सर्वोच्च, स्वागतार्हही !

देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या विरोधात कथित बंड पुकारुन मोठं वादळ उभं केल्याचा आव आणला आणि त्यात राजकीय तेल ओतलं जाण्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. त्याच सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठांनं गेल्या आठवड्यात काही महत्वपूर्ण निवाडे दिलेले आहेत; एवढंच नाही तर तत्पूर्वी त्या कथित बंडात सहभागी झालेल्या एकाची आपला उत्तराधिकारी …

बदले, बदले राहुल गांधी नजर आते है !

२०१४च्या निवडणुकीचे पडघम २०१३त वाजायला सुरुवात झाल्यापासून ते भाजपचं सरकार सत्तारुढ होईपर्यंत मी दिल्लीत होतो. याचकाळात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झाली, राजकीय क्षितिजावर अस्ताला जातांना लालकृष्ण अडवाणी यांची झालेली फडफड, काँग्रेसचा दारुण पराभव बघता आलेला होता. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या काही सभांचं वृत्तसंकलन करण्याची …

रयतेनं मंत्रालयावर धाव घेतली तर ?

एका मंत्र्याच्या स्वीय सहायकानं १० लाख रुपयांची लांच घेऊनही उस्मानाबादच्या एका संस्थेचं काम केलं नाही परिणामी, लांच घेणार्‍या त्या ‘थोर’ सचिवाला मंत्रालयातच मार खावा लागला लागल्याची घटना गेल्या आठवड्यात एक प्रकाश वृत्त वाहिनीनं लावून धरली आणि अचानक मागेही घेतली. (आजकाल माध्यमांनी लावून धरलेले एखादे प्रकरण अचानक थांबवले जाण्याच्या घटना अनेकदा …

एकाकी अडवाणी आणि…

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते, शोकाकूल लालकृष्ण अडवाणी यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं हे छायाचित्र इंटरनेटवर बघितलं आणि जरा गलबलूनच आलं. एकेकाळी पक्षाचे सर्वेसर्वा ते भावी पंतप्रधान ते अडगळीत गेलेले आणि आता पूर्णपणे एकाकी पडलेले लालकृष्ण अडवाणी, हा प्रवास त्या अश्रूंतून डोळ्यासमोर झळकला. …

‘गुरु’ ते ‘गुरुदास’ : एका अस्वस्थतेचा प्रवास…

मित्र वर्तुळात ‘गुरु’, संघटनेत ‘बॉस’ आणि कार्यकर्त्यात ‘साहेब’ नावानं परिचित असणाऱ्या गुरुदास कामत यांच्या निधनाची बातमी अनपेक्षित आणि धक्कादायक ठरली कारण हे काही त्यांचं एक्झिट घेण्याचं वय नव्हतं. न पटणाऱ्या बाबतीत कुणाशीही थेट भिडणारं आणि आडपडदा नसलेलं, कायमच अस्वस्थतेच्या शिडावर स्वार झालेला स्वभाव असणारे गुरुदास कामत यांची राजकीय कारकीर्द शेवटपर्यंत …

राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी !

अशात अनेक नागपूरकरांचं समाज माध्यमांवरचं स्टेट्स कोलकात्याला जात असल्याचं दिसलं म्हणून उत्सुकता चाळवली. चौकशी केली तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेची आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी ही मंडळी या वाऱ्या करत असल्याचं कळलं. येत्या लोकसभा निवडणुका हांकेच्या अंतरावर असल्याची चाहूल लागलेली असतांना देशात मोदी आणि भाजपच्या विरोधात भक्कम …

अटलजी, एका पत्रकाराच्या नजरेतून

अटलबिहारीबिहारी वाजपेयी यांच्या अनेक मनोज्ञ आठवणी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरला असल्यानं अटलजी अनेकदा नागपूरला येत; शिवाय नागपूरशी त्यांचं एक भावनिक नातं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी उपस्थित राहण्यासाठी सुमतीताई सुकळीकर यांच्यासह त्यांच्या काही जुन्या नागपूरकर सहकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून आग्रहाचं निमंत्रण मिळालेलं होतं. === नागपुरात …

अपयश नोकरशाहीचं, जबाबदारी सरकारची आणि होरपळ रयतेची!

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून चिघळलेल्या परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार सध्या तोफेच्या तोंडी आहे; धनगर, मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा त्याच वाटेनं जाणार हे आता स्पष्ट झाल्यानं देवेंद्र फडणवीस तसंच राज्य सरकार ज्वालामुखीच्या तोंडावर जाऊन बसणार आणि पुढचा काही काळ रयत होरपळतच राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जलयुक्त …

सुसंस्कृतपणा : ‘त्यांचा’ आणि आपला…

मोजके १/२ मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि दर तासाच्या बातम्या वगळता आमच्या घरात टीव्हीवर सतत क्रीडाविषयक कार्यक्रम सुरु असतात. क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस असा कोणताही खेळ आम्हाला चालतो. तसं तर, आम्ही काही फुटबॉलचे कट्टर चाहते नाही. पण, नुकत्याच संपलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रशिया, फ्रान्स आणि क्रोएशिया या तीन देशांचे प्रमुख ज्या उमदेपणानं …

अविश्वास ठरावाची नौटंकी !

(भाषण संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभेतच गळाभेट घेतांना राहुल गांधी (छाया लोकसभा टीव्हीच्या सौजन्याने) ————————————————————— नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा जो खेळ तेलगू देशम पार्टीने केला आणि त्याला भाजपेतर पक्षांनी पाठिंबा दिला, त्याचं वर्णन राजकीय नौटंकी या शब्दात करावं लागेल. लोकसभेत यापूर्वी काही …