निर्लज्जम ‘सत्ता’सुखी !

सगळ्या घरात होतात तसे सायली म्हणजे-आमच्या कन्येचे, लहानपणी आईशी रुसवे-फुगवे होत असत. ‘इतका हट्ट करतेस, लाज नाही वाटत तुला’ असं म्हणत आई रागावली किंवा रुसली की मध्यस्थीसाठी येणाऱ्या रडवेल्या कन्येला एक जालीम उपाय मी शिकवला होता- आईजवळ जायचं, तिची पपी घ्यायची आणि ‘निर्लज्जम सदासुखी’ म्हणायचं. त्या निरागस पपीत आई विरघळत …

मेरे शहर का माहोल अब सुहाना न लगे…

//१// पत्रकारितेच्या निमित्तानं नागपूरला पडाव पडल्यावर उर्दूचे जाणकार, मराठी साहित्यातील युद्ध कथांचं दालन समृद्ध करणारे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आणि महत्वाचं म्हणजे, ‘आईना-ए-गझल’ या उर्दू ते मराठी, हिंदी आणि इंग्रजी कोशाचे कर्ते डॉ. विनय उपाख्य राजाभाऊ वाईकर यांची ओळख झाली. मी औरंगाबादचा आहे असं सांगितल्यावर त्यांच्या परिचित शैलीत राजाभाऊ म्हणाले – …

राजकारणातली विधिनिषेधशून्यता – जामिनावरचे भुजबळ !

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा तसंच विधानपरिषदेच्या सहा आणि पतंगराव कदम यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पलूस विधानसभा या निवडणुकांच्या निमित्तानं महाराष्ट्रात जे काही राजकारण सुरु आहे त्याचं वर्णन विधिनिषेधशून्य याच शब्दात करता येईल; त्यावर अर्थातच यांना विधिनिषेध होता कधी, असा प्रश्न कुणीही विचारी आणि लोकशाहीवर निष्ठा असणारा माणसानं उपस्थित केला तर …

जयंत पाटलांसमोरील आव्हानं आणि मुख्य सचिवपदाची निरर्थक चर्चा

//१// जयंत पाटीलांना शुभेच्छा! जयंत पाटील यांची (महा)राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी एकमतानं निवड करुन राजकीयदृष्ट्या चाणाक्ष (या शब्दाला पर्याय म्हणून अनेकजण धूर्त असा शब्दप्रयोग करतात!) असल्याचं शरद पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. जयंतरावांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जरा जास्तच वाढत चाललेली सलगी आणि ते काँग्रेसमधे जाणार या कुजबुजीला म्हणा …

आणखी किती आसारामबापू…

पत्रकारितेच्या निमित्तानं झालेल्या दिल्लीच्या वास्तव्यात पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा अस्त तर भाजपात लालकृष्ण अडवाणी युगाचा अस्त आणि नरेंद्र मोदी युगाचा उदय यासह अनेक राजकीय घडामोडी आणि काही खळबळजनक घटनाही अनुभवाच्या पोतडीत जमा झाल्या . खळबळजनक घटनांत ‘तहलका’च्या तरुण तेजपाल आणि स्वयंघोषित भोंदू …

ग्रंथांचं गुणगुणणं !

आईला आम्ही माई म्हणत असू. शिक्षा करण्याची माईची संवय जगावेगळी होती (हे आता जाणवतं!); खोड्या केल्या, चूक जरा गंभीर असली किंवा शेजारपाजारच्या कोणी चुगली केली तर पितळी पिंपातील पाण्यात उभं राहण्याची आणि तसं उभं असतांना म्हणजे, शिक्षा भोगताना एखादं पुस्तक मोठ्या आवाजात वाचण्याची सक्ती असे. शिक्षेची तिनं ठरवलेली मुदत संपण्याआत …

पवारांच्या पंतप्रधानपदाचं ‘मिथक’

अलिकडच्या काही वर्षांत कोणत्याही दूतांनी क्षितीजावरुन जरी लोकसभा निवडणुकीच्या दुंदुभी वाजवायला सुरुवात केली तरी, आसमंतात लगेच शरद पवार पंतप्रधान होण्याच्या वावड्या उडू लागतात. या हंगामात त्याची सुरुवात शरद पवार यांच्या दरबारातील खासे प्रफुल्ल पटेल यांनी केली, त्या सुरात अभिनेते नाना पाटेकर यांनीही आता सूर मिसळला आहे. दरम्यान गुजराथ विधानसभा निवडणुकीपासून …

देवेंद्र फडणवीस क्लीनचीट प्रा. लि. !

समाज माध्यमांवर आलेली एखादी कमेंट कधी कधी अतिशयोक्त असूनही वास्तवाला चपखलपणे कशी भिडते याचं उदाहरण म्हणजे – “ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बँनक्राफ्ट यांनी जर महाराष्ट्रात चेंडू कुरतडण्याची कृती केली असती तर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नक्कीच ‘क्लीनचीट’ मिळाली असती!” – ही कमेंट वाचल्यावर लक्षात …

कुमार केतकर नावाचा ज्ञानसंपन्नतेचा दरवळ !

कुमार केतकर यांना कॉंग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आणि माध्यमांत अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रियांचा महापूर आला. अनेकांचा पोटशूळ उमाळून आला, कुणाला केतकर ब्राह्मण असल्याचं आठवलं, अनेकांना त्यांनी शिवस्मारकाच्या संदर्भात केलेली टीका आठवली, अनेकांना त्यांचं गांधी-नेहेरु प्रेम आठवलं तर अनेकांना त्यांच्या कथित भूमिका बदलू म्हणजे कम्युनिस्ट ते कॉंग्रेसचे ‘चमचे’ प्रवासाचा आठव झाला… अनेकजण …

पतंगराव : मुख्यमंत्री ‘इन वेटिंग…’

अशक्यप्राय स्वप्नाची पूर्ती करण्याची अफाट क्षमता असणारा, रांगडा स्वभाव, बिनधास्त शैली, मन निर्मळ आणि उमदेपणाचं मनोहारी रसायन पतंगराव कदम यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. पतंगराव कदम यांच्याशी ओळख होऊन तीन दशकं उलटून गेली. आमचे सूर जुळले ते भलत्याच एका बातमीनं. तेव्हाच्या अविभक्त मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या वृत्तसंकलनासाठी ‘लोकसत्ता’कडून मला तर …