उठवळ राजकारणाचा धुरळा !

आपल्या देशातल्या राजकीय पक्षांनी सत्तेत असतांना आणि नसतांना कसं बेजबाबदारपणे वागायचं हे ठरवून टाकलेलं आहे हे, सध्या राजकीय क्षितीजावर उठलेल्या धुरळ्यावरुन पुन्हा एकदा जाणवत आहे. १९८०च्या दशकात आधी सत्तेत असतांना विश्वनाथप्रताप सिंह यांनी पुरवलेल्या दारुगोळ्याच्या आधारे विरोधी पक्षांनी बोफोर्स तोफांच्या खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा असाच धुरळा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी …

तरुण तेजपाल ते मुबश्शर अकबर !

नामवंत पत्रकार एम जे अकबर यांनी अखेर केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; खरं तर तो त्यांनी आधीच दिला/घेतला असता तर पार्टी वुइथ डिफरन्स म्हणवून घेणार्‍या भाजपच्या दुटप्पी नैतिकतेशी ते सुसंगत ठरले असते पण, ना तो त्यांनी त्यांनी लगेच दिला ना त्यांच्या पक्षानं तो घेतला. राजकीय पक्ष आणि राजकारणी किती निर्ढावलेले आहेत …

‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब!

‘मी टू’च्या निमित्तानं अनेक गौप्यस्फोट सध्या होताहेत त्यात सत्यता किती हे कळायला मार्ग नसला तरी अनेकांचे बुरखे टर्राटरा फाटले जाताहेत. ‘इतक्या वर्षानी का’, ‘किती जुनं झालं’, इथपासून ते भाषक आणि प्रादेशिक वादही त्यात आणला जात आहे; ते सर्व निरर्थक आहे; वनवासातून परतल्यावर सीतेलाही पावित्र्याची परीक्षा द्यायला लावणारी मानसिकता आता बदलायला …

प्रत्येकाला आकळणारा वेगळा गांधी !

(महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळ्या रुपात भेटतो आणि आकळतो. सात आंधळे आणि हत्ती या कथेची अनुभूती म्हणजे महात्मा गांधी आहे. जर्मनीतल्या छळ छावण्या बघतांना मला गांधी कसे नव्यानं आकळले त्याचा अनुभव आहे -) ‘सॅल्झबर्ग सेमिनार २००७’ चा विषय ‘द न्यू इन्फर्मेशन नेटवर्क : चॅलेन्जेस अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटी फॉर बिझिनेस, गव्हर्मेंट अ‍ॅण्ड मीडिया’ …

सर्वोच्च, स्वागतार्हही !

देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या विरोधात कथित बंड पुकारुन मोठं वादळ उभं केल्याचा आव आणला आणि त्यात राजकीय तेल ओतलं जाण्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. त्याच सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठांनं गेल्या आठवड्यात काही महत्वपूर्ण निवाडे दिलेले आहेत; एवढंच नाही तर तत्पूर्वी त्या कथित बंडात सहभागी झालेल्या एकाची आपला उत्तराधिकारी …

बदले, बदले राहुल गांधी नजर आते है !

२०१४च्या निवडणुकीचे पडघम २०१३त वाजायला सुरुवात झाल्यापासून ते भाजपचं सरकार सत्तारुढ होईपर्यंत मी दिल्लीत होतो. याचकाळात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झाली, राजकीय क्षितिजावर अस्ताला जातांना लालकृष्ण अडवाणी यांची झालेली फडफड, काँग्रेसचा दारुण पराभव बघता आलेला होता. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या काही सभांचं वृत्तसंकलन करण्याची …

रयतेनं मंत्रालयावर धाव घेतली तर ?

एका मंत्र्याच्या स्वीय सहायकानं १० लाख रुपयांची लांच घेऊनही उस्मानाबादच्या एका संस्थेचं काम केलं नाही परिणामी, लांच घेणार्‍या त्या ‘थोर’ सचिवाला मंत्रालयातच मार खावा लागला लागल्याची घटना गेल्या आठवड्यात एक प्रकाश वृत्त वाहिनीनं लावून धरली आणि अचानक मागेही घेतली. (आजकाल माध्यमांनी लावून धरलेले एखादे प्रकरण अचानक थांबवले जाण्याच्या घटना अनेकदा …

एकाकी अडवाणी आणि…

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते, शोकाकूल लालकृष्ण अडवाणी यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं हे छायाचित्र इंटरनेटवर बघितलं आणि जरा गलबलूनच आलं. एकेकाळी पक्षाचे सर्वेसर्वा ते भावी पंतप्रधान ते अडगळीत गेलेले आणि आता पूर्णपणे एकाकी पडलेले लालकृष्ण अडवाणी, हा प्रवास त्या अश्रूंतून डोळ्यासमोर झळकला. …

‘गुरु’ ते ‘गुरुदास’ : एका अस्वस्थतेचा प्रवास…

मित्र वर्तुळात ‘गुरु’, संघटनेत ‘बॉस’ आणि कार्यकर्त्यात ‘साहेब’ नावानं परिचित असणाऱ्या गुरुदास कामत यांच्या निधनाची बातमी अनपेक्षित आणि धक्कादायक ठरली कारण हे काही त्यांचं एक्झिट घेण्याचं वय नव्हतं. न पटणाऱ्या बाबतीत कुणाशीही थेट भिडणारं आणि आडपडदा नसलेलं, कायमच अस्वस्थतेच्या शिडावर स्वार झालेला स्वभाव असणारे गुरुदास कामत यांची राजकीय कारकीर्द शेवटपर्यंत …

राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी !

अशात अनेक नागपूरकरांचं समाज माध्यमांवरचं स्टेट्स कोलकात्याला जात असल्याचं दिसलं म्हणून उत्सुकता चाळवली. चौकशी केली तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेची आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी ही मंडळी या वाऱ्या करत असल्याचं कळलं. येत्या लोकसभा निवडणुका हांकेच्या अंतरावर असल्याची चाहूल लागलेली असतांना देशात मोदी आणि भाजपच्या विरोधात भक्कम …