नाठाळ नोकरशाहीला वेसण हवी(च)

भगवान सहाय या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या तथाकथित असंवेदनशील वर्तनाबद्दल गेल्या आठवड्यात मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळात आंदोलन केलं. सहाय असंवेदनशील वागले असतील तर त्याचं मुळीच समर्थन नाही पण, त्याची खातरजमा न करता, चौकशी न करता काम सोडून आंदोलन करणं ही कृती शिस्तभंगाची नाही काय ? अधिकाऱ्याचे वर्तन एकतर्फी असंवेदनशील ठरवून कामासाठी …

गावाकडचा ‘हरवलेला’ गणपती…

औरंगाबाद जिल्ह्यातलं कन्नड तालुक्यातलं अंधानेर, वैजापूर तालुक्यातलं लोणी आणि खंडाळा, बीड जिल्ह्यातलं नेकनूर, पाटोदा, डोंगरकिन्ही, धोंडराई… यापैकी एकही आमचं मूळ गाव नव्हे पण, आईच्या (तिला आम्ही माई म्हणत असू) नोकरीच्या निमित्तानं या गावात (त्यातही अंधानेरला जास्त) आमचं वास्तव्य झालं. माई नर्स होती. त्या काळात ग्रामीण भागात वैद्यकसेवा दुर्लभ होती. नर्स …

आमदारांविरुद्ध मतलबी ओरड !

विधि मंडळाच्या सदस्यांचे वेतन आणि भत्ते वाढल्यावर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मिडियात अशा काही प्रतिक्रिया व्यक्त होताहेत की, जणू काही आधीच मवाली असलेल्या आमदारांनी, कुणाचा तरी खून करून राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. अर्थात, ही भावना निर्माण करण्यास बहुसंख्य राजकारण्यांचे शिसारीसदृश्य पंचतारांकित राहणीमान, सप्ततारांकित मग्रुरी आणि राजकारणाचं झालेलं बाजारीकरण जबाबदार …

वेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं!

मावळत्या आठवड्यात स्वतंत्र विदर्भाचं तुणतुणं वाजवण्याचा (वार्षिक) राजकीय उपचार पुन्हा एकदा पार पडला. सत्ताधारी किती उतावीळ आणि विरोधी पक्ष किती अदूरदर्शी आहे, हेच त्यातून दिसलं. भाजप-सेना युतीच्या अर्ध्या मंत्रीमंडळावर एका पाठोपाठ भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी नेत्यांकडून झालेले आहेत. आर्थिक घोटाळ्यांच्या आघाडीवर ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ आरोपींच्या पिंजऱ्यात उभी केली गेली; कॉंग्रेस आणि …