बेजबाबदार आणि बेताल !

आपण बहुसंख्येने दुर्वर्तनी तसेच बेशिस्त असलेल्या आणि जबाबदारीची जाणीव नसलेल्या समाजाचे नेते आहोत, अशा या (दुर्वर्तनी, बेशिस्त आणि बेजबाबदार) समाजाला जबाबदारी, शिस्त आणि सद्वर्तनाचे धडे शिकवणे हे आपले केवळ कर्तव्यच आहे असे नाही तर, त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे बहुसंख्य नेतृत्वाला वाटत असते. नेतृत्व म्हणजे राजकारण, सरकार आणि प्रशासन, समाजकारण, …

पवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…

राजकारणात शरद पवार यांच्या निर्माण झालेल्या करिष्म्यावर माझ्या पिढीची पत्रकारिता बहरली. डावे-उजवे, पुरोगामी-प्रतिगामी, सरळ-वाकडे, समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे सर्व प्रवाह शरद पवार यांच्या घोर प्रेमात असण्याचा तो काळ होता. ‘पुलोद’चे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी शपथ घेतली तेव्हा मी साताऱ्याच्या ऐक्य नावाच्या दैनिकात रोजंदारीवर होतो आणि त्यांच्या शपथविधीची छायाचित्रे …

‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ !

दिल्लीच्या वास्तव्यात आठवड्यातून पाच-सहा दिवस तरी जनपथवर फेरी व्हायचीच. दिल्लीच्या सत्तेच्या माज आणि झगमगाटात, त्यातून आलेल्या पैशाच्या गुर्मीत जनपथवर एक वास्तू अंग चोरून संकोचाने उभी आहे. या वास्तुत कधीकाळी देशाचे पंतप्रधान असलेले लालबहादूर शास्त्री यांचे वास्तव्य होते. तेथे आता संग्रहालय आहे. काही वर्षापूर्वी ते पाहिले होते. लालबहादूर शास्त्री वापरत असलेल्या …

उपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव !

एखाद्याच्या पराभवातही अशी विजयाची ऐट असते की आपण आचंबित; क्वचित नतमस्तकही होतो आणि काहींचा विजयही उपेक्षेचा धनी ठरतो. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव (जन्म- २८ जून १९२१ / मृत्यू- २३ डिसेंबर २००४) हे देशाच्या राजकारणातील अशाच उपेक्षेचे नाव. एका मुलग्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘हैदराबादेतील बंजारा हिल्स भागातील मालमत्ता विकावी, अन्य कोणाकडूनही मदत …