‘आरतें ये, पण आपडां नको’

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला पक्की लागू होणारी ‘जवळ ये पण, शिवू नको’ असा इरसाल अर्थ असणारी ‘आरतें ये, पण आपडां नको’ अशी एक मालवणी म्हण आहे. युती आणि आघाडी या दोघानाही एकमेकासोबत सत्ता हवी आहे पण एकत्र नांदायचे नाही कारण स्वबळाचे प्रयोग करून …

भाजप-सेनेच्या बाजारातल्या तुरी !

( लेखन आधार राजकीय परिस्थिती  १९ सप्टेबर दुपारी दोनपर्यंतची आहे. ) भ्रमाचा भोपळा फुटतोच, असे जे म्हणतात त्याचा अनुभव सध्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते घेत आहेत मात्र त्याचे खापर त्यांना अन्य कोणावर फोडता येणार नाही अशी स्थिती आहे. साडेतीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उत्तरेतील यश हाच …

‘खड्ड्यातल्या’ महाराष्ट्र देशी !

नियमित मासिक वेतनधारी पत्रकारिता सोडल्यावर अलिकडच्या काही महिन्यात वसई, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अंबाजोगाई, अमरावती, वाशीम, बुलढाणा, पुणे , नांदेड अशा अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरणं होतंय. बहुसंख्य प्रवास रस्त्याने आणि चर्चा प्रामुख्याने निवडणुकीची. रस्ता प्रवासात जाणवलेली ठळक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात रस्ते खड्ड्यात गेलेले आहेत आणि नागरी सुविधांच्या नावाने …

दिल्ली दरबारी ‘शीला कि वापसी’

गणेशोत्सवाच्या उत्साहात, नरेंद्र मोदी यांच्या जपान दौ-यात तसेच  त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सत्तेतील १०० दिवस पूर्ण झाल्याच्या गदारोळात आणि विधान सभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार या प्रतिक्षेत शीला दिक्षित दिल्लीत परतल्याच्या बातमीला जरा दुय्यम स्थान मिळाले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पार पानिपत झाले . सलग तीन वेळा …