पचवायला व विचारवंतांचा सन्मान करायला शिका.

   • Om Shinde …माझी निष्ठा केवळ लेखणीवर आहे , जात-पात-धर्म ना पाळता , राजकीय विचारांची गल्लत न करता पत्रकारिता प्रामाणिकपणे करणं ही माझी बांधिलकी आहे , माझा श्वास आहे . म्हणून मी सर्वांचा आहे आणि कोणाचाही नाही . स्तुती करण्याची वेळ येते तेव्हा माझे विचार खुजे होत नाहीत आणि टीकास्र सोडतांना मी हात आखडता घेत नाही .
    माझ्या गेल्या पावणेचार दशकाच्या पत्रकारितेत मी कोणाचा तरी द्वेष्टा आहे अशी कमेंट करणारे तुम्ही पहिलेच आहात . वरील प्रतिपादन लक्षात घेता आपली कमेंट उथळ आहे . आपण माझं आजवरचं लेखन वाचलेलं दिसत नाही असाही तुमच्या कमेंटचा अर्थ आहे .

 • Prashant Arwey….
  अप्रतिम विश्लेषण

 • Hemant Gadkari ….
  राजकारणात एवढे वर्ष घालवून ही जाती पाती च्या कुबड्यांची यांना आवश्यकता पडते हे दुर्दैव

 • Ramesh Chondekar ….
  Kaka , akdum mast!

 • Amul Pandit ….
  सुरेख आणि परखड विश्लेषण….
  आपण उगाचंच एखाद्याला चाणाक्ष, मुरब्बी समजतो…. पण इथे तर चुकलेल्या बेरजांची संख्याच जास्त आहे….

 • Parmeshwar Munde….
  छत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती हा लेख खूप आवडला. तुम्ही या लेखात राजकारणाची वास्तविक चिरफाड करून जी राजकीय डावपेचाची ऊखल केली ते वास्तविक सत्य आहे.
  सर हा लेख मला मेल करू शकता का ?
  [email protected]
  Mo. 9765467082

 • Swapnil S. Tapadia….
  I read your article about “Peshvyanche chatrapati ki Chatrapati che peshwe”.
  It is really awesome article and explains how Sharad Pwars’s party rules the ruler area.
  keep it up and please send me your article as you published in paper.
  Thanks & Regards

 • मी आपला ‘छञपतींचे पेशवे की पेशव्यांचे छञपती’
  हा लेख वाचन केला खूपच मार्मिक शब्दांत आपण
  शरद पवार हे जातीचे राजकारण कसे करतात व आपली पोळी कशी भाजून घेतात हे ऊदाहरणसह
  दाखवून दिले आहे.
  धन्यवाद!
  – श्री शामसुंदर चमचे(जोशी)
  [email protected]

 • Sudhakar Kulkarni ….
  राज्याभिषेका आचार्यच लागतो
  रामराज्यी राजगुरु वसिष्ठ असतो
  महाभारती द्रोणाचार्य अवतरतो
  सातारी गागाचार्य अनिवार्य होतो