शहजाद्याची घरवापसी !

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात गायब असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठे वाजत गाजत आगमन झाले आहे. परदेशी शिकून एखादा राजपुत्र राज्य करण्यासाठी देशाच्या राजधानीत परतल्यावर लोकात जसा उत्साह शिगेला पोहोचतो तसे कॉंग्रेसजणांचे सध्या झाले आहे. ते स्वाभाविकही आहे कारण, एक- कॉंग्रेसला गांधी नेतृत्वाशिवाय पर्याय नाही …

राणे नावाची महाशोकांतिका…

शेवटच्या टप्प्यात काही प्रकाशवृत्त वाहिन्यांचे काही पत्रकार आणि त्या वाहिन्यांवरचे काही तथाकथित राजकीय विश्लेषक यांचे ‘विशफूल थिंकिंग’ वगळता अपेक्षेप्रमाणे बांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नारायण राणे दणकून हरले. शेवटच्या टप्प्यात या वाहिन्यांनी ‘राणे जोरदार टक्कर देणार’, ‘कदाचित ते विजयी होणार’, असे जे ‘हाईप’ केले त्यामागची कारणे काहीही असोत पण, दस्तुरखुद्द …

मराठीच्या मंजुळ वातावरणासाठी…

मल्टीप्लेक्स चित्रपटगृह ही बदलत्या तंत्रज्ञान आणि आवडी-निवडीची गरज आहे. त्या व्यवसायातून इतर छोट्या-मोठ्या पूरक व्यवसायांना मिळणाऱ्या संधी ओळखून महाराष्ट्र सरकारने करात सूट देण्यापासून ते वाढीव एफएसआयपर्यंत अशा अनेक सवलती मल्टीप्लेक्स उभारणी करणारांना दिल्या. या सवलती देतांना मल्टीप्लेक्सनी ‘प्राईम टाईम’मध्ये वर्षातून किमान ३० दिवस मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवण्याची अट २००१साली राज्यात …

सत्ताधुंद आणि आचरटेश्वरांच्या देशा !

‘राजीव गांधी यांनी नायजेरियन (म्हणजे काळ्या वर्णाच्या) मुलीशी लग्न केले असते तर त्या मुलीला कॉंग्रेसने नेता म्हणून स्वीकारले असते का ?’ अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सोनिया गांधी यांच्या वर्णाच्या संदर्भात केलेली टिप्पणी कोणाही सुसंस्कृत आणि सभ्य माणसाला असभ्य, अश्लाघ्य आणि निर्लज्जपणाचा कळस वाटणारी असली …