‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल!

बुध्द : सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांनी सप्रेम भेट दिलेली भगवान बुध्द यांची विलक्षण रेखीव मूर्ती. देशाच्या उत्तरपूर्व भागात भटकंती करायला जायची विमानाची तिकीटं हातात आल्यावर आसामचे राज्यपाल बनवारीलालाजी पुरोहित आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांची सहाजिकच आठवण झाली. पत्रकारांच्या आमच्या पिढीपेक्षा जगण्याचे दहा-बारा उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेली आणि कर्तृत्वानं ज्येष्ठ …

वनव्रतस्थ मारुती चितमपल्ली

‘भगवे’पणाचा निकष आड न आणला जाता ज्येष्ठ साहित्यिक, व्रतस्थ ‘वनसंत’ मारुती चितमपल्ली यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर सन्मान जाहीर झाला आणि त्यांची झालेली पहिली भेट आठवली— विशेषत: महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात आलेलं चितमपल्ली यांचं लेखन वाचनात आलेलं असल्याचे ते दिवस होते. ते लेखन वेगळं होतं, त्याला अनवट असा रानगंध होता, …

राजकीय अस्तित्वाची दंगल!

अपेक्षेप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची दंगल सुरु झाली आहे. थंडीच्या लाटेत सापडलेल्या उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंडात राजकीय हवा तापण्याचे दिवस आलेले आहेत. पाच राज्यातील एकूण ६९० मतदार संघात निवडणूक आयोगानं सुरु केलेल्या निवडणुकीच्या दंगलीचा निकाल येत्या अकरा मार्चला लागणार आहे. भविष्यातल्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे …