उद्धव अन कळसूत्री बाहुले ? मुळीच नाही !

शिवसेनेची सूत्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडन स्वीकारल्यापासून सप्टेबर २०१९ पर्यंत नुसतीच टीका नाही तर मोठी अवहेलना उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आली . इतकी अवहेलना आणि अनेकदा तर अपमानास्पद भाषा वाटयाला आलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या समकालीन राजकरणातले एकमेव नेते आहेत . त्यात बहुसंख्य माध्यमं , त्यातही विशेषत: मुंबईतील पत्रकार तर जास्तच …

संतपीठाचं ग्रहण खरंच सुटेल ?

महाराष्ट्राचं प्रशासन किती अकार्यक्षम आणि स्वत: केलेल्या घोषणांबद्दल सरकारं किती उदासीन आहेत आहेत , याचं जळजळीत उदाहरण म्हणजे तब्बल ३९ वर्ष रेंगाळलेली संतपीठाची स्थापना आहे ! सरकारी काम अन सहा महिने थांब” ही म्हण तद्दन खोटी असून ही म्हण प्रत्यक्षात “सरकारी काम , कायम थांब” अशी आहे , याची प्रचीती …

उद्धव ठाकरेंचा अनिष्ट पायंडा !

राज्याचे मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांची प्रधान सल्लागार या पदावर  नियुक्ती करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिष्ट  पायंडा पाडला आहे ; त्यातून मुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला नोकरशहावर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा शिवाय एक पक्षप्रमुख म्हणून जरी आपण मातोश्रीवरुन  उत्तम कारभार हांकत असलो तरी प्रशासक म्हणून काम करतांना …

सुषमा आणि विजय सातोकर – सरळ रेषेतलं मैत्र !

      || नोंद …७ || ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाच्या नागपूर आवृत्तीतला विजूचा स्तंभ सध्या वाचायला   मिळतोय  . सव्वाचारपेक्षा जास्त दशकं इंग्रजी आणि तेही राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील  पत्रकारितेत घालवलेला विजू मराठीशी इतकी घट्ट नाळ जोडून आहे कौतुक वाटलं , विस्मयही वाटला . विजू म्हणजे विजय सातोकर . निवृत्तीनंतर …

हे तर , शेपटी तोडलेले संपादक !

एक आठवण जुनी आहे . आधी ती सांगतो आणि मग  मुख्य मुद्द्याकडे वळतो . ‘लोकसत्ता’ची नागपूर आवृत्ती सुरु झाली तेव्हा सुरेश द्वादशीवार निवासी संपादक आणि मी मुख्य वार्ताहर अशी टीम होती म्हणजे , वृत्तसंपादक नव्हता नाही असं नाही . तोही होता  पण , आम्ही दोघं असल्यावर त्याचा व्हायचा तो ‘चिवडा’ …

नागपूर नव्हे…लबरे़ज लम्हें !

          || नोंद  …६ || नागपूर-विदर्भ सोडल्याला आता सात वर्ष होतील . नेमकं सांगायचं तर , १६ जून २०१३ ला सकाळी आम्ही नागपूरहून  दिल्लीला प्रयाण केलं आणि २५ मे २०१५ला औरंगाबादला येऊन स्थायिक झालो २६ जानेवारी १९८१ ते १० ऑक्टोबर १९९६ , नंतर २५ मार्च २००३ …

देवेंद्रच्या वाटेवर उद्धवची पाऊले

संबंधित खात्याच्या  मंत्र्यांना न विचारता मंत्रीमंडळाच्या बैठकीत थेट प्रस्ताव मांडला जाण्याचा आणि त्यातून वाद निर्माण झाला असल्याचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी केलेला इन्कार लटका आहे ; नोकरशाहीला सरकारपेक्षा वरचढ होण्याची जी वाट देवेन्द्र फडणवीस यांनी प्रशस्त केली त्याच वाटेवर उद्धव ठाकरे यांची पाऊले पडत आहेत असाच त्या घटनेचा अर्थ …

सुरेखा ठक्कर नावाची जिजीविषा

|| नोंद …५ || कांही जण आपल्या नियमित संपर्कात नसतात , अनेकदा तर ते संपर्क क्षेत्राच्या बाहेरही असतात , अनेक महिने-वर्ष आपलं साधं बोलणंही झालेलं नसतं  तरी , ते आपले दोस्तयार असतात . त्यांच्या नावाचा एक टवटवीत फुलांचा ताटवा आपल्या मनात कायम फुललेला असतो . जरा फिल्मी अंदाजात सांगायचं तर- …

बड्या माध्यम समूहांचं ‘पब्लिक ऑडिट’ करा !

गेल्या किमान दीड महिन्यापासून  , दररोज ‘माझी  नोकरी गेली आहे’ किंवा ‘माझ्या वेतनात कपात  झाली आहे’ , हे सांगणारे ३/४ तरी फोन येतात आणि दिवसाच्या प्रारंभावर उदासीचे ढग दाटून येतात . जेव्हा राहुल कुळकर्णीची बातमी खरी की खोटी आणि त्या प्रकरणात कुणाचं म्हणजे एबीपी माझा ही प्रकाश वृत्त वाहिनी आणि …

|| परमधाम आश्रम , वर्धा ||

      || नोंद …४ || नागपूरहून वर्ध्याला जाताना पवनार गावाच्या आधी एक पूल लागतो . या पुलाच्या थोडसं अलीकडे उजव्या हाताला एक छोटा रस्ता खाली उतरतो आणि नदीकाठाला बिलगत पुन्हा उजवीकडे एका छोट्या  चढावरचं वळण घेऊन परमधाम आश्रमात विसावतो . हाच तो आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम . …