दिलखुलास आणि ऐटदार गवई…

सत्तेच्या दालनात प्रदीर्घकाळ पत्रकारिता करताना अनेक नेत्यांना भेटता आलं.त्यात रा. सू. गवई लक्षात राहिले ते दिलखुलास, लोभस व्यक्तिमत्व, ऐटदार राहणी आणि त्यांची समन्वयवादी वृत्ती. त्यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर सर्वात प्रथम आठवला तो त्यांचा पानाचा डबा.. लगेच त्यातील केशराचा गंधही दरवळला. रा. सू. गवई यांचा लवंग, विलायची, जर्दा, केशर असलेला पानाचा …

बेजबाबदार आणि बेताल !

आपण बहुसंख्येने दुर्वर्तनी तसेच बेशिस्त असलेल्या आणि जबाबदारीची जाणीव नसलेल्या समाजाचे नेते आहोत, अशा या (दुर्वर्तनी, बेशिस्त आणि बेजबाबदार) समाजाला जबाबदारी, शिस्त आणि सद्वर्तनाचे धडे शिकवणे हे आपले केवळ कर्तव्यच आहे असे नाही तर, त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे बहुसंख्य नेतृत्वाला वाटत असते. नेतृत्व म्हणजे राजकारण, सरकार आणि प्रशासन, समाजकारण, …

पवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…

राजकारणात शरद पवार यांच्या निर्माण झालेल्या करिष्म्यावर माझ्या पिढीची पत्रकारिता बहरली. डावे-उजवे, पुरोगामी-प्रतिगामी, सरळ-वाकडे, समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे सर्व प्रवाह शरद पवार यांच्या घोर प्रेमात असण्याचा तो काळ होता. ‘पुलोद’चे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी शपथ घेतली तेव्हा मी साताऱ्याच्या ऐक्य नावाच्या दैनिकात रोजंदारीवर होतो आणि त्यांच्या शपथविधीची छायाचित्रे …

‘नेकी’ला वाळवी आणि पवार ‘योग’ !

दिल्लीच्या वास्तव्यात आठवड्यातून पाच-सहा दिवस तरी जनपथवर फेरी व्हायचीच. दिल्लीच्या सत्तेच्या माज आणि झगमगाटात, त्यातून आलेल्या पैशाच्या गुर्मीत जनपथवर एक वास्तू अंग चोरून संकोचाने उभी आहे. या वास्तुत कधीकाळी देशाचे पंतप्रधान असलेले लालबहादूर शास्त्री यांचे वास्तव्य होते. तेथे आता संग्रहालय आहे. काही वर्षापूर्वी ते पाहिले होते. लालबहादूर शास्त्री वापरत असलेल्या …

उपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव !

एखाद्याच्या पराभवातही अशी विजयाची ऐट असते की आपण आचंबित; क्वचित नतमस्तकही होतो आणि काहींचा विजयही उपेक्षेचा धनी ठरतो. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव (जन्म- २८ जून १९२१ / मृत्यू- २३ डिसेंबर २००४) हे देशाच्या राजकारणातील अशाच उपेक्षेचे नाव. एका मुलग्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘हैदराबादेतील बंजारा हिल्स भागातील मालमत्ता विकावी, अन्य कोणाकडूनही मदत …

सुषमा – स्वप्न ते भंगले !

एकेकाळी शिष्य असलेल्या नरेंद्र मोदी यांना लालकृष्ण अडवाणी यांनी नंतर विरोध का केला हे ललित मोदी प्रकरणाचे वार सहन करावे लागल्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चांगलेच उमगले असणार. दोन वर्षापूर्वी ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’ असणाऱ्या सुषमा स्वराज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गळ्यातील ओढणे झाल्याच्या वर्तमान चित्रातून राजकारणातील अनिश्चितता म्हणजे …

राजकारणातल्या फुशारक्या आणि निसरड्या वाटा !

राजकारणात आपल्या शीर्षस्थ नेत्यांच्या जास्तीत जास्त निकटचे असल्याच्या फुशारक्या मारता येणे फारच कौशल्याचे असते. म्हणजे, आपण खरे बोलत नाहीये हे समोरच्याला कळू न देण्याचे कसब गेंड्याच्या कातडीसारखे टणक असावे लागते आणि आपण खोटे बोलतोय हे नेत्याचा कानी जाणार नाही याची कडेकोट खबरदारी कायम घ्यावी लागते. मात्र हे मूलभूतपणे उमगलेले नसले …

मायानगरीची ज्येष्ठ मैत्रीण !

रविवारची सकाळ वीणा आलासे यांच्या मृत्युची बातमी घेऊन उजाडली. गेल्या आठवड्यातील मजकुरात त्यांची आठवण काढली होती. लिहितानाच विचार केला की खूप दिवस झाले त्यांचा फोन नाही.. आपणही केलेला नाही. बोलायला हवं एकदा. बोलणं राहून गेलं.. कायमचं राहूनच गेलं. नावानं हाकारायचं असेल तर ‘वीणाताई’ आणि नुसतंच असेल तेव्हा ‘अहो बाई’ असं …

गांधी @ वसंत गुर्जर.कॉम

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांची  गांधी ही कविता सर्वात प्रथम ऐकली ती अंबाजोगाई साहित्य संमेलनात. पत्रकारितेत येऊन तेव्हा जेमतेम पाच-सहा वर्ष झालेली होती. प्रकाशित काही कथांना मान्यवरांची दाद(?) मिळाल्याने कथालेखनाची उर्मी जास्तच बळावलेली असल्याने लेखक होण्याचे स्वप्न होते. त्यातच नागपूर पत्रिका या दैनिकाच्या ‘साकव’ या रविवार पुरवणीचे संपादन मंगला विंचुरणेसोबत करत …

एक वर्षापूर्वी आणि नंतर…

(सर्व परिचित वाचक चळवळ ग्रंथालीचे मुखपत्र असलेल्या ‘शब्दरुची’ या मुखपत्राच्या मे २०१५च्य अंकाचा अतिथी संपादक मी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे एक वर्ष ही या अंकाची थीम आहे. या अंकासाठी मी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग- चित्र संकल्पना : विवेक रानडे ) मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार पायउतार …