उड गया ‘राजहंस’ अकेला …

‘नागपूर पत्रिके’तल्या दिवसांचं नातं ज्या अनेकांशी घट्ट जोडलेलं आहे त्यातल्या रमेश राजहंस यांच्या निधनाची बातमी अनपेक्षितच. त्या दिवसातल्या दिनकर देशपांडे, हरिहर येगावकर, शरद देशमुख असे काहीजण मृत्यू नावाच्या अज्ञाताच्या प्रदेशात निघून गेले आहेत, त्यात आता रमेश राजहंस यांची भर पडली आहे. नागपूरच्या पत्रकारितेतला माझा पहिला पडाव नागपूर पत्रिकेत पडला आणि रमेश …

कोण हे अमित शहा ?

बिहार आणि उत्तर प्रदेशात फिरताना अनोळखी माणसाशी संभाषणाला सुरुवात केली की साधारणपणे ९०-९५ टक्के लोक प्रतिसाद देतात तो , ‘कौन जाती हो ?’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते … आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा …

निवडणुकीतले ‘पुस्तक बॉम्ब’

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असताना संजय बारू आणि पी.सी.पारख यांच्या ‘पुस्तक बॉम्ब’नी काँग्रेस पक्षाची चांगलीच पंचाईत झाली असून त्यामुळे या काँग्रेस नेत्यांची आगपाखडही जोरात सुरु आहे. खरे तर, आज ना उद्या हे वस्त्रहरण होणार होतेच हे ही आगपाखड करताना काँग्रेसजन विसरले आहेत. मनमोहनसिंग हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, एक सज्जन गृहस्थ …

जिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…

‘पंत मेले आणि राव चढले’ असं सरळधोपटपणे राजकारणात कधीच होत नसतंम्हणूनच त्याला राजकारण म्हणतात. राजकारणात ‘दोन अधिक दोन’ ही बेरीज पूर्णपणे राजकारणाची तत्कालीन गरज म्हणून तसेच व्यक्तीसापेक्ष असते, तो हिशेब साडेतीन होऊ शकतो, चार होऊ शकतो, साडेचार होऊ शकतो… काहीही होऊ शकतो. म्हणूनच राजकारणात पंताला मरू द्यायचे नसते त्याचे केवळ …

नेतृत्व बदलाचीही निवडणूक !

१६व्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वात झालेला खांदेपालट. यात फरक इतकाच की काँग्रेसमधला नेतृत्वबदल परिस्थितीच्या रेट्याने हतबल झाल्याने तर भारतीय जनता पक्षातला नेतृत्वबदल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (की सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ?) सत्ताप्राप्तीच्या महत्वाकांक्षेमुळे होतो आहे . देशाच्या स्वांतत्र्य …