विदर्भवादी अणेंचा वावदूकपणा !

महाराष्ट्राचा स्थापना दिवस असलेला १ मे, विदर्भात काळा दिवस म्हणून पाळला जाण्याच्या आंदोलनाचा फज्जा उडाला असला तरी राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे कोणताही धडा शिकणार नाहीत. याआधीच्या अपयशातून विदर्भवादी धडा शिकले असते तर पुन्हा या चळवळीनं तोंड वर केलं नसतं पण, जित्याची खोड जात नाही म्हणतात तेच खरं. निवडणुकीत आपटी खाणार याची शंभर टक्के खात्री असणाऱ्या उमेदवाराकडे निवडणूक जिंकण्याची १०१ टक्के आशा आणि आपण निवडणूक जिंकणारच हे कार्यकर्त्यांना देण्यासाठी फुसकं अवसान १००१ टक्के असावंच लागतं, तसं काहीसं श्रीहरी अणे यांचं झालेलं आहे.

श्रीहरी अणे हा नवीन चेहेरा आता सोशल मिडियापुरत्या अस्तित्व असलेल्या या स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला (भाजपच्या सौजन्यानं ?) मिळाला आहे. महाधिवक्ता असताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अफाट प्रसिद्धी मिळाल्यानं अणे सध्या बरेच चळल्यागत वागत असल्याचा अनुभव येतोय. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना ‘चोर’ संबोधनं, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा जाळणं, महाराष्ट्राचा केक कापत संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे झाल्याचे संकेत देणं, असे उथळ उद्योग करून अणे यांनी स्वत:ची प्रतिमा मलीन करून घेतली आहे. श्रीहरी अणे हे सज्जन आणि विद्वान आहेत असा जो समज आजवर होता, तो चुकीच असून वावदूकपणा हे त्यांच्या स्वभावाचं व्यवच्छेदक लक्षण असल्याचं आता सर्वांना ज्ञात झालंय. केक प्रकरणात महाराष्ट्राची आता अणेंनी माफी मागितली असली तरी ‘जो बुन्द्से गयी, वो हौदसे नही आती’, हे अणेंनी लक्षात घ्यावं. महाधिवक्ता म्हणून मिळालेले सर्व लाभही त्यांनी परतफेड करून माफीचा हौद भरायला हवा.

दुसरा एक मुद्दा नैतिकतेचा आहे. श्रीहरी अणे नामवंत घटना तज्ज्ञ आहेत. वकील म्हणून ते मुंबईत व्यवसाय करतात. म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह मुंबईत म्हणजे, ज्या महाराष्ट्राच्या भरंवशावर होतो तो महाराष्ट्र तोडण्याची भाषा ते करत आहेत. हे अनैतिक तर आहेच. ज्या ताटात जेवण करतात त्याच ताटाला छिद्र पाडण्याचे उद्योग अणे करत आहेत आणि याला परखड भाषेत ‘खाल्ल्या मिठाला न जागणं ’ असंही म्हणतात. हे वागणं असंच सुरु राहिलं तर स्वतंत्र विदर्भाची चळवळ चालवणाऱ्या श्रीहरी अणें यांची उरली-सुरली विश्वासार्हता लवकरच संपुष्टात येईल हे सांगण्यासाठी कोणा कुडमुड्या ज्योतिषाचीही गरज नाही.

