फडणवीसांची बोलाची कढी अन बोलाचाच भात!

नवी मुंबई विमानतळाचं भूमिपूजन आणि ​मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या राज्य सरकारनं केलेल्या अनेकपानी जाहिराती वाचनातांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना या राज्याच्या हिताची कळकळ, त्यांची विकासाची असणारी दूरदृष्टी, ते घेत असलेले अविश्रांत श्रम, त्यासाठी क्वचित स्वत:चा जीव धोक्यात घालून सतत करत असलेला प्रवास, याच काळात त्यांचं ‘पोलिटिकली करेक्ट’ असणं आणि कायम असलेली …

कॉंग्रेसचं जहाज भरकटायला नको…

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देतांना पंतप्रधानांनी संसदेत आणि राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात करावयाच्या भाषणात सरकारच्या कामाची भविष्यातील दिशा काय राहील, सरकारच्या काही धोरणात्मक बाबींचा उहापोह, काही संभाव्य समाजहितैषी योजना यावर भर देणं अपेक्षित असतं; तशी भारतीय सांसदीय लोकशाहीची ती परंपराही आहे. अशा भाषणात विरोधकांना एखाद-दुसरा टोला लगावला …

साहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य ना डावं ना उजवं!

आपल्या समाजाचं व्यवच्छेदक लक्षण काय तर, प्रत्येक बाबींला विरोध करणं किंवा त्याबाबत वाद घालणं. वर्षारंभी नवीन वर्ष इंग्रजी पद्धतीनं साजरं करावं की नाही, येथपासून हा विरोध म्हणा की वाद सुरु होतो आणि डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याऐवजी तो पैसा विदर्भाच्या विकासासाठी खर्च करावा… असा वर्षभराचा, कोणताही विषय-पक्ष-विचार वर्ज्य …

प्रिय राणी आणि अभय बंग

राणी आणि अभय या डॉक्टर बंग दांपत्याला पद्मश्री हा सन्मान जाहीर झाल्याचं कळल्यावर आनंदाचे कल्लोळ भेटीला आले; त्याची अनेक जीवाभावाची कारणं आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आमच्यात प्रांजळ मैत्री आहे. त्यातही अभयशी जास्त संपर्क असतो. अकृत्रिम मैत्रीचे हे बंध आमच्या पुढच्या पिढीतही कायम आहेत. राणी आणि अभय या बंग डॉक्टर दांपत्याच्या, …