गांधी @ वसंत गुर्जर.कॉम

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांची  गांधी ही कविता सर्वात प्रथम ऐकली ती अंबाजोगाई साहित्य संमेलनात. पत्रकारितेत येऊन तेव्हा जेमतेम पाच-सहा वर्ष झालेली होती. प्रकाशित काही कथांना मान्यवरांची दाद(?) मिळाल्याने कथालेखनाची उर्मी जास्तच बळावलेली असल्याने लेखक होण्याचे स्वप्न होते. त्यातच नागपूर पत्रिका या दैनिकाच्या ‘साकव’ या रविवार पुरवणीचे संपादन मंगला विंचुरणेसोबत करत …

एक वर्षापूर्वी आणि नंतर…

(सर्व परिचित वाचक चळवळ ग्रंथालीचे मुखपत्र असलेल्या ‘शब्दरुची’ या मुखपत्राच्या मे २०१५च्य अंकाचा अतिथी संपादक मी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे एक वर्ष ही या अंकाची थीम आहे. या अंकासाठी मी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग- चित्र संकल्पना : विवेक रानडे ) मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार पायउतार …

‘अम्मा’चे पुनरागमन !

एकंदरीत हा पंधरवडा सेलिब्रिटींचे ‘लाड’ होण्याचा दिसतो आहे. सक्तमजुरीची सजा होऊनही एक मिनिटसुद्धा सलमानखान नावाचा नट कारागृहाच्या गजाआड गेला नाही. संशयास्पद व्यवहार करून निकालात काढलेल्या ‘सत्यम’कडे जमा असलेल्या भागधारकांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या राजूला उच्च न्यायालयात जामीन मिळाला आणि त्यापाठोपाठ बातमी आली ती, तामिळनाडूच्या सर्वेसर्वा जयललिता यांना उच्च न्यायालयाने बेहिशेबी …

चाळीशी रंगभानाची !

गेल्या ३५/३६ वर्षात बसोलीच्या या वर्षीच्या शिबिरात सर्वार्थाने प्रथमच माझा कोणताही सहभाग नसेल. १९८० ते २०१५ या काळात देशात (किंवा काही वेळा परदेशातही) असलो तरी बसोलीच्या शिबिरात आवर्जून एक दिवस तरी सहभागी होऊन किमान चार-सहा तास घालवणे मला मनापासून आवडत असे; खरं तर अजूनही आवडेल. मधली काही वर्ष पत्रकारितेच्या निमित्ताने …

कणभर खरं, मणभर खोटं

‘कणभर खरं आणि मणभर खोटं’ बोलणाऱ्या सलमानखान या नटाचे दारूच्या नशेत कार चालवून पाच जणांना चिरडण्याच्या आरोपाखाली झालेली शिक्षा भोगण्यासाठी कारागृहाआड जाणे आणखी लांबले. आपल्या देशातील कायद्याच्या मार्गाने न्याय होण्याची/मिळण्याची प्रक्रिया कशी आरोपीच्या पथ्यावर पडते याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे बघायला हव. शिवाय सलमान एकही दिवस जेलमध्ये न गेल्याने ही …

जीर्णशीर्ण हवेलीतला मार्क्सवादी !

संसदेच्या कॉरीडॉर किंवा प्रांगणात अनोळखी असणाऱ्याने जरी अभिवादन केले तरी आवर्जून सस्मित प्रतिसाद देण्याचा सुसंस्कृतपणा जपणारे तसेच आपण कोणी तरी बडे राजकीय आसामी आहोत याचा मागमूसही न लागू देता दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळात सहजपणे वावरणारे सीताराम येच्युरी आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणजे ‘सेनापती’ झाले आहेत. थोडक्यात सांगायचे तर, जनाधार …