विदर्भात एक वार्ताहर ते संपादक असा माझं २६ वर्षांचं वास्तव्य दोन टप्प्यात झालं. नरेंद्र तिडके, भगवंतराव गायकवाड ते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार असं एक सत्तेतलं राजकीय वर्तुळ विदर्भात पूर्ण होताना या काळात अनुभवता आलं, वटवृक्ष ते झुडूप असा कॉंग्रेसचा आणि नुकतंच पेरलेलं बी ते डेरेदार वृक्ष, या भाजपच्या प्रवासाचा एक पत्रकार म्हणून साक्षीदार होता आलं. विविध चळवळी आणि सांस्कृतिक घडामोडींचं वृत्तसंकलन करतानाच या क्षेत्रात सक्रीय कार्यकर्ता असा माझा वावर राहिला. या चळवळीत स्वतंत्र विदर्भाचीही चळवळ आलीच. माझं आजोळ विदर्भातलं. राजकारण, स्वतंत्र विदर्भ वगैरे कळायचं नाही पण, आजोळी गेलं की जांबुवंतराव धोटे यांची क्रेझ अनुभवायला मिळायची. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीची चळवळ सुरु असतानाचा एक प्रसंग आठवतो. माझा मामा, अशोक खोडवे तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेडला नोकरीला होता. आठवडी बाजारालगतच त्याचं वास्तव्य होतं. एकदा रात्री बाजारभागात जांबुवंतराव धोटे यांच्या सभेला मामासोबत गेलो होतो. अचानक विद्युतप्रवाह खंडीत झाला. ‘घाबरू नका, आया-बहिणींनी जागा सोडू नये’, असा जांबुवंतराव यांचा आवाज घुमला. काही मिनिटातच अनेक लोक पेटलेल्या मेणबत्त्या घेऊन उभे राहिले आणि जांबुवंतराव धोटे यांचं आवेशपूर्ण भाषण पुढे सुरु झालं. त्या मिणमिणत्या प्रकाशात धिप्पाड शरीरयष्टीचे, दाढीधारी जांबुवंतराव एखाद्या ग्रीक योध्यासारखे भासले तेव्हा…५०-५२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग मनावर कायमचा कोरला गेलेला आहे. जांबुवंतराव धोटे आणि अन्य पक्ष यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा पोत वेगळा होता. धोटेना विदर्भ वेगळा हवा होता पण, त्यामागे राजकीय लाभ मिळवण्याचा त्यांचा कावा नव्हता म्हणूनच बहुदा, जनतेचा त्याना मोठा पाठिंबा मिळाला. जांबुवंतराव धोटे कॉंग्रेसमध्ये गेले आणि सारं बिनसलं. जांबुवंतराव धोटे कॉंग्रेसमध्ये न जाते आणि चळवळीतच राहते तर, कदाचित फार मोठं आंदोलन उभं राहून एव्हाना विदर्भ वेगळा दिसला असता असं कधी कधी वाटतं. क्षीण झालेल्या स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला अणेंच्या रुपात दुसरे जांबुवंतराव धोटे मिळाले…चळवळीला प्राणवायू मिळाला, असं वाटलं म्हणून विदर्भवाद्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. पण, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसोबत मराठवाड्याला जोडण्याची चूक अणेंनी केली. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता आणि विश्वासार्हता घसरणीला लागली. म्हणूनच १ मे हा काळा दिवस पाळण्याच्या आंदोलनाला अपेक्षित यश मिळालं नाही.

पत्रकारितेच्या अडीच दशकात मी अनुभवलं की, कॉंग्रेसजनांनी या चळवळीचा वापर केवळ पक्ष किंवा/आणि सत्तेतील पदप्राप्तीसाठी केला, तसं तर तो अनुभव सार्वत्रिक आहे. कॉंग्रेसच्या एकाही आमदार-खासदारानं, कोणत्याही मंत्री-नेत्यानं कधी या मागणीसाठी पदाचा राजीनामा देण्याची उत्कटता दाखवली नाही की कोणी रस्त्यावर उतरलं नाही. जनमत स्वतंत्र विदर्भाच्या बाजूनं आहे असा दावा कॉंग्रेसचे अनेक नेते करत पण, त्यासाठी तयार मात्र होत नसत. एकदा मुंबई दूरदर्शनवरील झालेल्या चर्चेत, ‘दिल्ली आणि राज्यात सरकार तुमचंच आहे. मग तुमच्या सरकारकडे तुम्ही जनमताची ही मागणी रीतसर का करत नाही ?’ असा सवाल मी वसंतराव साठे यांना केला. तेव्हा ‘मी का करू मागणी ?’ असा प्रतिसवाल त्यांनी केल्यावर, ‘तुम्ही जनमताच्या कौलाला घाबरता आहात’ असा थेट हल्ला केल्यावर त्यांनी ताडकन फोन बंद केला होता. परिणामकारक आंदोलन उभं करण्यापेक्षा कॉंग्रेसच्या प्रत्येक नेत्यानं स्वस्वार्थासाठी या मागणीच्या चळवळीची ज्योत कायम ‘जेमतेम’ तेवत कशी राहील याची काळजी घेतली. म्हणूनच लक्षात घ्या, एरव्ही या मागणीसाठी आग्रही असणारे दत्ता मेघे-रणजित देशमुख, अगदी विजय दर्डा, विलास मुत्तेमवार हे नेते आणि त्यांच्या समर्थकांच्या टोळ्या काळा दिवस पाळण्याच्या अणेंच्या आवाहनावर मूग गिळून बसलेल्या होत्या. तसंही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं अस्तित्व विदर्भात तेल संपत आलेल्या मिणमिणत्या पणतीसारखं झालंय, त्यामुळं आता विदर्भ महाराष्ट्रात राहिला काय आणि नाही काय याबद्दल या दोन्ही पक्षांना तीळमात्र रस उरलेला नाही. जनमताची गुळमुळीत पळवाट या दोन्ही पक्षांनी शोधली आहे.

