गांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप!

जुलै २०१७ स्थळ- नर्मदेचा तीर, बडवानी (बरवानी), मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या प्रशासनानं बुडीत क्षेत्रात येत असल्याचं कारण देत २७ जुलैच्या मध्यरात्री कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी आणि त्यांचे खासगी सचिव महादेवभाई देसाई यांच्या समाधी जेसीबी यंत्राने उध्वस्त केल्या. महात्मा गांधी यांचा अस्थी कलश अज्ञात स्थळी नेऊन ठेवला. महात्मा गांधी हे भारताच्या …

लांच्छनास्पद भ्रष्टाचाराची लक्तरं…

महाराष्ट्राची बहुसंख्य नोकरशाही केवळ मुजोर, नाठाळ आणि असंवेदनशीलच नाही तर भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे; सरकारनं कररुपानं जनतेकडून जमा केलेल्या पैशावर ही बहुसंख्य नोकरशाही डल्ला मारत आहे, असं जे म्हटलं जातं त्यावर लातूरच्या घटनेनं शिक्कामोर्तब तर केलंच आणि त्यापुढे जाऊन भ्रष्टाचार करतांना या नोकरशाहीनं कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळून ठेवण्याची पातळी कशी गाठलेली …

मुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही!

गेल्या आठवड्यात विधानसभेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कथित गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेलं टीकास्र बोचरं असलं तरी योग्यच होतं. मेहता आणि मोपलवार यांना मुख्यमंत्री सरंक्षण देत असल्याची विरोधी पक्षांची प्रबळ भावना झाली असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची आजवरची स्वच्छ …

भाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन !

घडलं ते असं- भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा फोन आला. उपाध्ये म्हणाले, ‘भाजपचे प्रवक्ते आणि विविध चर्चात सहभागी होणारे पक्षाचे प्रतिनिधी (पॅनेलिस्ट) यांचा एक अभ्यासवर्ग उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित केला आहे; त्यात तुम्ही एक एक्स्पर्ट म्हणून सहभागी व्हाल का ?’ मी विचारलं, ‘विषय काय आहे ?’ केशव …