आधी राज्य खड्डेमुक्त करा !

‘मेक ईन महाराष्ट्र’सारख्या उपक्रमांना विरोध असण्याचं काहीच कारण नाही. गुंतवणूकदारांना आकर्षित केलंच पाहिजे, त्याशिवाय राज्यात उद्योग येणार तरी कसे? मोठे उद्योग आले की पूरक उद्योग येणार आणि त्यातून रोजगाराची एक मोठी साखळी तयार होणार. ही साखळी ज्या गावात निर्माण होते त्या गावाचा ‘टर्न ओव्हर’ वाढतो. वेगवेगळ्या करांद्वारे राज्याची अर्थव्यवस्था बळकट …

संतपीठाचं त्रांगडं !

“सरकारी काम अन सहा महिने थांब” ही म्हण तद्दन खोटी असून ही म्हण प्रत्यक्षात “सरकारी काम अन ते पूर्ण होणार नाही, कायम थांब” अशी आहे, याची प्रचीती गेली सुमारे छत्तीस वर्ष रेंगाळलेल्या पैठणच्या संतपीठाच्या संदर्भात येते आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी मराठवाडा विकासाचा …

श्रीहरी अणे, महाराष्ट्राला डिवचू नका !

आमचे मित्रवर्य, राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विरुद्ध बरंच काहूर सध्या उठलेलं आहे. त्याचसोबत सरकारच्या विदर्भ तसंच मराठवाड्याला अनुकूल असण्याच्या धोरणांबद्दल कोल्हेकुई सुरु झालेली आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आहेत की विदर्भाचे ?’ अशी नाराजीची भावना प्रकट होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत, अशी टीका उजागर …

आनंद कुळकर्णींच्या टीकास्त्राचा बोध !​

ज्या नोकरशाहीचे सहकार्य मिळत नाही असा राग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळवला त्याच नोकरशाहीतील सहकाऱ्यांकडून दाखव​ल्या​ गेलेल्या असहिष्णुता (ही लेकाची ‘असहिष्णुता’ काही आपली पाठ सोडतच नाहीये!) आणि कद्रू मनोवृत्तीवर टीकास्त्र सोडून आमचे मित्र आणि राज्याचे एक अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आनंद कुळकर्णी सेवानिवृत्त ​(होऊन लगेच परदेशगमन करते) झाले आहेत. …