विदर्भाच्या बाजूनं दहा लाख मतदान झाल्याचं अशात झालेल्या एका जनमतात सिद्ध झाल्याचं सांगण्यात येतं पण, विदर्भाच्या सुमारे साडेतीन-पावणेचार कोटी लोकसंख्येपैकी केवळ (संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह) दहा लाख अनुकूल म्हणजे, तीन टक्क्यांपेक्षा कमीच लोकांचा स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा आहे म्हणजेच, मतदान न करणाऱ्या ९७ टक्क्यांचा विरोध आहे, हा त्याचा दुसरा अर्थ. महत्वाची बाब म्हणजे, अलिकडच्या काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत स्वतंत्र विदर्भ हा अजेंडा घेऊन उतरलेल्या सर्व उमेदवारांना मिळून लाख-दीड लाखापेक्षा मत मिळालेली नाहीत. जिज्ञासूनी आकडे काढून बघावेत.

मी विदर्भात वावरलो ते संयुक्त महाराष्ट्राचा कट्टर पुरस्कर्ता म्हणून. ज्या दैनिकाच्या संपादकांनी बेळगाव साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला ते तरुण भारत हे दैनिक स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला अनुकूल झालं तरी आधी एक वार्ताहर आणि नंतर संपादक म्हणून मी स्वतंत्र विदर्भाचा कट्टर विरोधक म्हणूनच अनेकदा एकांडा वावरलो. आता मी जे स्पष्ट सांगणार आहे त्यांचा इन्कार करायला गोपीनाथ मुंडे हयात नाहीत आणि नितीन गडकरी म्हणणार, त्यांनी तसं काही केलं नाही. (पण, हे या आधी एकदा लिहिलं तेव्हा ते वाचल्यावर या दोघांनीही त्यांचा इन्कार केलेला नव्हता !) आता पुन्हा लिहितो, जेव्हा जेव्हा मी स्वतंत्र विदर्भाला विरोध करणारं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ लेखन केलं तेव्हा, त्यावर अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त करणारा पहिला फोन मुंडे किंवा गडकरी यांचा असे !

भारतीय जनता पक्ष तत्वत: छोट्या राज्यांना अनुकुल असला तरी किमान महाराष्ट्रात तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मोजक्या आणि त्याही विदर्भातीलच काही नेत्यांचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील बहुसंख्य भाजप नेत्यांचा स्वतंत्र विदर्भाला केवळ व्यासपीठीय पाठिंबा होता हा अनुभव आहे. नारायण राणे विरोधी पक्ष नेते असताना, विधि मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भाचं समर्थन करणारं वक्तव्य केलं, तेव्हा नारायण राणे काढलेल्या ‘आवाजा’नं फडणवीस कसे बावरले होते आणि भाजपचे बहुसंख्य आमदार कसे सुखावले होते, हे अजून अनेकांच्या लक्षात आहे. ज्या भाजपच्या पाठिंब्यावर मुंबईत बक्कळ चालणाऱ्या वकिलीवर पाणी सोडून श्रीहरी अणे लढायला निघाले आहेत त्या भाजपच्या विधिमंडळ पक्षातही स्वतंत्र विदर्भाचा ठराव नामंजूर होईल अशी स्थिती आहे, हे श्रीहरी अणेंनी लक्षात घ्यावं.

शिवाय ज्या विकासाच्या मुद्द्यावर श्रीहरी अणें विदर्भ वेगळा करण्याची मागणी करतात त्या निकषावर मराठवाडा आणि कोकण जास्त मागासलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जत, आटपाडी, वाळवा, मोहोळ भागात अजूनही पाणी नाही, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणारा आदिवासी विकास नावाच्या कोणत्याही सुविधांपासून शेकडो मैल दूर आहे. नागरी सुविधांचा विचार केला तर खुद्द मुंबई शहरात धारावी, मालवणी हे भाग आणि शेकडो झोपडपट्ट्यात पाणी, वीज सारख्या मुलभूत नागरी सुविधा नाहीत म्हणून लाख्खो मुंबईकर अंगावर कांटा येईल असं किड्या-मुंग्यांसारखं जीवन जगत आहेत. मराठवाड्यात तर दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आहे आणि कोकणवासियांचं पोट अजूनही मुंबईतल्या चाकरमान्यांवरच अवलंबून आहे. लांब कशाला, खुद्द विदर्भात नागपूर-अमरावतीला झुकतं माप दिलं जातं अशी तक्रार बुलढाणेकर करतात आणि बुलढाणा जिल्हा मराठवाड्याला जोडा म्हणतात. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांचं मिळून वेगळं आदिवासी राज्य व्हावं अशी मागणी अधूनमधून होत असते, मग श्रीहरी अणें विदर्भही तोडून देणार का ? प्रत्येक विभाग, जिल्हा, तालुका विकासाच्या बाबतीत एका पातळीवर नाही म्हणून प्रत्येक जिल्ह्याकडून स्वतंत्र होण्याच्या मागण्या केल्या जाव्यात का ?

