कलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नाही हे काही आता लपून राहिलेले नाही. या सरकारातील मुख्यमंत्र्यासकट सर्वांनीच अंतर्गत धुसफुस म्हणा की नाराजी वेळोवेळी जाहीर करण्यात कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. भाजपातील एकनाथ खडसे या ज्येष्ठ मंत्र्याने लाख्खो मराठी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात विठोबा-रुखमाईच्या आरतीनंतर मुख्यमंत्रीपदी बहुजनांचा प्रतिनिधी (म्हणजे …

डिलीट न होणारी माणसं…

एक म्हणजे, दैववादी किंवा नियतीवादी नसल्याचा तोटा काय असतो तर, आर आर पाटील यांच्या मृत्यूचे समर्थन करता येत नसल्याने त्याचे खापर कोणावर तरी फोडून मोकळे होता नाहीय. दुसरे म्हणजे, हे विधान करत असतानाच हेही स्पष्ट केले पाहिजे की, मी काही आरआर यांच्या खास वगैरे वर्तुळात नव्हतो. तरीही त्यांच्या मृत्यूची बातमी …

…हा दिवा विझता कामा नये !

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी बहुमत संपादन करणार, सभागृहातील सर्वात मोठा पक्ष हे भारतीय जनता पक्षाचे स्थान जाणार आणि काँग्रेसला पाचच्या आत जागा मिळणार हे अंदाज होतेच. प्रचारच्या शेवटच्या टप्प्यात दिल्लीत होतो तेव्हा ‘आप’ला ४०-४२ जागा नक्की मिळतील, हा आकडा  ४५ पर्यंत जाऊ शकतो असे वातावरण होते. मात्र दिल्लीकर मतदारांनी …

दिल्लीची उत्कंठा शिगेला !

उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अगदी अंतिम टप्प्यात दिल्लीत होतो. निवडणुकीच्या रणांगणातल्या भाषेत ‘कत्तल-की-रात’ असणारे जाहीर प्रचाराचा शेवटचा आणि संपल्यानंतरचा हेही दोन दिवस त्यात होते. हा मजकूर प्रकाशित होईपर्यंत दिल्लीत मतदान झालेले असेल. मतदारांचा कौल १० फेब्रुवारीला दुपारी बाराच्या आत कळेल. त्याआधी मतदार पाहण्याचे निष्कर्ष प्रकाशवृत्त वाहिन्यांवरून आलेले असतील. …