कुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ !

कुमार केतकर यांना कॉंग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आणि माध्यमांत अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रियांचा महापूर आला. अनेकांचा पोटशूळ उमाळून आला, कुणाला केतकर ब्राह्मण असल्याचं आठवलं, अनेकांना त्यांनी शिवस्मारकाच्या संदर्भात केलेली टीका आठवली, अनेकांना त्यांचं गांधी-नेहेरु प्रेम आठवलं तर अनेकांना त्यांच्या कथित भूमिका बदलू म्हणजे कम्युनिस्ट ते कॉंग्रेसचे ‘चमचे’ प्रवासाचा आठव झाला… अनेकजण …

पतंगराव : मुख्यमंत्री ‘इन वेटिंग…’

अशक्यप्राय स्वप्नाची पूर्ती करण्याची अफाट क्षमता असणारा, रांगडा स्वभाव, बिनधास्त शैली, मन निर्मळ आणि उमदेपणाचं मनोहारी रसायन पतंगराव कदम यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. पतंगराव कदम यांच्याशी ओळख होऊन तीन दशकं उलटून गेली. आमचे सूर जुळले ते भलत्याच एका बातमीनं. तेव्हाच्या अविभक्त मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या वृत्तसंकलनासाठी ‘लोकसत्ता’कडून मला तर …

कॉपी, तेव्हा आणि आताही!

दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या की कॉपीच्या बातम्याचं पीक बहरात येतं. या वर्षी या बातम्या वाचतांना आणि पाहतांना स्वानुभव आठवला आणि या पिकाला मरण नाही कायम भाव आहे याची खात्री पटली. पत्रकारितेत आलो तरी १९९८ पर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि अधुनमधून कॉपी हा केवळ बातमीचा विषय होता; तोही दुरुनच. …

एका गांधीवाद्याचा अलक्षित मृत्यू …

वसई-विरार पट्ट्यातल्या दहशतीच्या विरोधात आदिवासींच्या बाजूने बेडरपणे आवाज उठवणारा सामाजिक कार्यकर्ता, माजी आमदार, मित्रवर्य विवेक पंडित याचा गेल्या आठवड्यात फोन आला. त्यानं विचारलं, ‘बाबा (म्हणजे मोरेश्वर वडलकोंडावार) बद्दल कळालं का?’ ‘नाही’ म्हणून सांगितल्यावर विवेक म्हणाला, ‘बाबा वारला’. ‘काय सांगतोस, कधी?’ मी विचारलं. त्यावर विवेक उत्तरला, ‘आठ-दहा दिवस होऊन गेले आता. …