भारतीय जनता पक्षाच्या भरंवशावर स्वतंत्र विदर्भाच्या दोरीवरच्या उड्या मारण्याचा खेळ श्रीहरी अणेंनी थांबवावा हा (मित्र म्हणून फुकटचा) सल्ला आहे. तीच दोरी पायात अडकवून भाजपवाले कधी अणेंना तोंडघशी पाडतील याची काहीही खात्री नाही. हवं तर, महादेव जानकर, विनायक मेटे, रामदास आठवले यांना विचारून बघा !

-प्रवीण बर्दापूरकर
————–

विदर्भवाद – एक आवाहन
‘विदर्भवादी अणेंचा वावदूकपणा !’ या माझ्या आजच्या स्तंभातील मजकुराचा प्रतिवाद करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे .
श्रीहरी अणेंच्या काही सहकाऱ्यांनाही माझ्या मजकुराचा प्रतिवाद व्हावा असं वाटतं , हे श्रीहरी अणे आज माझ्याशी बोलताना म्हणाले .
सर्व प्रतिवादाचं स्वागत आहे कारण , माझ्या मताचा प्रतिवाद करण्याचा प्रत्येकाचा हक्क मला पूर्णपणे मान्य आहे .
१- साधारण ४०० शब्दांपर्यंत मजकूर मराठीत ‘युनिकोड’ मध्ये पाठवावा . शक्यतो मजकूर जशाचा तसा प्रकाशित केला जाईल . आलेल्या मजकुराचा कोणत्याही प्रकारानं मी अनुवाद करणार नाही याची नोंद घ्यावी .
२- प्रतिवाद म्हणजे अर्वाच्चपणा , आक्रस्ताळेपणा नव्हे, याचं भान बाळगावं आणि सुसंस्कृतपणाची पातळी न सोडता प्रतिवाद केला जावा .
३- फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रिया ब्लॉगच्या कमेंटमध्ये मी ‘कट-पेस्ट’ करून समाविष्ट केल्या आहेत . प्रतिवादात त्या व्यतिरिक्तच मुद्दे यावेत अशी अपेक्षा आहे .
आणि हो-
४- पुढच्या आठवड्याच्या मजकुरातही मी ‘विदर्भ-पुराण’ सुरुच ठेवणार आहे .
-प्रवीण बर्दापूरकर

[email protected]
​9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com
कृपया वाचा- www.praveenbardapurkar.com/newblog

संबंधित पोस्ट

 • Akash Khawale….
  फुकटाचे सल्ले विदर्भात खपत नाहित भाउ

 • Thakur Vishwajeet Singh….
  100% सहमत

 • Avadhut Prabhakar Galphade….
  नाही बाॅ , हे म्हणणे काही पटले नाही . मुख्य म्हणजे अणे हा काही राजकीय पक्ष नाही , त्यांचे पक्षाचे कोणीही आमदार नाही . त्यांनी तशी मागणीही केली नाही . त्यामुळे , जी उदाहरणे देण्यात आली ती संपुर्णतः गैरलागु आहेत. विदर्भ राज्याची मागणी काही राजकीय मुद्दा नाही . तो अन्याय करणारे नेतेच राजकीय बनवितात. जसे आज पवार सत्तेत नाहीत आणि त्यांचा पक्ष सुध्दा भविष्यात २५ वर्षे सत्ते नसेल तर , तेवढ्या पुरता केवळ थंड बस्त्यात पडेल एवढेच. कारण विदर्भाच किमान ३ते ४ पिढ्यांचे न भरुन निघणारे नुकसान , मुत्सदीपणाचा आव आणून ठरवून केले आहे . केवळ मुंबई-पुणे-नाशिक एवढा महाराष्ट्राचा १०ते १२ % महाराष्ट्र सोडला तर विदर्भा सारखेच हाल करून ठेवले आहेत. या विषया संबंधी प्रतीक्रीया बहुतेक , आता तर मुख्यमंत्री विदर्भाचा आहे . त्यांचा हा उक्तिवाद हे ढोंग आहे . सी एम कोण असावा हा मुद्दाच नाही . आज विरोध करणारे अन्याय होतांनाचे सहकारी जरी नसले तरी , ज्या अधिकाराने विरोध करतात तसा , त्या वेळेस केला असता तरच आज तो अधिकार आज मिळाला असता. त्या मुळे व्यरोधातील प्रतिक्रियांना महत्व देण्याचे कारण नाही . राहीले ते अणे – काहिही असो , विदर्भासाठी चर्चेत आले हे ही नसे थोडके.

