आणखी किती आसारामबापू…

पत्रकारितेच्या निमित्तानं झालेल्या दिल्लीच्या वास्तव्यात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा अस्त तर भाजपात लालकृष्ण अडवाणी युगाचा अस्त आणि नरेंद्र मोदी युगाचा उदय यासह अनेक राजकीय घडामोडी आणि काही खळबळजनक घटनाही अनुभवाच्या पोतडीत जमा झाल्या . खळबळजनक घटनांत ‘तहलका’च्या तरुण तेजपाल आणि स्वयंघोषित भोंदू …

ग्रंथांचं गुणगुणणं !

आईला आम्ही माई म्हणत असू. शिक्षा करण्याची माईची संवय जगावेगळी होती (हे आता जाणवतं!); खोड्या केल्या, चूक जरा गंभीर असली किंवा शेजारपाजारच्या कोणी चुगली केली तर पितळी पिंपातील पाण्यात उभं राहण्याची आणि तसं उभं असतांना म्हणजे, शिक्षा भोगताना एखादं पुस्तक मोठ्या आवाजात वाचण्याची सक्ती असे. शिक्षेची तिनं ठरवलेली मुदत संपण्याआत …

पवारांच्या पंतप्रधानपदाचं ‘मिथक’

अलिकडच्या काही वर्षांत कोणत्याही दूतांनी क्षितीजावरुन जरी लोकसभा निवडणुकीच्या दुंदुभी वाजवायला सुरुवात केली तरी, आसमंतात लगेच शरद पवार पंतप्रधान होण्याच्या वावड्या उडू लागतात. या हंगामात त्याची सुरुवात शरद पवार यांच्या दरबारातील खासे प्रफुल्ल पटेल यांनी केली, त्या सुरात अभिनेते नाना पाटेकर यांनीही आता सूर मिसळला आहे. दरम्यान गुजराथ विधानसभा निवडणुकीपासून …

देवेंद्र फडणवीस क्लीनचीट प्रा. लि. !

समाज माध्यमांवर आलेली एखादी कमेंट कधी कधी अतिशयोक्त असूनही वास्तवाला चपखलपणे कशी भिडते याचं उदाहरण म्हणजे – “ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बँनक्राफ्ट यांनी जर महाराष्ट्रात चेंडू कुरतडण्याची कृती केली असती तर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नक्कीच ‘क्लीनचीट’ मिळाली असती!” – ही कमेंट वाचल्यावर लक्षात …