सर्वोच्च, स्वागतार्हही !

देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या विरोधात कथित बंड पुकारुन मोठं वादळ उभं केल्याचा आव आणला आणि त्यात राजकीय तेल ओतलं जाण्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. त्याच सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठांनं गेल्या आठवड्यात काही महत्वपूर्ण निवाडे दिलेले आहेत; एवढंच नाही तर तत्पूर्वी त्या कथित बंडात सहभागी झालेल्या एकाची आपला उत्तराधिकारी …

बदले, बदले राहुल गांधी नजर आते है !

२०१४च्या निवडणुकीचे पडघम २०१३त वाजायला सुरुवात झाल्यापासून ते भाजपचं सरकार सत्तारुढ होईपर्यंत मी दिल्लीत होतो. याचकाळात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झाली, राजकीय क्षितिजावर अस्ताला जातांना लालकृष्ण अडवाणी यांची झालेली फडफड, काँग्रेसचा दारुण पराभव बघता आलेला होता. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या काही सभांचं वृत्तसंकलन करण्याची …

रयतेनं मंत्रालयावर धाव घेतली तर ?

एका मंत्र्याच्या स्वीय सहायकानं १० लाख रुपयांची लांच घेऊनही उस्मानाबादच्या एका संस्थेचं काम केलं नाही परिणामी, लांच घेणार्‍या त्या ‘थोर’ सचिवाला मंत्रालयातच मार खावा लागला लागल्याची घटना गेल्या आठवड्यात एक प्रकाश वृत्त वाहिनीनं लावून धरली आणि अचानक मागेही घेतली. (आजकाल माध्यमांनी लावून धरलेले एखादे प्रकरण अचानक थांबवले जाण्याच्या घटना अनेकदा …