 • Mahajan Milind ….
  Sir agadi khare

 • Sunita Kathane ·…
  Swatantra vidarbh nko mhannarya 97% madhe…aamhi suddha aahot…!

 • Pratap Tate ·….
  अगदी बरोबर आहे

 • डॉ पंकज भोयर ·….
  साहेब हे काही पटल नाही

 • Ramesh Chondekar Aadarniya Pravin sir, aaple mhanane patle nahi….karan
  1) Ane kuthunhi pot bharat asale tari te tyanche kartutva aahe , tevha “khallya mithala jagne” vaigere kahi mhani tyanchyababatit lagoo padat nahit.
  2) Ane saheb je karat aahet tyat tyancha vaiyaktik swarth asala tari to amhala manya aahe. Kunitari Vidarbhavar honarya anyayane petun uthale he ithe mahatvache aahe.
  3) Swatantra Vidarbhamule Buldhana kinva Adivasi bhag ha upekshit rahil ashi kalpana chukichi vatate. Rashtravadyansarkhi, va congress sarkhi ghodchuk amhi karnar nahi
  4) Pani nahi mhanun jya bhagachi tumhi nave ghetli (uda. Dhule , Nandurbar) ti durgam aahet ase tumhich lihilaya. AHO YANI SUGAM BHAGAT PANI (Uda. YAVATMAL, VARDHA) AANALE NAHI tar DURGAM bhag durach rahila.
  5) Jambuvantrao Dhote jase tumhala javalache vatatat tashech Ane saheb amhala vatatat. Tyana kunihi tondavar padle tari harkat nahi , tya pakshachi khari kimmat amhala kalel. Vidarbhachya janatela kalel va ya vidarbhavadi andolanchi vat adhik prakhar karayla hava milel. HEHI NASE THODKE

  • चैतन्य भुरे ·….
   विदर्भ फक्त तुझा किंवा अणेचा नाही
   तो आमचा पण आहे विदर्भात राहणार्या प्रत्येक मराठी माणसाचा आहे. भाषा आणि अभिमान विकुन जर विदर्भ वेगळा करायचा विचार कराल तर याद राखा तुमच्या सारखा संडासात बसुन जय विदर्भ करणार नाही तर चौकात येऊन जय महाराष्ट्र काय असते ते शिकवु आणि महाराष्ट्र दिनी दाखवलच आम्ही
   तुम्ही किती पण आपटा फक्त १० १५ परप्रांतिय ज्यांच ह्या महाराष्ट्राशी काही घेण देण नाही अश्या लोकांना घेऊन तुम्ही मराठी राज्य तोडु शकत नाही तुम्ही स्वप्न बघा

 • उल्हास शंकरराव रामदासी ….
  वेगळा विदर्भ भाजपा करणार ही अफवा उठवणाऱ्यांनो हे वाचा

 • uvaraj Selukar…..
  Sarvat pratham jatnare vidarbhveer jambuvantrao dhote he kuthe gelet pahile tyanna pakda nantar tumhi samor ya

 • jay deshmukh

  प्रवीणजी तुमचे खुपशे मुद्दे पटले, मी देखील 1 नागपूरकर/अमरावतीकर पुण्याला job निमित्या settle झालो आहे.
  वेगळा विदर्भ मागणार्यानी जरा घरा बाहेर निघून महाराष्ट्र पालथा घालावा आणि मध्य प्रदेश ज्या पासून आपण वेगळे झालो होतो त्याची पाहणी करावी. विदर्भ चा GDP nearly ओदिसा इतका आहे आणि ते पण area कमी असताना.
  Don’t consider yourself backward(its good only to get more fund from state), we are much ahead from many part of Maharashtra.
  Heavy Industrialzation of vidarbha is not possible now consider agricultural at core for development.
  We nearly contribute half of BJP seat in assembly त्यामुळे त्यांना मुंबई वर राज्य करता येते. So विदर्भ वेगळा कर्ण त्यांना परवडणारं नाही. Same thing Congress.

  • मी आपल्या म्हणण्याशी पूर्णपणे सहमत आहे . मी विदर्भात आलो , तिथलं वास्तव अनुभवलं मग राज्यात , देशात फिरलो आणि खप साऱ्या बाबी जाणून घेतल्या . मग पूर्ण अभ्यासांती स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात गेलो . आपल्या राजकीय इच्छाशक्तीच्या कमकुवतपणाचं खापर विकासाच्या नावाखाली अन्य कोणावर फोडता येणार नाही . काही मुद्दे पुढच्या ब्लॉगमध्ये येणारच आहेत .

