विधिमंडळाचं अधिवेशन ‘…नुसतंच कंदील लावणं’ होऊ नये !

हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ समाविष्ट होताना झालेल्या नागपूर कराराप्रमाणं विधिमंडळाचं नागपूरला होत असलेलं हिवाळी अधिवेशन सूप वाजण्याच्या मार्गावर असेल . हेच नाही तर  विधिमंडळाचं प्रत्येकच अधिवेशन हा आता एक सोपस्कार उरला आहे . या अधिवेशनातून भरीव असं हाती कांहीच लागत नाही . दोन-चार शासकीय विधेयकं मंजूर …

निवडणूक निकालाची आंकडेवारी आणि वस्तुस्थिती !

राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मत प्रदर्शन म्हणा की ,  राजकीय विश्लेषणाचा महापूर आलेला आहे . निकालाच्या दिवशी दुपारी चार वाजता त्या महापुरात एक ओंजळभर  पाणी टाकण्याची तत्परता आस्मादिकांनी दाखवलेली आहे . मात्र, आता सर्व आकडेवारी हाती आल्यावर या निकालाचे …

भाजपला मोठं तर काँग्रेसला थोडसं यश !

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जर राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणुका सेमी फायनल ( उपांत्य फेरी ) समजायची असेल तर भारतीय जनता पक्षानं सेमी फायनलमध्ये दणदणीत विजय संपादन केलेला आहे आणि अंतिम फेरी जिंकण्याचेही स्पष्ट  संकेत दिलेले आहे , हे मोकळेपणानं मान्य करायला हवं . पराभवाचं …

दिवाळी अंकांची लोकप्रियता हा एक भास !

जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्थेनंतर जगाचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे .एक नवी मानवी संस्कृती आणि वर्ण व्यवस्था जन्माला आलेली आहे .जुनी बलुतेदारी जाऊन नवी बलुतेदारी अली आहे .हे सर्व बदल साहित्यिक स्वीकारत नाहीत आणि अशा साहित्यिकांनी केलेल्या जुनाट मानसिकतेच्या लेखनाला स्वीकारायला नवी पिढी तयार नाही . ■ खुली अर्थव्यवस्था आणि …

राजकारणातला सुसंस्कृतपणा गेला कुठे ?

महाराष्ट्रातील बहुसंख्य राजकारण्यांची बेताल , असंस्कृत ‘मुक्ताफळं ‘ ऐकताना  उबग आल्यानं जे कांही आठवलं ते म्हणजे हा मजकूर आहे –  चळवळीची पार्श्वभूमी घेऊन पत्रकारितेत माझा प्रवेश झाला तो            १९७७ साली म्हणजे , त्याला आता साडेचार दशकं  पूर्ण झाली . १९१८० पासून विधीमंडळ वृत्तसंकलनाला सुरुवात झाली आणि १९८२-८३ साली ज्येष्ठ  संपादक …

बबनराव ढाकणे नावाचं वादळ

‘ऐसे’ राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत…   पत्रकारांच्या माझ्या पिढीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावरच्या आणि विधिमंडळातल्या राजकारणात अनेक ‘बलदंड’ नेते पाहिले . १९७५ ते ९० चा तो कालखंड होता . तेव्हाचे बहुसंख्य नेते उच्चविद्याविभूषित नव्हते पण , सुसंस्कृत आणि जनतेच्या समस्यांविषयी तळमळ असणारे होते . भलेही बहुसंख्य नेते शैक्षणिक आघाडीवर फारशी चमक …

शेतकरी चळवळीतला एकांडा शिलेदार – विजय जावंधिया

ज्येष्ठ सहकारी असलेल्या प्रा. डॉ . आशा देशपांडे यांचा फोन आला की , शेतकरी नेते विजय जावंधिया महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत . विजयची गळाभेट झाली . खूप वर्षांनी भेटलो . दोघांचाही गहिंवर दाटून आला . बऱ्यापैकी गप्पा झाल्या . गिले-शिकवे झाले .  मन भूतकाळात गेलं . माझी आणि …

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर  महाराष्ट्र…

राजकारणी आणि पत्रकारही सत्य सांगायला का कचरत आहेत, असा प्रश्न सध्याच्या स्फोटक वातावरणात किमान मला तरी पडलेला आहे. मराठा, धनगर, बहुजन समाजाच्या समर्थनीय आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागात धरणे, बेमुदत उपोषण आंदोलनं  पेटलेली आहेत, नाशिक भागात कांदा  उत्पादक  शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे. परिस्थिती स्फोटक अस्वस्थतेच्या तोंडावर महाराष्ट्र बसल्यासारखी आहे. आरक्षणाच्या मागण्या अत्यंत …

माझीही रशियन ‘जी-२०’ !

कांहीसं आत्मपर आहे पण , माझ्या साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील मैलाचा टप्पा असणारा हा अनुभव आहे . राज्याच्या किंवा/आणि देशाच्या राजधानीत पत्रकारिता करण्याची संधी मिळावी , संसद गेला बाजार विधिमंडळाचं अधिवेशन कव्हर करता यावं , पंतप्रधानांसोबत एखादा दौरा करता यावा आणि पंतप्रधानांच्या विमानातून या डेटलाईननं एकदा तरी बातमी देता यावी… अशा …

बलशाली ‘जुगारी’ भारत…

जुगाराची जाहिरात करतो म्हणून विक्रमादित्य क्रिकेटपटू , ‘भारत रत्न’ सचिन तेंडुलकर विरुद्ध आमदार बच्चू कडू खटला दाखल करणार असल्याची बातमी वाचली आणि एक घटना आठवली- बेगम मंगलाच्या आजारपणाच्या काळात ती आमच्याकडे आली . रात्र ते सकाळ अशी तिची कामाची वेळ होती . आमच्यासोबत सकाळचा चहा तिचाही होई . मग ती दुसऱ्या …