भांडा आणि नांदाही सौख्यभरे!

आमच्या आधीची पिढी विवाहाच्या वयात आली तेव्हा लोकसंख्यावाढीला आळा घालणारी ‘हम दो, हमारे दो’ ही राष्ट्रीय मोहीम जोरात होती, त्यामुळे ज्येष्ठांकडून नवविवाहितेला देण्यात येणारा पारंपारिक ‘अष्टपुत्र सौभाग्यवती’ हा आशीर्वाद मागे पडून ‘नांदा सौख्यभरे’ हा सेफ आशीर्वाद प्रचलित झालेला होता. आस्मादिकांचा प्रेमविवाह, आम्हा दोघांची राजकीय मते परस्पर भिन्न, त्यातच दोघेही पत्रकार, …

ही तर राजकीय हाराकिरी !

विषय गंभीर आणि अतिसंवेदनशील असल्याने प्रारंभीच स्पष्ट करून टाकतो-– समाजातल्या सर्व जाती-धर्म आणि पंथातील वंचितांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि तो जर मिळत किंवा मिळाला नसेल तर त्यासाठी हव्या त्या सोयी-सवलती उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे, ही माझी एक पत्रकार म्हणून केवळ भूमिकाच नाही तर जीवननिष्ठाही …

‘दुहेरी’ चक्रव्यूहात राहुल गांधी !

अखिल भारतीय काँग्रेसचे एक दिवसीय अधिवेशन दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर होत असतानाचा एक प्रसंग काँग्रेसचे दिल्लीतील अधिवेशन कव्हर करण्याची माझी ही पहिलीच वेळ. त्यानिमित्ताने स्टेडियमवर करण्यात आलेल्या सोयी प्रथमच अनुभवल्या. इतकी वर्ष महाराष्ट्रात राजकीय पत्रकार म्हणून वावरताना असे पंचतारांकित आतिथ्य मी पहिले नव्हते. दिल्ली विधानसभेत काँग्रेसचा दारूण पराभव आणि नरेंद्र मोदींची …

बाबा, हे वागणं बरं नव्हे!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ‘बाबा’नावाने ओळखले जातात पण, त्यांचा उल्लेख असा सलगीने करण्याइतक्या त्यांच्या जवळच्या गोटात मी नाही. खासदार असताना ते साध्या रेस्तराँत जेवत आणि दादरहून बसने पुण्या-कराडला कसे जात या रम्य कथांचाही मी साक्षीदार नाही. पूर्वग्रहदूषित असायला अन्य कोणा राजकीय नेत्याचाही मी अधिकृत किंवा अनधिकृतही प्रवक्ता नाहीच नाही, …

राणे नावाची शोकांतिका !

नारायण राणे यांच्याशी पहिली भेट झाली ती १९९६साली. विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरु असताना तत्कालीन महसूल मंत्री सुधीर जोशी यांच्या रवी भवनातील निवासस्थानी आम्ही ब्रेकफास्ट घेत असताना पांढरे बूट, पांढरी विजार आणि अर्ध्या बाह्यांचा पांढरा शुभ्र सदरा घातलेले, लहान चणीचे नारायण राणे तेथे आले. सुधीर जोशी यांनी ओळख करून …

भाजपच्या खांद्यावरचा अवघड क्रूस !

गोपीनाथ मुंडे यांच्या अनपेक्षित आणि धक्कादायक मृत्युनंतर राज्याच्या राजकीय पातळीवर निर्माण झालेला शोकावेग आता कमी झाला आहे. हे घडणे स्वाभाविकही आहे कारण, पक्ष-संस्था-संघटना-राज्यशकट कोणा एका व्यक्तीसाठी थांबू शकत नाही, ती जगरहाटीही नाही. जगरहाटी पाण्याच्या वाहत्या प्रवाहासारखी असते, त्यामुळेच भाजपतील व्यवहार नियमित सुरु झाल्यासारखे दिसत आहेत. अलिकडच्या काळात राज्यात गोपीनाथ मुंडे …

उद्धव समोरचे कांटेरी आव्हान

निवडणुकीचा हंगाम सुरु झाला की, दरवर्षी येणा-या होळी-धुळवडीसारखा शिवसेना-भारतीय जनता पक्षातील कलगीतुरा रंगात येतो. जेव्हा केवळ मुद्रित माध्यमे होती तेव्हा या कलगीतु-याची एखादी फुटकळ बातमी येत असे, आता प्रकाशवृत्तवाहिन्यांना २४ तास दळण दळायचे असल्याने युती तुटते की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचा भास होतो. साधारणपणे १५ वर्षापूर्वी सेना-भाजप स्वतंत्रपणे लढवत …

कोण हे अमित शहा ?

बिहार आणि उत्तर प्रदेशात फिरताना अनोळखी माणसाशी संभाषणाला सुरुवात केली की साधारणपणे ९०-९५ टक्के लोक प्रतिसाद देतात तो , ‘कौन जाती हो ?’ या प्रतिप्रश्नाने . रेल्वे असो की बस प्रवासात सरकून जागा करून देता-घेताना सरसकट सर्वाकडून सर्वांच्याच जातीची विचारणा होते … आपण चहाच्या ठेल्यावर किंवा पानाच्या टपरीवर असलो किंवा …

पवारांनी पिसले राष्ट्रवादीचे पत्ते !

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अस्वस्थ आहेत. खरे तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे जास्त पानिपत झाले आणि त्यातून बोध न घेता काँग्रेसजण केवळ सैरावैरा धावत आहेत. राज्यात कशाबशा दोनच जागा आल्या तरी पराभवाला नेमके कोणाला जबाबदार धरायचे का नाही आणि जबाबदार धरले तर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना बदलायचे …

‘ना.घ.’चं मेहेकर आणि मोझार्टचं साल्झबर्ग…

मराठी भावगीत रानावनात पोहोचवणा-या ‘शीळ’कर्त्या ना.घ.देशपांडे यांच्या मेहेकर यांच्या गावावरून आजवर असंख्य वेळा गेलो. काही प्रसंगी गावातही गेलो. बालाजी मंदिरामागे असलेल्या ना.घ.देशपांडे यांच्या घरीही भक्तीभावाने जाऊन आलो. सुरुवातीच्या काळात एसटी महामंडळाच्या बसने आणि नंतर कारने मेहेकर अनेकदा ओलांडलं. साडेतीन-चार दशकांपूर्वी औरंगाबादहून सकाळी सहा पन्नासला निघालेली नागपूर बस दुपारी अडीचच्या सुमारास …