 • Manoj Joshi ….
  महाराष्ट्राने विदर्भाचा ईतीहास दडपून आपला पुणेरी ईतीहास आम्हावर लादला.
  शाळेत पाठ्यक्रमात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज ,शाहू महाराज , पेशवे,गायकवाड , सिंदे,होळकर ,जेधे, मोरे,आंग्रे सगळ्यांना शिकविले .
  पण नागपूरकर राजे भोसले,गोंडरानी हिराई,राजा बल्लाळशाह बिरशहा,माहूरची रानी,
  यांचा ईतीहास सोईस्कर रित्या लपवल्या गेला.
  महाराष्ट्रातील स्वतंत्रता लढ्याचे गोडवे गाल ..ते क्रांतिकारी महान होतेच
  पण विदर्भातील चिमूरची क्रांती , हुतात्मा बाबूराव शेडमाके हे का नाही शिकवल्या जात
  आहे का कूठे रितसर उलैख
  राष्ट्र संत तुकडोजी महाराज ,विनोबा भावे व गाडगे बाबांचा वेळोवेळी कडिपत्यासारखा वापरच केला गेला .
  आपल्या गळी वर्हाडी भाषा डावलून पुणेरी भाषा उतरवली.
  वेळोवेळी वैदर्भीय साहित्याची ,झाडीपट्टी नाटकांची,वर्हाडी गावंढळ ठरवली ,भाषेची टर उडवली .
  कविवर्य विठ्ठल वाघ , भट यांचा कित्येकदा प्रत्यक्ष अपमानीत केले गेले त्यांनी स्वत मैफीलीत बोलले.
  विदर्भात त्रेतायूगापासून असलेले जागृत गणपती (कळंब.केळझर) मंदीराला बगल देत फक्त महाराष्ट्रातील अष्टविनायक नावाने प्रसिद्ध केले.
  मार्कंडादेव ,अंचलेश्वर मंदीर,रामटेक ,भद्रावती नागमंदीर सारखे पुरातन कोरिव बांधकाम ऐवज भंगारा सारखे पडून आहेत , यांचे उद्धार कधी होणार .
  अरबी समुद्रात छत्रपतींचा खुशाल पुतळा उभारा आमचा विरोध नाही ,
  पण विदर्भात ज्यानी व्यवस्था उभी केली आशा व्यक्तीच्या समाधीवर दिवाबत्तीची तरी कमीतकमी सोय करा.
  कुठवर सोषित जगणे
  कुठवर खरकट खायचं
  कुठवर झळ सोसायची
  युवकांनो चला विदर्भाच्या चळवळीत शामिल व्हा
  विदर्भ आमच्या हक्काचा
  नाही कुणाच्या बापाचा
  जय विदर्भ

  • ही एक बाजू आहे पण , त्याचा प्रतिवादही आहे . त्यावर कधी तरी येईनच !

   • Avadhut Prabhakar Galphade ….
    आता तर न्याय मागायला सुरवात झाली , अशीच सडेतोड मांडणी अपेक्षित आहे . विरोध करणारे संख्येत ही जास्त नाही , ताकतीत ही नाही आणि विवेक तर अजिबात नाही.

  • Ramesh Chondekar….
   Manoj Joshi sir 1 number

 • Sanket Sarode ·….
  Hemant ji mi konacha koni nahi tar ek vidarbhat sandhi naslya mule tatpurta mumbait sthalantar zalela vaidarbhiy vidyarthi.MNS chi pokal bomba maraychi style soda aani vidarbhatlya gramin vidyarthan sathi kahi kara.Marathi asmitecha abhiman sarvannach aahe,kharach pramanikpane awaz uchalala asta tar vidarbhachya gramin vidyarthache pan kohinoor mill sarkhe development jhale aste.

  He aandolan kasa hi aso pan majhya gavat manse pekshya veglya vidarbhala jyast pathimba aahe.

 • Hemant Gadkari …..
  संकेत तू कुठले विकत चे प्रश्न उचलले ? आम्ही विदर्भाच्या विकासासाठी नेहमीच आवाज उचलतो तुला का झोम्बल रे सरोदे तू त्या निष्क्रिय जांप्रतिनिधी चा कोण लागतो?
  संकेत एवढे विदर्भ प्रेम तुझे उतू आले न तर पहिले काहीतरी कर मग शहाणपणा शिकव कुठे राहतो रे तू ?

