काँग्रेस पतनाचे नायक!

विधान सभेचे निकाल लागल्यापासून माध्यमांचा रोख शिवसेना-भारतीय जनता पक्षात होणारी किंवा न होणारी युती, शरद पवार यांची खेळी आणि या आभासी युतीतील रुसवे-फुगवे या भोवती केंद्रीत राहिला. अल्पमतातील भाजप सरकारने विधानसभेत संपादन केलेले विश्वासमत(?) आणि त्याची वैधता याचा तडका मध्यंतरी त्यावर मारला गेला. ही युती होईल किंवा नाही आणि झाली …

पद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….

नागपूरच्या नीरी, सेंट्रल जेल, लक्ष्मीनगर, दीक्षा भूमी, मुंडले तसेच कुर्वेज शाळा, अंध विद्यालय आणि विदर्भ वैधानिक मंडळाचे कार्यालय यांच्या बेचक्यामध्ये असलेल्या गच्च झाडीत वसंत नगर नावाची म्हाडाची चाळीस-एक वर्ष जुनी कॉलनी वसलेली आहे. वसंत नगरमध्ये प्रवेश केला आणि सरळ थेट आत गेलं की एका मोठ्या मैदानाच्या तोंडाशी समोर ‘डेड एंड’ …

मोदींची तिरकी चाल…

अपेक्षेप्रमाणे राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी पुरस्कृत सरकार विधानसभेत आवाजी बहुमत प्राप्त करते झाले आणि त्याहीपेक्षा जास्त अपेक्षेबाहेर हे बहुमत मिडियात गाजले! इतके की, या आवाजात गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून गेले या घटनेच्या राजकीय पैलूकडे मात्र दुर्लक्ष झाले. एक लक्षात घ्यायला हवे …

‘एमआयएम’च्या विजयाचा शोध आणि बोध !

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील ‘एमआयएम’ या अल्पाक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या ‘मजलिसे इत्तिहादुल मुसलमिन’ने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीने काहींच्या नजरा उंचावल्या आहेत तर मराठवाड्यातील बुद्धिवंत, समाजचिंतक, पत्रकार आणि आज वयाची साठी पार केलेल्यांच्या नजरा भयकंपित झालेल्या आहेत. ‘एमआयएम’ने राज्यात दोन जागी विजय संपादन केला आहे, ११ विधानसभा मतदार संघात हा पक्ष दुसऱ्या …

देवेंद्र सरकारसमोरील जटील आव्हाने…

शिवसेनेचे ‘बडी बेआबरू हो के तेरेही कुचे मे लौट आये…’ अखेर, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एका शानदार समारंभात शपथ घेतली. ‘अखेर’ हा शब्दप्रयोग यासाठी की, निवडणुका लागल्यापासून ते शपथविधी समारंभापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना नेते या समारंभाला उपस्थितीत राहतात किंवा नाही याबाबत सस्पेन्स कायम होता. …