चला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…

//१// आसवांवर पिक काढावं म्हटलं तर डोळे आटलेले आहेत, अशा भयाण परिस्थितीतून गेल्या आठवड्यात राज्याच्या दुष्काळी आणि त्यातही प्रामुख्यानं मराठवाड्याची बऱ्यापैकी मुक्तता झाली आहे. परतीची वाट धरताना मान्सूननं अनेक भागात दिलासादायक हजेरी लावली. जोरदार नाही तरी मध्यम पावसाच्या सरी चांगल्या बरसल्या. नदी-ओढे चार-दोन दिवस वाहिले. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न …

शेतकऱ्यांसाठी ७वा वेतन आयोग एक वर्ष पुढे ढकला !

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स.न. आपण मध्यंतरी जपानच्या दौऱ्यावर असतांना विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील जऊळका (रेल्वे) या गावातील दत्ता उपाख्य गुड्डू आत्माराम लांडगे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दत्तरावनं आपल्याला एक पत्र लिहून ठेवलं आहे. ते पत्र आपल्यापर्यंत पोहोचलं नसणार. अशा संवेदनशील बाबी सरकारपासून लपवण्याची सराईत कोडगी परंपरा नोकरशाहीत असतेच, …

राहुलसाठी दिल्ली दूरच…

स्वप्न विकायची आणि मतं घ्यायची असा आपल्या देशाच्या सत्ताप्राप्तीच्या समकालीन राजकारणाचा उसूल आणि ‘गरीबी हटाव’ ते ‘अच्छे दिन’ असा हा दीर्घ पल्ला आहे. इंदिरा गांधी यांनी दाखवलेल्या स्वप्नाने तो सुरु झाला आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत तो आता पोहोचला आहे. या प्रवासात काही काळ जयप्रकाश नारायण यांच्या आशीर्वादानं मोरारजी देसाई, इंदिरा …

हम नही सुधरेंगे !

आता परतीचाही मान्सून बरसण्याची शक्यता नाही अशा बातम्या प्रकाशित झालेल्या असतानाच औरंगाबाद या शहराच्या नामांतरावरुन सुरु झालेल्या खडाखडीच्या बातम्या वाचताना मनात आलेली पहिली प्रतिक्रीया आहे, ‘हम नही सुधरेंगे’! मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे विदीर्ण झालेल्या अंत:करणाने लोकप्रतिनिधीं आणि प्रशासनाच्या संवेदना हरपल्या आहेत अशी जी टीका होते आहे–व्यथा मांडली जात आहे त्यावर शिक्कमोर्तब …