तोगडियांचे नकाश्रू…

विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांना प्रकाश वृत्त वाहिन्यांवर ‘लाईव्ह’ अश्रू ढाळतांना पाहिल्यावर या माणसात कोडगेपणा खच्चून भरलेला आहे याची खात्री पटली . राम मंदिराच्या उभारणीसाठी आधी विखारी धर्मांध चळवळ आणि नंतर त्यापेक्षाही जास्त विखारी आंदोलन करतांना मरण पावलेल्या किंवा गुजरातेत झालेल्या दंगलीत बळी पडलेल्या कोण्याही जाती-धर्माच्या माणसाच्या …

अविवेकाचा धुरळा !

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन पांचव्या मुख्य न्यायमूर्तींच्या संदर्भात जी काही परिस्थिती कथन केली ती जितकी चिंताजनक आहे, त्यापेक्षा जास्त त्यानिमित्तानं उडालेला अविवेकाचा धुरळा अस्वस्थ करणारा आहे. आपल्या देशाच्या कनिष्ठ ते अगदी सर्वोच्च न्याय व्यवस्थेत सर्व काही ‘ऑलवेल’ नाही, याचे अनेक संकेत आणि दाखले यापूर्वीही मिळालेले …

लालुंचा हुच्चपणा!

चारा घोटाळ्यात आतापर्यंत दोन खटल्यात लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा झालेली आहे. तिसऱ्या खटल्याचा निकाल या महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे, अशा बातम्या वाचनात आल्या आहेत. तो निकाल लागल्यावरही चारा घोटाळा प्रकरणातील अजून तीन खटले बाकी आहेत. पहिला निकाल लागला तेव्हा केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचं सरकार होतं तर …

भीमा कोरेगावनंतर : काही निरीक्षणे

// एक // आधी भीमा कोरेगावला मग त्याची प्रतिक्रिया म्हणून राज्यभर जे काही प्रतिसाद उमटले त्यावरून आपल्या राज्याचं पोलीस दल समाज मनाची नाडी ओळखण्यात कसं थिटं पडलं आहे , हे विदारकपणे समोर आलेलं आहे . गेल्या वर्षभरापासून भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती , त्यासाठी गावोगाव बैठका घेतल्या जात होत्या …