कलाकृती आकळणं आणि आठवणींचा गुंता

|| २ || अक्षर लेखन- विवेक रानडे ( अजूग = एकाकी / एकटा / एकेरी / बेगुमान / आड-दांड अशा अनेक अर्थछटा असलेला आणि कालौघात बराचसा विस्मरणात गेलेला शब्द  आहे . ) ज्येष्ठ समीक्षक  बाळकृष्ण कवठेकर सरांच्या पोस्टमधील , “उतारवयातील हे एकाकीपण कुठे घेऊन जाणार कळत नाही . पुस्तके आहेत …

‘जीना और मरना भी कोरोना के साथ…’

( रेल्वे खाली चिरडल्या गेलेल्या मजुरांच्या रुळांच्यामधे पडलेल्या पोळ्या…छायाचित्र योगेश लोंढे ) ‘कोरोनाच्या महाभीषण आपत्तीमुळे देशावर लादलेली सलग तिसरी टाळेबंदी येत्या १७ मे रोजी उठवली जाईल याबद्दल ठाम साशंकता आहे . टाळेबंदीचा हा ‘खेळ’ १५ जूनपर्यंत सुरु राहू शकतो , असे संकेत स्पष्टपणे मिळू लागलेले आहेत . देशातल्या सुमारे १३० …

पत्रकाराचीही , चूक ती चूकच !

सध्या एका पत्रकारानं केली न केलेली चूक आणि एका पत्रकारितेच्या नावाखाली भाटगिरी करणारावर  झालेला हल्ला चर्चेत आहेत . त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार  कामिल पारखे यांनी ‘अक्षरनामा’ या पोर्टलवर ‘पत्रकारितेतील ‘त्या’ अनुचित आणि सहज टाळता येण्यासारख्या घटनेचा सल आजही माझ्या मनात आहे !’ या लेखात त्यांच्या एका चुकीची कबुली दिली आहे …

पत्रकारितेवर घोंगावणारं खरं संकट

सध्या पत्रकार राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझा ही प्रकाश वृत्त वाहिनी माध्यमात चर्चेत आहे . समकालीन मराठी माध्यमात जे पत्रकार चांगल्या बातम्या देतात , त्यात राहुल आघाडीवर आहे . त्याच्या कांही बातम्या त्याच्यातल्या संवेदनशील माणूस , उत्सूक  व जागरुक पत्रकारितेचा परिचय करुन देणाऱ्या असतात तर कांही कोणतीही शहानिशा करता दिलेल्या …

रात्र महाभयंकर वैऱ्याची आहे , आपण गंभीर कधी होणार ?

( वरील छायाचित्र – ‘सोशल  डिस्टनसिंग’चा असा हा अजब फंडा . चौकटीत पिशव्या ठेऊन लोक सावलीत एकत्र येत गप्पा मारत बसले आहेत ! || १ || ६ ते २५ मार्च समाज माध्यमांवर फारच क्वचित होतो , वृत्तपत्र तर बंद झालीयेत हे लक्षातही आलं नाही . कोरोनानं घातलेला धुमाकूळ आणि सरकार …

‘लोकशिक्षक’ मा. गो. वैद्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते , संघाच्या हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार अशी ओळख असलेल्या मा. गो.  वैद्य यांच्या व्यक्तीमत्वाचे  एक साक्षेपी , निष्पक्ष , व्यावसायिक आणि कुशल संपादक , भाषा तज्ज्ञ , संस्कृतचे शिक्षक व अभ्यासक हेही  असलेले पैलू अनेकांसाठी अज्ञात आहेत . मा. गो. वैद्य यांच्या  या वेगळ्या पैलूंवर  प्रकाश …

भाजपला उशीरा झालेली उपरती

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कांही नेत्यांनी केलेली वक्तव्ये भोवली , ही केंद्रीय गृह मंत्री आणि या निवडणुकीचे भाजपचे सूत्रधार अमित शहा यांनी दिलेली कबुली म्हणजे उशीरा झालेली उपरती आहे . अमित शहा हे कांही भाजपचे साधे नेते नाहीत तर , नरेंद्र मोदी यांचे उजवे हात आहेत , निवडणुका जिंकून देणारे …

दिल्लीत विकास जिंकला , धर्मांधता हरली !

आम आदमी पार्टीला पूर्ण बहुमत मिळेल पण , जागा कमी होतील , भारतीय जनता पक्षाच्या जागा थोड्या वाढतील आणि कॉंग्रेसची पाटी कोरी राहील , असं जे अपेक्षित होतं ते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसलेलं आहे . विकासाच्या दिल्ली मॉडेल विरुद्ध काश्मीरचा विशिष्ट दर्जा काढणं , राम मंदिर उभारणी , नागरिकत्व …

​​​सरकार पुरस्कृत झुंडशाही !

= नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नवी दिल्लीत मोर्चा काढणाऱ्या जमाते मिलीया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर त्या विद्यापीठातला नसलेल्या एका युवकानं पोलिसांच्या उपस्थितीत ‘ये लो आझादी’ असं  म्हणत गोळीबार केला . गोळीबार संपल्यावर आणि एकजण गंभीर जखमी झाल्यावर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं  . महत्वाची बाब म्हणजे हे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी …

उद्धवा , हाती चाबूक घ्या !

कामात चुकारपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार खात्याच्या आयुक्तपदाचा तात्पुरता कारभार असलेल्या एका सनदी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आणि देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण केलेलं समांतर मुख्यमंत्री कार्यालय मोडीत काढण्याचा  नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्णय स्वागतार्ह आहेत . वृत्तीनं सौम्य समजल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यातल्या खमकेपणाचा दिलेला हा परिचय आणि इशाराही राज्याच्या …