‘टिस’ही तुळजापूरचे आणि दुष्काळाचे मळभ…

तुळजाभवानीचे मंदिर असलेले गाव, ही उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या गावाची ओळख सर्वसामान्यपणे आहे. या गावाच्या कुशीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (‘टिस’) नावाची एक राष्ट्रीय स्तरावरची नामांकित संस्था आहे याची माहिती मराठवाड्यातही अनेक विद्यार्थी, पालक, पत्रकार, बुद्धिवंतांना नाही. या संस्थेत ‘Media and Politics in India: with reference to Electoral Politics’ …

केजरीवाल की बेदी ?

दिल्ली विधानसभेच्या गेल्या आणि या म्हणजे, २०१३ आणि २०१५ च्या निवडणुकीच्या काळात राजकीय परिस्थितीत अनेक बदल झालेले आहेत. अण्णा हजारे, किरण बेदी यांचा सल्ला डावलून आम आदमी पार्टीच्या स्थापन केलेला अरविंद केजरीवाल नावाचा आशेचा एक किरण योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, शाझिया इल्मी, विनोद बिन्नी यांच्यासह राजकीय क्षितिजावर उगवलेला होता आणि …

केजरीवाल आणि आप नावाचा भास!

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि याआधीची (२०१३ची) निवडणूक तसेच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ४९ दिवसांच्या दिल्लीतील राजवटीच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा मी दिल्लीत ‘लोकमत’चा राजकीय संपादक होतो आणि ती निवडणूक मी एखाद्या तरुण, उत्सुक आणि उत्साही वार्ताहरासारखी कव्हर केली होती. ज्येष्ठ सहकारी हरीश गुप्ता, विकास झाडे आणि मला, त्या …

काँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप !

आपल्या करिष्म्यावरच पक्षाचे अस्तित्व अवलंबून आहे आणि हा करिष्मा नसेल तर पक्षाचे बहुसंख्य उमेदवार नगर पालिकांच्या निवडणुकीतही विजयी होऊ शकत नाहीत हे लक्षात आल्यावर म्हणजे; साधारण १९७१नंतर इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल कॉंग्रेसमध्ये सुरु झाला. केंद्र सरकार आणि पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची सूत्रे दिल्लीत एकवटली असणे स्वाभाविकच होते पण, राज्य पातळीवरची …

प्रवीण दिक्षित काय खोटे बोलले ?

१ = ‘उठसुठ कोल्हापुरी बंधारे बांधणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. भौगोलिक परिस्थिती आणि भूगर्भ स्थिती लक्षात न घेता असे बंधारे बांधणे हा पैसा कमावण्याचा धंदा आहे’ – शिरपूर सिंचन योजनेचे जनक सुरेश खानापूरकर. २ = ‘सर, तुमचा दुष्काळाचा संदर्भ देणारा ब्लॉग वाचला. आज माझ्याकडे एक जराजर्जर वृद्ध महिला आली आणि …