चिपळूणचे दिवस 

     चिपळूणचे दिवस काही लख्ख , काही अंधुक आठवतात तर बरेच आता विस्मरणात गेले आहेत . ते सहाजिकही आहे कारण आता म्हणजे , २०१८च्या डिसेंबर महिन्यात ते दिवस उलटून गेल्याला चार दशकं होताहेत . चिपळूणचे दिवस म्हणजे नानासाहेब उपाख्य निशिकांत जोशी आणि दैनिक ‘सागर’शी जोडला गेलेला संस्कार आहे , तिथे …

बातमी वाघोबाची !

  पांच राज्यांच्या निवडणुका संपल्या , सर्वत्र चर्चा झडल्या , विश्लेषणं लिहून/बोलून झाली , आडाखे बांधून झाले , भविष्यवाण्या वर्तवून झाल्या…अतिकंटाळा यावा इतकं हे सर्व अजीर्णाचं होतं ! लक्षात आलं , सध्या देशातले वाघोबा माध्यमांत गाजताहेत ; ( टी-१ उपाख्य अवनीला ‘कॉल हिम डॉग अँड किल’ असं क्रूरपणे मारुन टाकलं …

निवडणूक निकाल : कांही निरीक्षणं

||१|| ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही केवळ वल्गना आहे , भारतातून काँग्रेसचं उच्चाटन कधीच होणार नाही कारण सर्वधर्म समभाव हा विचार घेऊन या देशात वावर आणि विस्तार्‍लेल्या काँग्रेसनं देशातील सर्व जाती-उपजाती-पोटजाती , विविध भाषक , अनेक धर्म , परस्पर भिन्न संस्कृती यांची मोट या देशात सर्वात आधी बांधली , काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं , स्वातंत्र्यानंतरही इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणाहुती …

वसंतदादा – उपेक्षित , सुसंस्कृत नेतृत्व

पत्रकारितेतील माझे समकालीन व मित्र दशरथ पारेकर यांच्या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक व मित्रवर्य सदा डुंबरे यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचनात आली आणि आठवलं माजी मुख्यमंत्री , सर्वार्थानं लोकनेते असलेल्या वसंतदादा पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष फारसा गाजावाजा न होता पार पडलंय ; त्याबद्दल खंतही वाटली . वसंतदादा पाटील यांचं स्मरण करत असतांना …

‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’

नासिक महापालिकेचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याबद्दल सरकारला दोष देणारे लोक आणि त्या सुरात सूर मिसळवणारी माध्यमे अज्ञानी आहेत ; त्यांना सरकार आणि नोकरशाही यातील फरक , त्यांच्या जबाबदार्‍या याचं कोणतंही आकलन नाही , असंच म्हणावं लागेल . इथे सरकार म्हणजे निवडून आलेले म्हणजे लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही म्हणजे …

अचानक शस्त्र म्यान केलेल्या सुषमा स्वराज

-घटना १९९९मधली आहे . देशाच्या राजकारणात तेव्हा नुकत्याच सक्रिय झालेल्या श्रीमती सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक उत्तरप्रदेशातील अमेठी सोबतच कर्नाटकातील बेल्लारी येथूनही लढवण्याचा निर्णय घेतला . यात बेल्लारी हा काँग्रेसनं भाजपला दिलेला चकवा होता . एका रात्रीत हालचाली झाल्या आणि बेल्लारी लोकसभा मतदार संघातून श्रीमती सोनिया गांधी यांच्या विरोधात लढण्याचा …

कैवल्यदानी !

(अनंतराव भालेराव यांचे रेखाचित्र ल.म.कडू यांच्या सौजन्याने.) ——————————————————— [ मराठी पत्रकारितेवर आजही प्रभाव असणार्‍या ‘मराठवाडा’ या दैनिकाचे संपादक अनंतराव भालेराव यांचं जन्मशताब्दी वर्ष १४ नोव्हेंबरला सुरु झालं . अनंतराव भालेराव हे महाराष्ट्रात सर्वदूर घट्ट पाळंमुळं पसरलेले केवळ मूल्यनिष्ठ , अबोल धाडसी , बहुपेडी संपादक-लेखक नव्हते तर तो एक सर्वव्यापी संस्कार …

विनोबांच्या प्रायोपवेशनाची हकीकत…

( आचार्य विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशनाचं वृत्तसंकलन करत असतांनाची ही जशी नोंद आहे तसं प्रदीर्घ आणि अविश्रांत परिश्रम घेऊनही एखादी बातमी चुकते कशी याचीही ही हकीकत आहे . देशमुख आणि कंपनीच्या वतीने लवकरच प्रकाशित होणार्‍या ‘डायरी’ या पुस्तकावरुन साभार ) आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी, जयंतीदिनाच्या कार्यक्रमांचा उल्लेख आजच्या कार्यक्रमात …

ते भरजरी ‘वर्कोहोलिक’ दिवस…

( नाना पाटेकर आणि कुमार केतकर यांच्यासोबत टीम लोकसत्ता नागपूर ) [ ‘माधवबाग आयुर्वेद या वैद्यक शृंखलेच्या ‘आरोग्य संस्कार’ या यंदाच्या दिवाळी अंकासाठी ‘टीम वर्क’ ही संकल्पना होती आणि वृत्तपत्र हा विषय मला देण्यात आलेला होता . त्या अंकात नागपुरातून प्रकाशित होणार्‍या ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीविषयी लिहिलेला हा लेख-] एक काळ …

स्मरणातले विलासराव

( कांहीच कारण नसताना कांही मान्यवरांवर लिहायचं राहून गेलेलं आहे . त्यात एक महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते , माजी मुख्यमंत्री , मित्रवर्य विलासराव देशमुख . एकेकाळचे त्यांचे कार्यालयीन सहकारी रविकिरण जोशी यांनी रेटा लावला आणि राज्य विधिमंडळाच्या वि. स. पागे संसदीय केंद्रातर्फे प्रकाशित होणार्‍या ग्रंथासाठी अखेर ‘स्मरणातले विलासराव’ शब्द्ब्द्ध झाले . …