माणुसकीही विसरत चाललेला महाराष्ट्र…

१९७२चा दुष्काळ अनुभवलेल्या पिढीतील मी एक आहे. अंग भाजून काढणारी उन्हें, सतत कोरडा पडणारा घसा, कधी तरी मिळणारे अत्यंत गढूळ पाणी, खायला अमेरिकन लाल मिलोच्या भाकरी, मिलो मिळणे मुश्कील झाल्यावर राज्य सरकारने सुरु केलेले सुकडी हे खाद्यान्न, रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडी फोडणारे लोक आणि याच खडीचे ओळीने रस्त्यालगत लागलेले ब्रास… …

जबाबदारी विसरलेले विरोधक

‘संत शिरोमणी’ जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गैरवर्तन केले म्हणून त्यांना या अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी पूर्ण अधिवेशनभर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, नंतर आव्हाड यांचे निलंबन रद्द होताच बहिष्कार मागे घेतला. सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एका सदस्याने केलेल्या गैरवर्तनाचे समर्थन महत्वाचे वाटते हा संदेश या …

दुष्काळ राजकीय इच्छा शक्तीचाच!

विकासाचा तालुकावार अनुशेष निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केळकर समितीच्या (अद्याप जाहीर न झालेल्या) अहवालाच्या निमित्ताने एबीपी माझा वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत माझे मित्र, नामवंत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी, ‘आता खूप झाले. विकास व्हायचा असेल तर महाराष्ट्रातून स्वतंत्र होणे हाच विदर्भासमोर उरलेला पर्याय आहे’, असे प्रतिपादन सवयीनुसार केलेच. भारतीय जनता …

दर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा!

गेल्या डिसेंबर महिन्यातील घटना- काही कामांसाठी औरंगाबादला आलो होतो. दुपारी सिडको परिसरातील एक रेस्तराँत काही डॉक्टर मित्रांसोबत जेवायला गेलो असताना राजकीय गप्पा सुरु झाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघातून दर्डा यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा होती. तेव्हा मी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून दिल्लीत पत्रकारिता करत होतो. अचानक तो …