ऐसा ऐवज येता घरा !

गेल्या आठवड्यात पुस्तक दिन साजरा झाला. त्या आठवडाभरात आमच्या भेटीला अनेक पुस्तकं एकापाठोपाठ एक, अगदी ठरवून आल्यासारखी आली. आमचं घर त्या श्रीमंतीनं उजळून गेलं ! एखाद्या ‘खानदानी’ खवय्यासारखा या श्रीमंतीचा आस्वाद आम्ही घेतला.. अजून घेतोय. गायतोंडे = संपादक- सतीश नाईक. प्रकाशक- चिन्ह पब्लिकेशन्स, मुंबई. एकनिष्ठ आणि सर्जनशील ध्यासातून डोळे विस्फारणारी …

‘न मंतरलेल्या’ पाण्याचा उथळ खळखळाट !

(Disclaimer : मद्यबंदीला विरोध किंवा मद्य आस्वादाचे समर्थन हा या मजकुराचा उद्देश नाहीच – प्रवीण बर्दापूरकर) एकेकाळी उत्पादन शुल्क हे बीट एक रिपोर्टर म्हणून सांभाळलं असल्यानं, ‘दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पिण्याऐवजी १०८ कोटी लिटर्स पाणी बिअर निर्मितीसाठी’, या बातमीनं आश्चर्य वाटलं. १९९३-९४मध्ये मी ‘लोकसत्ता’ आणि माझा तेव्हाचा ‘बडी’ धनंजय गोडबोले यानं ‘महाराष्ट्र …

राज ठाकरे आणि नेमाडेंची ताशेरेबाजी !

गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत तर विलक्षण ताकदीचे कादंबरीकार डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी औरंगाबादेत केलेल्या वक्तव्यांना ‘सुमार ताशेरेबाजी’ यापेक्षा जास्त महत्व नाही. ही ताशेरेबाजी एकाच दिवशी सायंकाळी व्हावी हा एक योगायोग समजायला हवा. //१// ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे औरंगाबादला बोल-बोल-बोलून खाली बसतात न बसतात तोच महाराष्ट्र नवनिर्माण …

खेळ, सरकारी समित्यांचा !

//१// आदिवासी असल्याचं बोगस प्रमाणपत्र दाखल करून आदिवासींच्या नोकऱ्या बळकावल्या गेल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि सरकारनं स्थापन केलेल्या समित्यांची, या समित्यांवर नियुक्तीसाठी होणाऱ्या ‘धडपडीं’ची, या समित्यांच्या कामाची गत काय होते याची, स्मरणं जागी झाली. सरकारनं निर्णय घ्यायचा आणि अंमलबजावणी नोकरशाहीनं …

अणेंचा राजीनामा आणि सुमारांचा कल्ला !

मित्रवर्य श्रीहरी अणेंचं मला एक आवडतं. त्याला जे काही वाटतं-पटतं, ते तो कोणालाही न जुमानता-कोणाचीही भीड मुरव्वत ना बाळगता, व्यवस्थित मांडणी करत बोलतो (आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचं तर तो ‘पंगे’ घेत असतो!) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुळीच-मुळ्ळीच आवडत नाही-ते त्याचं स्वतंत्र विदर्भ मागणं. त्यानं आता, विदर्भासोबत मराठवाडाही स्वतंत्र करावा असं …