 • Sanket Sarode · ….
  Hemant gadkari manse chi franchisee gheun fukat chya varta karnya peksha vidarbha che prashna uchlun dhara.
  Kuthlyahi rajkiya pakshas ha naitik adhikar urlela nahi ki tyanni Vidarbha chya chal wali baddal kahihi bolawa
  Aani praveen siransarkha ek jyeshtha patrakar itka biased rahun kuthlya aandolanach samalochan Karel he nirashajanak aahech,nindes patra suddha aahe

 • Hemant Gadkari
  अणे आपली वकिली करा फुकटची प्रसिद्धी खूप मिळाली तुम्हाला ,विजय दर्डा(लोकमत) बनवारिलाल पुरोहित (हितवाद) माहेश्वरी (नवभारत) यांच्या कृपेने
  बाजीराव पेशवा यांनी पुण्याहून दिल्ली घाटली हे निष्क्रिय विदर्भवादी गुजरात ला हवी असलेली मुंबई विदर्भापासून तोडण्याचे नीच काम करीत आह
  अणे उगाच मृतप्राय झालेला प्रश्न उखरून काढण्यापेक्षा विदर्भातील काही निष्क्रिय आजी, व माजी आमदारा च्या मागल्या भागावर लाथा मारा मीं लागेल तर सर्वात समोर राहतो .
  जय महाराष्ट्र !

 • Hemant Gadkari ….
  विदर्भाचे 62 आमदार सभागृहात झोपा काढतात त्याचे पाप राज्याचे तुकडे करून का भोगायचे , विदर्भ झाल्यावर हे नालायक विदर्भात chartil वेगळा विदर्भ म्हणजे भ्रष्टाचाराचे 1 नवीन कुरन, या पलीकडे काहीच नाही ज्या मध्ये सर्वसामान्य यांचे हित नाही त्या प्रश्नाला अणे भीक घालू नका

 • Manoj Joshi….
  Jai vidarbha

 • Hemant Gadkari ….
  अणे परत मुंबईत जा ,तुमच्या आंदोलनाला काही अर्थ नाही आम्हाला विकास हवा तुकडे नको तसाच विदर्भ , मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रा पेक्ष्या विकसित आहे सिंचन प्रकल्प, आणि मिहान ने थोडी भरारी घेतल्यास विदर्भ महाराष्टातील सर्वात विकसित भाग राहील अणे येथे येऊन विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यात तफावत निर्माण करण्याचे काम करू नका काटोल चे आमदार अनिल देशमुख 20 वर्षयापैकी 19 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत होते एवढे वर्ष मंत्रिपद राहिल्यावर 1 मतदारसंघाचा विकास करू शकत नाही हा पश्चिम महाराष्ट्राचा दोष आहे का ?

 • वायाळ आश्रुबा ….
  वटवृक्ष ते झुडूप असा कॉंग्रेसचा आणि नुकतंच पेरलेलं बी ते डेरेदार वृक्ष, या भाजपच्या प्रवासाचा एक पत्रकार म्हणून साक्षीदार होता आल

 • Kailas Lonare….
  Sahamat aahe mi

 • Kamlakar Sontakke….
  ‘ विदर्भवादी अणे ‘ रोखठोक अन्वया साठी वाचक आपले आभार मानतील. कमलाकर सोनटक्के

 • Hemant Gadkari ….
  ही चर्चा मान्यवर पत्रकार बर्दापूरकर साहेबांच्या पोस्ट वर होत आहे म्हणून संकेत नाहीतर तू जी भाषा वापरून राहिला घंटा वैगरें त्याही पेक्ष्या भारी भाषा मला येते मी पण 26 वर्षं झाले राजकारण, समाजकारण करतोय तू भेटच तुला सर्व माहिती पद्धतशीर पणे देतोच

  • Sanket Sarode ·
   WAAH.waah gadkari saheb.eka shetkaryachya mulala ghabrwa tumhi.tyachya shiway Kay karnar.pakshshreshthin pudhe jhuknare padadhikari dusra Kay krnar.

   Tika kartoy koni tar ti positively ghena he kadhi kalnar tumhala.manse pasun aasha aahe mhanun boltoy.jau dya tumhala fakt raj sahebancha aadesh kalnar.janatecha hridyatla rosh kalala asta tar aaj vidarbhat no.1 var asta.kadhi kadhi aatmavlokan kara.fayda hoil.jay maharshtra

 • दिपक अडसुले …..
  संघाने आधी भारतातुन पाकिस्तान वेगळे केले नंतर बांगलादेश आता विदर्भ…
  ह्या साठीच मागीतला होता का शिवरायांचा आशिर्वाद…
  राज जन्म भुमी आंदोलनचे काय झाले संकेत?
  मागील 6 वर्षापासून ग्रेट नाग रोड बनवत आहे पण अजून नाही बनला? का?
  विदर्भाचा विकास भाजपनेच होऊ नाही दिला मग कश्याला वेगळ्या विदर्भ हवा.
  विकास करायची लाईकी नाही अन विदर्भ वेगळा पाहिजे.

