राज ठाकरेंच्या छायेत…

दुसर्‍या टप्प्याचं मतदान पार पडलेलं असताना किमान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणुकीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरु केलेल्या घणाघाती प्रचाराची गडद छाया दाटून आलेली आहे आणि ‘राज का ‘राज’ आखीर है क्या’ या प्रश्नाच्या  उत्तराचा शोध प्रत्येकजन त्याच्या कुवती प्रमाणं घेत आहे . दोन अधिक दोन म्हणजे चार …

देशद्रोहच नाही तर आणखी कायद्यात सुधारणा हवी

* भारतीय दंड संहितेतील १२४-अ –  देशद्रोह  * भारतीय दंड संहितेचं कलम ३५३ – शासकीय कामात अडथळा * द पोलीस इनसाइनमेंट टू डिसअफेक्शन अक्ट १९२२ * कार्यालयीन गोपनीयता कायदा १९२३ रद्द तरी करा किंवा लोकाभिमुख करा ही कलमे आणि कायदे भारतीय दंड संहितेतील १२४-अ म्हणजे देशद्रोहाचं कलम काढून टाकण्याचं जे …

महाराष्ट्रात तरी काँग्रेस निर्नायक…

या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र काँग्रेस पक्षाची गेल्या निवडणुकीपेक्षा मोठी सरशी होण्याची चिन्हे दिसत असतांना महाराष्ट्रात मात्र हा पक्ष चांगली कामगिरी करेल किंवा नाही अशी शंका निर्माण होण्याजोगी स्थिती आहे . विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारविषयी पावलो-पावली नाराजी दिसते आहे आणि त्यातच काँग्रेसच जाहीरनामा असा कांही …

अडवाणी नावाची महाशोकांतिका…

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आठवड्यातले सर्वाधिक चर्चेतले चेहरे आहेत राष्ट्रीय पातळीवर लालकृष्ण अडवाणी आणि राज्याच्या पातळीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे . नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यापासून लालकृष्ण अडवाणी यांचा हळूहळू नियोजनबद्ध अस्त केला जातोय अशी भूमिका घेत मी सलग लिहितो आहे ; अर्थातच अडवाणी भक्तांना ते मान्य नाही . नरेंद्र मोदी …

पवार नावाचा करिष्मा आणि महिमा !

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि पाहिल्याच आठवड्यात माढा मतदार संघातील निवडणूक लढवणे-न-लढवणे , विखे पाटील यांची केलेली कोंडी , त्याचा भाजपला होणारा संभाव्य लाभ आणि त्यामुळे काँग्रेसला बसलेल्या धक्क्यामुळे देशातील एक ज्येष्ठतम नेते , (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले ; लगेच    माध्यमांत अनेक शक्यतांचे पीक आले . शिवाय पवारांची घराणेशाही , फलटणच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाचा संदर्भ देऊन शरद पवारांची संपलेली …

युतीनंतरही सेनेसमोर अडथळेच जास्त !

निश्चलनीकरण आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दुष्परिणामापोटी लोकसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकात दणका बसला तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार हे राजकारण किमान जाणणार्‍याने ओळखलेले होते . राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकात भाजपला बेदम मार पडल्यावर तर युती होणार यावर शिक्कामोर्तब झालेले होते . शिवाय , निवडणुकांचा हंगाम आला की युती आणि आघाड्यांचं पीक तरारुन येणे हे आता आपल्या देशातील राजकारणाचा भागच …

युद्धस्य परिणाम नसती कधीच रम्या…

केवळ तोंड पाटिलकी करत ‘युद्धस्य तु कथा रम्या’ असं म्हणणं आणि युद्धाचे परिणाम भोगणं यात फार मोठा फरक असतो आणि तो महाभीषण असतो , त्यात माणुसकीचा लोप  आणि सत्याचा कडेलोट असतो . ( महायुद्धाचे उमटलेले व्रण मध्य युरोपात आजही भळभळतांना दिसतात आणि ते बघताना अंगावर शहारा येतो . )  अर्थात सध्याच्या वातावरणात ज्यांना युद्धाचा उन्माद …

आला सुंदोपसुंदीचा हंगाम !

लोकसभा निवडणुकीची चाहूल देशाला कधीचीच लागलेली आहे . आता या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन संपल्यानं निवडणुका जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे . बहुदा मार्चच्या पहिल्या , जास्तीत जास्त दुसर्‍या आठवड्यात निवडणुका जाहीर होतील , अशी हवा दिल्लीत आहे . १९७७ ची जनता पक्षाची हवा निर्माण झालेली निवडणूक पत्रकारितेच्या बाहेरुन ( खरं तर जनता पक्षाचा …

माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे …

छायाचित्रात प्रकाशित पुस्तकांच्या स्वाक्षरांकित प्रती मंगलाच्या स्वाधीन करतांना डावीकडून मा. नानासाहेब चपळगावकर , मा. महेश एलकुंचवार आणि मा. डॉ. सुधीर रसाळ . छायाचित्रात सायलीही दिसत आहे . ( पुनर्लेखन केलेल्या माझ्या ‘डायरी’ , ‘क्लोज-अप’ आणि संपादित ‘माध्यमातील ती’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ ज्येष्ठतम समीक्षक डॉ. सुधीर रसाळ तसंच प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार , सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर …

दुगाण्यांचं राजकारण ! 

सत्तेत असतांना आणि नसतांना , कसं आणि किती , बेताल आणि बेजबाबदार वागायचं याचे कांही विधीनिषेधशून्य अलिखित मापदंड आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी अलीकडच्या कांही वर्षात आखून घेतलेले आहेत . त्यामुळे लोकशाहीचं गांभीर्य व पावित्र्य मलिन होत आहे याची जाणीव हे सर्व राजकीय पक्ष विसरले आहेत . जाहीर झालेल्या केंद्रीय …