गडकरींची कबुली आणि स्वतंत्र विदर्भाचे ‘हसींन सपने’!

“स्वतंत्र होण्यासाठी विदर्भ आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही”, असा कबुलीजबाब देऊन भाजपचे वजनदार नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकाच वेळी अनेक बाबी मान्य करण्याचं धाडस अखेर दाखवलं आहे यात शंकाच नाही. गेली अनेक वर्ष स्वतंत्र विदर्भाला विरोध करतांना विदर्भातील संयुक्त महाराष्ट्रवाद्यांनी नेमका हाही मुद्दा मांडलेला आहे. संयुक्त महाराष्ट्रवादी, उच्च विद्याविभूषित, माजी …

भार ‘ब्रांद’चा

घटना आहे नोव्हेंबर २००९च्या पहिल्या आठवड्यातली. नवीन कपाटात नीट लावण्यासाठी पुस्तकं आवरत असताना प्रख्यात नाटककार हेनरिक इब्सेन यांच्या ‘ब्रांद’ या नाटकाचा सदानंद रेगे यांनी केलेला अनुवाद सापडला. पुठ्ठ्याच्या बाईंडिंगची ती प्रत होती; म्हणजे खास ग्रंथालायासाठीच ती तयार केलेली होती. (काही लोकं, ज्याचा ‘आरएसटीएमयु’ असा अडाण्या-कुडाण्यासारखा उल्लेख करून सातत्यानं उपमर्द करत …

तावडे, पापक्षालन करा !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नोकरभरतीत राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचे विद्यमान संचालक डॉ. धनराज माने यांनी काही गैरव्यवहार केलेला आहे किंवा नाही याबद्दल कोणताही न्यायनिवाडा मी करणार नाही; कारण या संदर्भात केवळ काही संपादकीय मतं आणि बातम्या वाचनात आलेल्या आहेत. संपादकीय व्यवस्थेचं अवमूल्यन अग्रलेख मागे घेण्याइतकं उत्तुंग नीचांकी …

एकारलं कर्कश्शपण आणि (अ)सहिष्णुतेचं राजकीयीकरण !

( अभय निकाळजे या पत्रकार मित्राने तो कार्यकारी संपादक असलेल्या आदर्श गावकरी या दैनिकाच्या  दिवाळी अंकासाठी समकालीन स्थितीवर माझी एक मुलाखत घेण्याची जबाबदारी त्याचा सहकारी तरुण पत्रकार सुभाष वेताळ याच्यावर सोपवली. त्यासाठी एक प्रदीर्घ प्रश्नावली पाठवली .  नंतर अचानक अभय निकाळजे आणि सुभाष वेताळ यांनी नोकरी सोडली ( की त्यांना नोकरी  …

फडणवीस, नोकरशाहीचे नाही जनतेचे मुख्यमंत्री व्हा !

मिडिया आणि जनतेचा पाठिंबा मिळवण्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस आजवरचे सर्वात फेवरेट मुख्यमंत्री असावेत. कां असू नयेत? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यावर गेल्या तीन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला ज्या पध्दतीने सिध्द केलंय ते अपवादात्मक आहे. स्वच्छ प्रतिमा, विकासाची तळमळ आणि पक्षश्रेष्ठींचा भरभक्कम पाठिंबा असणारे अलिकडच्या किमान चार दशकातले ते पहिले …

दिलीप वळसेंची एकसष्ठी !

(गेल्या सुमारे चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात वावरणारे, ​प्रशासनात ​आपल्या कामाचा ठसा उमटवणारे माजी मंत्री, शरद पवार यांचे कट्टर समर्थक दिलीप वळसे पाटील एकसष्ठी गौरव समारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला . त्यानिमित्त प्रकाशित होणाऱ्या गौरव ग्रंथासाठी दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास अनुभवलेल्या पत्रकाराने मांडलेला हा ताळेबंद -) घटना माधव …

निसरड्या वाटानंतर डिजिटल वळण

देशाच्या आणि राज्याच्या राजधानीत काम करणं हे प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न असतं. राजकीय वृत्त संकलन करणाऱ्या कुणाही पत्रकारासाठी तर या दोन्ही ठिकाणी काम करण्याची संधी मिळणं अनमोल असतं. ती संधी मला मिळाली. मात्र, यात दिल्लीचं वळण अनपेक्षित होतं; त्याची थोडी पार्श्वभूमी सांगायलाच हवी – तब्बल २९ वर्ष एक्सप्रेस वृतपत्र समुहाच्या लोकसत्ता …

नांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ

नांदेड महापलिकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला धूळ चारली आणि कॉंग्रेसला संजीवनी दिली; एवढ्यापुरता हा मुद्दा नाही तर त्यापलिकडे या निवडणुकीच्या निकालाचं महत्व आहे. भाजपची जबरदस्त हवा असल्याची जी काही चर्चा मिडियात होती ती वाचनात असतानाच निवडणूक सुरु झाल्यावर नांदेडात दोन दिवस होतो; त्याचवेळी मिडियाच्या त्या चर्चेत तथ्य …

‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष !

पक्क आठवतं, १९७३चा तो जानेवारी महिना होता. नेहेरु युवक केंद्राच्या आम्ही काहींनी औरंगाबाद ते पुणे आणि परत अशी सफर सायकलवरून केली. पुण्यात फिरत असतांना किर्लोस्कर प्रेसची पाटी दिसली आणि मी आत शिरलो. चौकशी करुन ह. मो. मराठे यांना गाठलं आणि त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर…’ या कादंबरीवर भडाभडा बोलायला सुरुवात केली. शिडशिडीत …

असा ‘साधू’ आता होणे नाही !

‘अरुण साधू आता आपल्यात नाहीत’ या सुदेश हिंगलासपूरकरनं पाठवलेल्या एसएमएसनं २५ सप्टेंबरची सकाळ उगवली. दिवसभरावर त्याच बातमीचं गडद मळभ दाटून राहिलं. नांदेडमधील कार्यक्रम त्याच मळभात कसेबसे आटोपून औरंगाबादच्या दिशेने प्रवास करतांना अरुण साधू आठवू लागले. मी काही अरुण साधू यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या सोबतही काम केलेलं नाही; त्यांच्या आणि माझ्या …