गडकरींचे ताकाचे भांडे आणि उद्धवची मजबुरी !

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी अगदी अपेक्षेप्रमाणे कौल दिला आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्याला आलेला असला तरीही तो बहुमतापासून लांब आहे. शिवसेना दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा गुगली टाकलेला आहे. मतदारांनी संमिश्र कौल दिल्यावर जशी …

मुंडेचा हुकलेला विक्रम… सुशीलकुमारांची उपेक्षा आणि डोंगरेंची सूचना

राज्यात शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर म्हणजे १९९५ नंतर युती-आघाडीचे सरकार गेल्या १९ वर्षांपासून अनुभवयाला मिळते आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी दोन सत्तास्थाने असतातच असा अनेकांचा समज झालेला आहे. आमची पिढी पत्रकारितेत आली तेव्हा राज्याचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख केवळ मुख्यमंत्रीच असे. त्याला अपवाद दोन, एकदा नासिकराव तिरपुडे आणि …

काऊंट डाऊन…

माणसे तीच असली तरी त्यांच्या राजकारण आणि संसारिक आयुष्यात कोणतीच समानता नसते. संसारात कधी-कधी कडू-तुरट धुसफुस असते, आंबट-गोड असंतोष असतो, नाते न तुटू देणारी घुसमट असते. या घुसमटीला कधी कधी तोंड फुटते. मग पती-पत्नीत एकमेकाची उणीदुणी काढणारे जोरदार भांडण होते. एकमेकावर केलेल्या प्रेमाची पश्चातापदग्ध कबुलीही बिनदिक्कत दिली जाते आणि त्याच …

पुन्हा एलकुंचवार !

( महेश एलकुंचवार यांनी ९ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला तेव्हा लिहिलेला लेख . ) पुन्हा एलकुंचवार ! //१// १९७० ते ८० चा तो काळ देशात आणि वैयक्तिक आयुष्यात विलक्षण घडामोडीचा होता. युद्ध नुकतेच संपलेले होते, त्याचा ताण म्हणून महागाईचा तडाखा बसलेला होता, त्यातच दुष्काळ आणि भ्रष्टाचारविरोधी उभे राहिलेले …

आहे बजबजपुरी तरी…

इलेक्ट्रॉनिक्स मिडियात होणा-या चर्चात सहभागी होणे कटाक्षाने टाळत असलो त्या माध्यमातील अनेक पत्रकार चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याशी माझा नियमित संपर्कही असतो. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर या माध्यमातील एक तरुण पत्रकार गप्पा मारताना म्हणाला, ‘काय बजबजपुरी माजली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नाही का?’ मी त्याला म्हटले, ‘युती आणि आघाडीत …

‘आरतें ये, पण आपडां नको’

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला पक्की लागू होणारी ‘जवळ ये पण, शिवू नको’ असा इरसाल अर्थ असणारी ‘आरतें ये, पण आपडां नको’ अशी एक मालवणी म्हण आहे. युती आणि आघाडी या दोघानाही एकमेकासोबत सत्ता हवी आहे पण एकत्र नांदायचे नाही कारण स्वबळाचे प्रयोग करून …

भाजप-सेनेच्या बाजारातल्या तुरी !

( लेखन आधार राजकीय परिस्थिती  १९ सप्टेबर दुपारी दोनपर्यंतची आहे. ) भ्रमाचा भोपळा फुटतोच, असे जे म्हणतात त्याचा अनुभव सध्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते घेत आहेत मात्र त्याचे खापर त्यांना अन्य कोणावर फोडता येणार नाही अशी स्थिती आहे. साडेतीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उत्तरेतील यश हाच …

‘खड्ड्यातल्या’ महाराष्ट्र देशी !

नियमित मासिक वेतनधारी पत्रकारिता सोडल्यावर अलिकडच्या काही महिन्यात वसई, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अंबाजोगाई, अमरावती, वाशीम, बुलढाणा, पुणे , नांदेड अशा अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरणं होतंय. बहुसंख्य प्रवास रस्त्याने आणि चर्चा प्रामुख्याने निवडणुकीची. रस्ता प्रवासात जाणवलेली ठळक बाब म्हणजे महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात रस्ते खड्ड्यात गेलेले आहेत आणि नागरी सुविधांच्या नावाने …

दिल्ली दरबारी ‘शीला कि वापसी’

गणेशोत्सवाच्या उत्साहात, नरेंद्र मोदी यांच्या जपान दौ-यात तसेच  त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सत्तेतील १०० दिवस पूर्ण झाल्याच्या गदारोळात आणि विधान सभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार या प्रतिक्षेत शीला दिक्षित दिल्लीत परतल्याच्या बातमीला जरा दुय्यम स्थान मिळाले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पार पानिपत झाले . सलग तीन वेळा …

राजकीय सोयीचे चष्मे!

सगळ्याच गोष्टींकडे सोयीच्या (आणि अर्थातच स्वार्थाच्याही!) चष्म्यातून बघण्याची सवय आपल्या राजकीय पक्षांना लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष सत्तेत एक आणि विरोधी पक्षात असताना नेमकी त्याविरुद्ध भूमिका घेतो . अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना केंद्र सरकारला कामगार कायद्यात दुरुस्ती करायची होती पण, त्याला काँग्रेसने कडाडून विरोध केला आणि मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने …