फडणवीसबुवा, सावध ऐका पुढल्या हांका…

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याला आणि त्यांच्या नेतृत्वखाली राज्यात भाजप-सेना युतीचं सरकार सत्तारुढ होण्याला ऐन दिवाळीत दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमितानं फडणवीस यांच्या मुलाखती, सरकारनं गेल्या दोन वर्षात केलेल्या कामगिरीच्या जाहिराती प्रसिध्द झाल्या, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारातील मंत्र्यांची ‘एबीपी माझ्या’च्या कार्यक्रमात भाषणं झाली. विविध वृत्तपत्रांनीही या सरकारच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र …

‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…

आपण एक समंजस समाज म्हणून बहुसंख्येनं जशी चर्चा करायला हवी ती करत नाही, अनेक बाबींचा मुलभूत विचार करत नाही; अशी होणारी तक्रार रास्तच आहे. त्यामुळे जे काही तथाकथित मंथन घडत असतं ते फारच वरवरचं असतं, अनेकदा तर ती एक गल्लतच असते. थोडक्यात आभासी प्रतिमांच्या आहारी जाणं, हे आपल्या समाजातील बहुसंख्यांचं …

भय इथले संपावे…

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्राची घुसमट झालेली आहे, असं भाष्य तीन आठवड्यापूर्वी केलं होतं पण, आता राज्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती त्यापेक्षा जास्त चिघळली आहे. धर्म आणि जात-पोटजात-उपजात अशी समाजाची मोठी विभागणी सुरुच आहे. मराठा, दलित, बहुजन, धनगर, मुस्लीम अशी ही दरी …

संशयकल्लोळ

=१= औरंगाबादला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीवर प्रथेप्रमाणे काही मोर्चे निघाले. सरकार दरबारी आपले गाऱ्हाणे घालण्याचा तो एक लोकशाहीतला मार्ग आहे. एक मोर्चा विना अनुदानित शाळातील शिक्षकांचा होता. अन्य कोणत्याही मोर्चावर बळाचा वापर करावा लागला नाही पण, शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांना लाठीमार करावा लागला. कारण अनुदानाची मागणी प्रदीर्घ काळापासून मान्य होत नसल्यानं निराश …

उन्माद नको, वास्तवाचं भान हवं

भारतीय लष्कराच्या पठाणकोट तळावर झालेला दहशतवादी हल्ला ते २९ सप्टेबरला भारताने पाकच्या सीमेत प्रवेश करुन पाकच्या भूमीवरील दहशतवाद्यांचे काही तळ उध्वस्त करण्याची केलेली कारवाई, या काळात आपण एक समाज म्हणून प्रगल्भ, समजूतदार, सभ्य आणि वास्तवाचं भान बाळगणारे आहोत का, असा प्रश्न मनात उभा राहिला आहे. भारतीय लष्कराच्या या एका कृतीनंतर …