राणे नावाची शोकांतिका !

नारायण राणे यांच्याशी पहिली भेट झाली ती १९९६साली. विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु असताना तत्कालीन महसूल मंत्री सुधीर जोशी यांच्या रवी भवनातील निवासस्थानी आम्ही ब्रेकफास्ट घेत असताना पांढरे बूट, पांढरी विजार आणि अर्ध्या बाह्यांचा पांढरा शुभ्र सदरा घातलेले, लहान चणीचे नारायण राणे तेथे आले. सुधीर जोशी यांनी ओळख करून …

भाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस !

गोपीनाथ मुंडे यांच्या अनपेक्षित आणि धक्कादायक मृत्युनंतर राज्याच्या राजकीय पातळीवर निर्माण झालेला शोकावेग आता कमी झाला आहे. हे घडणे स्वाभाविकही आहे कारण, पक्ष-संस्था-संघटना-राज्यशकट कोणा एका व्यक्तीसाठी थांबू शकत नाही, ती जगरहाटीही नाही. जगरहाटी पाण्याच्या वाहत्या प्रवाहासारखी असते, त्यामुळेच भाजपतील व्यवहार नियमित सुरु झाल्यासारखे दिसत आहेत. अलिकडच्या काळात राज्यात गोपीनाथ मुंडे …

उद्धव समोरचे कांटेरी आव्हान

निवडणुकीचा हंगाम सुरु झाला की, दरवर्षी येणा-या होळी-धुळवडीसारखा शिवसेना-भारतीय जनता पक्षातील कलगीतुरा रंगात येतो. जेव्हा केवळ मुद्रित माध्यमे होती तेव्हा या कलगीतु-याची एखादी फुटकळ बातमी येत असे, आता प्रकाशवृत्तवाहिन्यांना २४ तास दळण दळायचे असल्याने युती तुटते की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचा भास होतो. साधारणपणे १५ वर्षापूर्वी सेना-भाजप स्वतंत्रपणे लढवत …

कोण हे अमित शहा ?

बिहार आणि उत्तर प्रदेशात फिरताना अनोळखी माणसाशी संभाषणाला सुरुवात केली की साधारणपणे ९०-९५ टक्के लोक प्रतिसाद देतात तो , ‘कौन जाती हो ?’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते … आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा …

पवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते !

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अस्वस्थ आहेत. खरे तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्त पानिपत झाले आणि त्यातून बोध न घेता काँग्रेसजण केवळ सैरावैरा धावत आहेत. राज्यात कशाबशा दोनच जागा आल्या तरी पराभवाला नेमके कोणाला जबाबदार धरायचे का नाही आणि जबाबदार धरले तर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना बदलायचे …