दिलीप वळसेंची एकसष्ठी !

(गेल्या सुमारे चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात वावरणारे, ​प्रशासनात ​आपल्या कामाचा ठसा उमटवणारे माजी मंत्री, शरद पवार यांचे कट्टर समर्थक दिलीप वळसे पाटील एकसष्ठी गौरव समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला . त्यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या गौरव ग्रंथासाठी दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास अनुभवलेल्या पत्रकाराने मांडलेला हा ताळेबंद -) घटना माधव …

निसरड्या वाटानंतर डिजिटल वळण

देशाच्या आणि राज्याच्या राजधानीत काम करणं हे प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न असतं. राजकीय वृत्त संकलन करणाऱ्या कुणाही पत्रकारासाठी तर या दोन्ही ठिकाणी काम करण्याची संधी मिळणं अनमोल असतं. ती संधी मला मिळाली. मात्र, यात दिल्लीचं वळण अनपेक्षित होतं; त्याची थोडी पार्श्वभूमी सांगायलाच हवी – तब्बल २९ वर्ष एक्सप्रेस वृतपत्र समुहाच्या लोकसत्ता …

नांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ

नांदेड महापलिकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला धूळ चारली आणि कॉंग्रेसला संजीवनी दिली; एवढ्यापुरता हा मुद्दा नाही तर त्यापलिकडे या निवडणुकीच्या निकालाचं महत्व आहे. भाजपची जबरदस्त हवा असल्याची जी काही चर्चा मिडियात होती ती वाचनात असतानाच निवडणूक सुरु झाल्यावर नांदेडात दोन दिवस होतो; त्याचवेळी मिडियाच्या त्या चर्चेत तथ्य …

‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष !

पक्क आठवतं, १९७३चा तो जानेवारी महिना होता. नेहेरु युवक केंद्राच्या आम्ही काहींनी औरंगाबाद ते पुणे आणि परत अशी सफर सायकलवरून केली. पुण्यात फिरत असतांना किर्लोस्कर प्रेसची पाटी दिसली आणि मी आत शिरलो. चौकशी करुन ह. मो. मराठे यांना गाठलं आणि त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर…’ या कादंबरीवर भडाभडा बोलायला सुरुवात केली. शिडशिडीत …