जांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ!

तेव्हा; आमच्या लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की मामाच्या गावाला जाण्याची प्रथा होती. मला तर चार मामा होते. पण, मला उमरखेडच्या अशोकमामाकडे जायला आवडायचं कारण आजी-तिला आम्ही अक्का म्हणत असू, फार लाड करत असे. अशोक खोडवे हा मामा आणि मामी दोघीही शासकीय नोकरीत होते. उमरखेडच्या आठवडी बाजाराला लागून असलेल्या एका भल्यामोठ्या …

मुख्यमंत्री, ऐका ही अस्वस्थ समाजमनाची स्पंदनं…

-येवला तालुक्यातील नगरसूलच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यानं शेतातला कांदा पेटवून दिला, कारण भाव नाहीत; ही बातमी वाचत असतानाच बुलढाण्याहून पत्रकारितेतला दीर्घकाळचा सहकारी सोमनाथ सावळे यांचा फोन आला. सोमनाथ मुळचा शेतकरी. आता शेती आणि पत्रकारिता यांची सांगड घालून वावरत असतो. निवडणुकांचा विषय निघाल्यावर सोमनाथ म्हणाला, ‘सोयाबीनचे भाव पार पडल्यानं शेतकरी मेटाकुटीला …

‘राज, तुम्हारा चुक्याच !’

शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे नात्यानं मामा-भाचे. मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रीमंडळात सुधीर जोशी महसूल मंत्री होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मामांविषयी सुधीर जोशी यांची एक मुलाखत प्रकाशित झाली होती. त्यात एक प्रश्न होता – ‘मनोहर जोशी यांच्या स्वभावातला सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट कोणता?’ त्यावर सुधीर …

नो पार्टी इज डिफरन्ट !

‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असं कितीही म्हणवून घेतलं तरी भारतीय जनता पक्ष आपल्या देशातील अन्य कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मुळीच वेगळा नाही हे सांगायला नकोच. भाजपत असलेली बजबजपुरी, हेवेदावे, सत्तास्पर्धा, घराणेशाही अन्य पक्षांपेक्षा काहीही वेगळी नाहीये; अन्य राजकीय पक्षांनी ते ‘डिफरन्ट’ असल्याचा दावा कधीच केलेला नाही तर आपला पक्ष ‘वेगळा’ असल्याचे फुसके …