  • Sanket Sarode….
   Hahaha.shetkaryasathi Kay kela?

   • दिपक अडसुले ….
    विदर्भ सोडून जाणरे मुलंच कारणीभूत आहे विदर्भाचा विकास न व्हायला.
    विदर्भात राहायची काम करायची तुम्हाला लाज वाटते मग कशाला पाहिजे वेगळा विदर्भ

  • Sanket Sarode · ….
   Mala khushi nahi Vidarbha sodun jaychi. Pan central government cha ekach college aahe Maharashtrat hmct cha.te mumbait mhanun ithe shikayla aaloy.vegla rajya jhal ki hmct cha college vidarbhat suddha yenar.Vidarbhacha vikas kela asta tar konich vidarbh sodun nsta gela.
   Tumchya sarkhe mumbaiwalyanche aani congress sarkhe dillivalyanche paya padnare aahe mhanun vidarbh mage aahe.baramati wale aani reshimbag wale tar mulatch nalayak

   • दिपक अडसुले…..
    31 हजार विहिरी बनवल्या कागदावर…
    देवेंद्र सरकार राज ठाकरेंच्या विकास आराखडा वर काम करत आहे.

    • Sanket Sarode ·….
     Male ta tumhi ase vicharun rayle jasa kahi mi bjp cha leader hay.pahilech bollo baki paksh nalayak aahe.manse kadun a peksha aahe pan manse dadagirit gunga haye.

     • दिपक अडसुले….
      मनसे काही मराठी माणसावर दादागिरी नाही करत. मनसे भांडते ते मराठी माणसासाठी त्या साठी हे नाही विचारत तुम्ही मुंबईचे आहात की विदर्भाचे, कोकण चे आहात की मराठवाडय़ाचे आम्ही फक्त एकच गोष्ट म्हणतो ति म्हणजे मराठी म्हणजेच महाराष्ट्र.

 • दिपक अडसुले….
  तुम्ही फक्त एकतर्फी निर्णय घ्याल तर हे योग्य नाही.
  महाराष्ट्र अखंडच हवा.

  • Sanket Sarode ·….

   Kasla ha dutappi pana.jyanni vyavhariktecha chya navavar shivsenetun aapli vegli chul mandli te aaj akhand ha shabd ucchartay
   Rajsahebanni tevha je kela te chukicha asel tar mag Vidarbha chi magni chukichi or vice versa

   दिपक अडसुले रज साहेबांनी त्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे तो वेगळा असला तरी महाराष्ट्र अखंड राहावा हे प्रत्येक मराठी माणसाला वाटते.

   • दिपक अडसुले…. राज साहेबांनी त्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे तो वेगळा असला तरी महाराष्ट्र अखंड राहावा हे प्रत्येक मराठी माणसाला वाटते.
    दिपक अडसुले किती विवेक बुद्धी ने काम करतात ते दिसुन येते. फक्त दिल्ली वारी

 • Mahesh Upadeo….
  Jai Maharashtra !

 • Zenzo Kurita….
  Vidharbhvar anyaay zala, hey naakaarun upyog naahi. Vidharbh paasun Mumbai khupach laamb aahe. Naagpur Karaarnusaar fakt Hiwali Adhivashan ghenyaa aivji October/November te Janeuary paryant 3/4 Mahinyaa saathi Naagpur Raajdhaani asaavi. Jar 6 Khaasdaar…
  Zenzo Kurita Dr. Ambedkar yaani Samyukt Maharashtrala paathimba dila hota, mhanunch Dadasaaheb Gaikwad yaanchya netrutwat R.P.I.ne 1957 chya nuvadnukit Samyukt Maharashtra Samiti sobat yuti keli hoti. Hey Ambedkarwadi ka saangat naahit?

 • Dr. Uday Bodhankar….
  But i am with advocate Aney shrihari . He is making serious and dedicated efforts and we all support him in his maiden vidarbha venture. He has proved that big posts mean nothing in front of ones mission. Jai vidarbha

 • Surendra Deshpande….
  vidarbha fakt shethji bhatji la hava ase mhanat hote kadhi kali….

 • Vishweshwar Bandre….
  पहले j धोटे यांनी उड्या मारल्या आता यांना काही भविष्य दिसत आहे , खेळांचे दिवस आहे खेळ खेलु द्या

 • Hemant Gadkari ….
  अणे परत काही दिवसात मुंबईत परत जातील या आंदोलनाला काही अर्थ नाही विकास करा ,तुकडे नकोच

 • Milind Arolkar….
  Agdi barobber…!