पवार नावाचा करिष्मा आणि महिमा !

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि पाहिल्याच आठवड्यात माढा मतदार संघातील निवडणूक लढवणे-न-लढवणे , विखे पाटील यांची केलेली कोंडी , त्याचा भाजपला होणारा संभाव्य लाभ आणि त्यामुळे काँग्रेसला बसलेल्या धक्क्यामुळे देशातील एक ज्येष्ठतम नेते , (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले ; लगेच    माध्यमांत अनेक शक्यतांचे पीक आले . शिवाय पवारांची घराणेशाही , फलटणच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाचा संदर्भ देऊन शरद पवारांची संपलेली …

युतीनंतरही सेनेसमोर अडथळेच जास्त !

निश्चलनीकरण आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दुष्परिणामापोटी लोकसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकात दणका बसला तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार हे राजकारण किमान जाणणार्‍याने ओळखलेले होते . राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकात भाजपला बेदम मार पडल्यावर तर युती होणार यावर शिक्कामोर्तब झालेले होते . शिवाय , निवडणुकांचा हंगाम आला की युती आणि आघाड्यांचं पीक तरारुन येणे हे आता आपल्या देशातील राजकारणाचा भागच …

युद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…

केवळ तोंड पाटिलकी करत ‘युद्धस्य तु कथा रम्या’ असं म्हणणं आणि युद्धाचे परिणाम भोगणं यात फार मोठा फरक असतो आणि तो महाभीषण असतो , त्यात माणुसकीचा लोप  आणि सत्याचा कडेलोट असतो . ( महायुद्धाचे उमटलेले व्रण मध्य युरोपात आजही भळभळतांना दिसतात आणि ते बघताना अंगावर शहारा येतो . )  अर्थात सध्याच्या वातावरणात ज्यांना युद्धाचा उन्माद …