‘मि. तुकाराम मुंढे, अॅरोगन्स ऑफ ऑनेस्टी इज डेंजरस…’

नासिक महापालिकेचे आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याबद्दल सरकारला दोष देणारे लोक आणि त्या सुरात सूर मिसळवणारी माध्यमे अज्ञानी आहेत ; त्यांना सरकार आणि नोकरशाही यातील फरक , त्यांच्या जबाबदार्‍या याचं कोणतंही आकलन नाही , असंच म्हणावं लागेल . इथे सरकार म्हणजे निवडून आलेले म्हणजे लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही म्हणजे …

अचानक शस्त्र म्यान केलेल्या सुषमा स्वराज

-घटना १९९९मधली आहे . देशाच्या राजकारणात तेव्हा नुकत्याच सक्रिय झालेल्या श्रीमती सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक उत्तरप्रदेशातील अमेठी सोबतच कर्नाटकातील बेल्लारी येथूनही लढवण्याचा निर्णय घेतला . यात बेल्लारी हा काँग्रेसनं भाजपला दिलेला चकवा होता . एका रात्रीत हालचाली झाल्या आणि बेल्लारी लोकसभा मतदार संघातून श्रीमती सोनिया गांधी यांच्या विरोधात लढण्याचा …

कैवल्यदानी !

(अनंतराव भालेराव यांचे रेखाचित्र ल.म.कडू यांच्या सौजन्याने.) ——————————————————— [ मराठी पत्रकारितेवर आजही प्रभाव असणार्‍या ‘मराठवाडा’ या दैनिकाचे संपादक अनंतराव भालेराव यांचं जन्मशताब्दी वर्ष १४ नोव्हेंबरला सुरु झालं . अनंतराव भालेराव हे महाराष्ट्रात सर्वदूर घट्ट पाळंमुळं पसरलेले केवळ मूल्यनिष्ठ , अबोल धाडसी , बहुपेडी संपादक-लेखक नव्हते तर तो एक सर्वव्यापी संस्कार …

विनोबांच्या प्रायोपवेशनाची हकीकत…

( आचार्य विनोबा भावे यांच्या प्रायोपवेशनाचं वृत्तसंकलन करत असतांनाची ही जशी नोंद आहे तसं प्रदीर्घ आणि अविश्रांत परिश्रम घेऊनही एखादी बातमी चुकते कशी याचीही ही हकीकत आहे . देशमुख आणि कंपनीच्या वतीने लवकरच प्रकाशित होणार्‍या ‘डायरी’ या पुस्तकावरुन साभार ) आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी, जयंतीदिनाच्या कार्यक्रमांचा उल्लेख आजच्या कार्यक्रमात …

ते भरजरी ‘वर्कोहोलिक’ दिवस…

( नाना पाटेकर आणि कुमार केतकर यांच्यासोबत टीम लोकसत्ता नागपूर ) [ ‘माधवबाग आयुर्वेद या वैद्यक शृंखलेच्या ‘आरोग्य संस्कार’ या यंदाच्या दिवाळी अंकासाठी ‘टीम वर्क’ ही संकल्पना होती आणि वृत्तपत्र हा विषय मला देण्यात आलेला होता . त्या अंकात नागपुरातून प्रकाशित होणार्‍या ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीविषयी लिहिलेला हा लेख-] एक काळ …

स्मरणातले विलासराव

( कांहीच कारण नसताना कांही मान्यवरांवर लिहायचं राहून गेलेलं आहे . त्यात एक महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते , माजी मुख्यमंत्री , मित्रवर्य विलासराव देशमुख . एकेकाळचे त्यांचे कार्यालयीन सहकारी रविकिरण जोशी यांनी रेटा लावला आणि राज्य विधिमंडळाच्या वि. स. पागे संसदीय केंद्रातर्फे प्रकाशित होणार्‍या ग्रंथासाठी अखेर ‘स्मरणातले विलासराव’ शब्द्ब्द्ध झाले . …

उठवळ राजकारणाचा धुरळा !

आपल्या देशातल्या राजकीय पक्षांनी सत्तेत असतांना आणि नसतांना कसं बेजबाबदारपणे वागायचं हे ठरवून टाकलेलं आहे हे, सध्या राजकीय क्षितीजावर उठलेल्या धुरळ्यावरुन पुन्हा एकदा जाणवत आहे. १९८०च्या दशकात आधी सत्तेत असतांना विश्वनाथप्रताप सिंह यांनी पुरवलेल्या दारुगोळ्याच्या आधारे विरोधी पक्षांनी बोफोर्स तोफांच्या खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा असाच धुरळा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी …

तरुण तेजपाल ते मुबश्शर अकबर !

नामवंत पत्रकार एम जे अकबर यांनी अखेर केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; खरं तर तो त्यांनी आधीच दिला/घेतला असता तर पार्टी वुइथ डिफरन्स म्हणवून घेणार्‍या भाजपच्या दुटप्पी नैतिकतेशी ते सुसंगत ठरले असते पण, ना तो त्यांनी त्यांनी लगेच दिला ना त्यांच्या पक्षानं तो घेतला. राजकीय पक्ष आणि राजकारणी किती निर्ढावलेले आहेत …

‘मी टू’… एका संपादकाचा कबुलीजबाब!

‘मी टू’च्या निमित्तानं अनेक गौप्यस्फोट सध्या होताहेत त्यात सत्यता किती हे कळायला मार्ग नसला तरी अनेकांचे बुरखे टर्राटरा फाटले जाताहेत. ‘इतक्या वर्षानी का’, ‘किती जुनं झालं’, इथपासून ते भाषक आणि प्रादेशिक वादही त्यात आणला जात आहे; ते सर्व निरर्थक आहे; वनवासातून परतल्यावर सीतेलाही पावित्र्याची परीक्षा द्यायला लावणारी मानसिकता आता बदलायला …

प्रत्येकाला आकळणारा वेगळा गांधी !

(महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळ्या रुपात भेटतो आणि आकळतो. सात आंधळे आणि हत्ती या कथेची अनुभूती म्हणजे महात्मा गांधी आहे. जर्मनीतल्या छळ छावण्या बघतांना मला गांधी कसे नव्यानं आकळले त्याचा अनुभव आहे -) ‘सॅल्झबर्ग सेमिनार २००७’ चा विषय ‘द न्यू इन्फर्मेशन नेटवर्क : चॅलेन्जेस अ‍ॅण्ड अपॉर्च्युनिटी फॉर बिझिनेस, गव्हर्मेंट अ‍ॅण्ड मीडिया’ …