|| ‘नागपूर पत्रिका’तील दिवस ||

■साडेचार दशकांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन करणारे माझे ‘लेखणीच्या अग्रावर’ हे पुस्तक  लवकरच  प्रकाशित होत आहे . या निमित्ताने ‘उद्याचा मराठवाडा’ प्रकाशनाच्या क्षेत्रात पदार्पण करत  आहे . ‘लेखणीच्या अग्रावर’ मधील हे एक प्रकरण –  ■मुखपृष्ठ- विवेक रानडे  ‘सागर’ सोडायचा निर्णय घेतला तेव्हा कोल्हापूरला ‘सकाळ’ आणि नागपूरला ‘नागपूर पत्रिका’ असे दोन पर्याय होते. ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचा …

■ सीमाताई साखरे – सासूनं नव्वदी ओलांडली !

( तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार स्वीकारताना डॉ . सीमाताई साखरे ) स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारच्या विरोधातला बुलंद आवाज असलेल्या डॉ . सीमाताई साखरे यांनी काल  ( १५ ऑगस्टला  ) वयाची नव्वदी पूर्ण केली . वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला तर नाव सांगताच सीमाताई एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या …

अरुवार कवी आणि माणूसही…

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे , फाटकी ही झोपडी काळीज माझे  –ना . धों . महानोर रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर समाज आणि मुद्रीत  माध्यमात वैपुल्यानं लेखन झालेलं आहे . या बहुतेक लेखनाचा भर महानोरांच्या कवितेवर आहे . आमच्या मुग्धा कर्णिकनं महानोरांच्या शब्दकळेचा उल्लेख ‘अरुवार’ या चपखल आणि लोभस  शब्दात केला …

लोकसभेची खडाखडी – मोदी म्हणजे भाजपच !

तिकडे पूर्व भारतात मणिपूर  पेटलेलं असतांना , नग्न करुन महिलांची धिंड काढली जात असतांना पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका आणि फ्रान्सचा दौरा  आणि या दौऱ्यात त्या  देशांचे सन्मान स्वीकारणं , राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीचा नारळ फोडणं आणि भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत म्हणजे ‘एनडीए’च्या बळकटीकरणावर भर दिला जाणं , हे राजकारण देशातील कोणाही …

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – ‘इंडिया’

प्रत्यक्ष कुस्तीला सुरुवात होण्याआधी पैलवान जसे शड्डू आणि मांड्या ठोकून खडाखडी करतात , तसंच काहीसं चित्र आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सध्या निर्माण झालेलं आहे . भाजपच्या विरोधात ‘इंडिया’ ही  २६ पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे तर एनडीए या भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत ३८ पक्ष सहभागी झाले आहेत . अजून साडेआठ-नऊ महिन्यांनी प्रत्यक्ष …

शरद पवार विरुद्ध शरद पवार…

हातातलं वृत्तपत्र खाली ठेवून चावी देता देता सुरक्षारक्षकानं विचारलं , ‘काय वाटतं साहेब तुम्हाला , दादांच्या बंडाबद्दल?’ इथे दादा म्हणजे अजित पवार . या सुरक्षारक्षकाचं आडनावही पवार आहे . हा एक योगायोग . ‘मला काय वाटायचं तुम्हालाच काय वाटतं ते सांगा .’ मी उत्तरलो . त्यावर तो म्हणाला , ‘मोठ्या …

■■खणखणीत कौतिकराव ठाले-पाटील !

■मराठी साहित्य संस्थांच्या व्यवहारातील दिग्गज , रोखठोक कौतिकराव ठाले-पाटील गौरव ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे . चोखंदळ समीक्षक , कोल्हापूरचे प्रा. डॉ . रणधीर शिंदे संपादित त्या ग्रंथासाठी  लिहिलेला हा लेख-  नमनालाच घडाभर तेल जाळायचं म्हटलं तर कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी माझी ओळख १९९९ पर्यंत नव्हती . पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद …

असमंजस आणि पिसाटलेली माध्यमे…

|| नोंद | १३ || शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चिंताजनक घटना अशात राज्यात सातत्याने घडत आहेत ; त्या कोण घडवून आणत आहे , त्यामागचे हेतू काय  आहेत हे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट होईल आणि राजकीयदृष्ट्या सोयीचं  असेल तरच जाहीर होईल पण , तरी ते सर्वविदित आहे . एकेकाळी राज्यात पुतळा …

‘भ’कार आणि शिवराळ संजय राऊत !

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेली थुंकण्याची कृती हा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या किळसवाण्या संस्कृतीचा कळस आहे . ज्या राजकारण्यांना आता सक्तीनं घरी बसवण्याची वेळ आली आहे त्या यादीत संजय राऊत यांचं नाव अग्रभागी आहे . कारण अश्लाघ्य असंस्कृतपणे जाहीर वर्तन करण्याची संजय राऊत यांची ही काही पहिली वेळ …

सुनीती देव : जशी होती तशी…

|| नोंद | १२ || तत्त्वज्ञानाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक , नागपूरच्या डॉ . सुनीती देव यांचं निधन  झाल्याचे पत्रकार पीयूष पाटील आणि पाठोपाठ श्रीपाद अपराजित यांचे फोन आले तेव्हा संध्याकाळ दाटून आलेली होती . बेगम मंगला गेल्यापासून ‘एकटा राहण्याची सवय  झालीये’ असं , चारचौघात कितीही म्हटलं तरी आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे म्हणूनही …