नितीन गडकरींची चुकलेली वाट!

भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अखेर शपथ घेतली आणि स्वत:ची वाट स्वत:च चुकवून घेतली. मुळात नितीन गडकरी काही दिल्लीच्या दरबारात जन्मलेले आणि मग राष्ट्रीय नेते झालेले नव्हते. त्यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रात एक आमदार म्हणून सुरु झाली. राज्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार सत्तारूढ …

काँग्रेसमधली संधीसाधू गुलामगिरी !

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांचे दिलेले राजीनामे अपेक्षेप्रमाणे स्वीकारले गेले नाहीत आणि गांधी घराणे वगळता अन्य कोणीही काँग्रेसचे नेतृत्व करण्यास लायक नाही हा संदेश पुन्हा एकदा जनतेत गेला. मावळत्या लोकसभेत काँग्रेसचे २०६ सदस्य होते ती संख्या …

मोदींच्या झंझावातात राहुलचा पाला-पाचोळा !

भारतातल्या मतदारांनी १६व्या लोकसभेसाठी जनमताचे कौल आजवर जाहीर झालेले सर्व कौल थिटे आहेत हे सिद्ध करत ‘मोदी सरकार’ स्थापन होण्यासाठी निर्विवाद कौल दिला आहे. १९८४ नंतर देशात प्रथमच एका पक्षाला केंद्रात सरकार चालवण्यासाठी जनतेचा पूर्ण विश्वास प्राप्त झाला आहे . हा कौल एकट्या भारतीय जनता पक्षाला आहे आणि पूर्ण बहुमतापेक्षा …

पंतप्रधानपद..जात्यंधता आणि मुलायमसिंह

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या चर्चा आहे ती केवळ निवडणुकीची आणि उत्सुकता आहे ती निकालाची. दिल्लीत नेहेमीच चर्चा आणि वावड्यांना ऊत आलेला असतो. यासाठी वेळ-काळ आणि ऋतुंचे बंधन तसेही नसतेच. राजकीय पक्षांची कार्यालये, नेत्यांची निवासस्थाने किंवा ही कार्यालये आणि निवासस्थाने असलेल्या परिसराच्या आसपासच्या बारमध्ये एखादी चक्कर टाकली की अनेक अफवा-गॉसिप-वावड्या; काही म्हणा …

भाजपला कौल की २००४ची पुनरावृत्ती ?

आमचा गेल्या ३५-३७ वर्षांचा घनिष्ठ स्नेही आणि डॉक्टर श्याम पितळे गेल्या अनेक वर्षापासून सकाळी सायकलिंग करत दररोज त्याच्या सख्ख्या एक-दोन मित्र किंवा नातेवाईकाकडे जातो. त्या घरातल्या आरोग्यविषयक किरकोळ तक्रारींचे निवारण करतो, गरज असेल त्याचा रक्तदाब बघतो, ज्या काही सूचना आवश्यक असतील त्या देतो, आवश्यकता असेल तर सुरु असलेल्या औषधांचे डोज …