ढिम्म साहित्य-संस्कृती मंडळ आणि अशोक चव्हाणांचं अगत्य !

|| १ || महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन करण्यामागे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा असलेला हेतू कितपत साध्य झाला या संदर्भातल्या चर्चा आता शिळ्या झाल्या आहेत . या मंडळाचा कारभार साहित्यानुकूल नाही , अगत्य आणि सुसंस्कृतपणाशी मंडळाला काहीही देणं-घेणं नाही , हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे …

काँग्रेसच्या पिंजर्‍यातील पोपटांची फडफड !

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या एका कमेंटमुळे विरोधकांना जितका आनंद झाला त्यापेक्षा जास्त आसुरी आनंद काँग्रेसमधील कांही पोपटांना झालेला असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसतं आहे . ‘उत्सुक पण पुरेशी तयारी नसलेला विद्यार्थी’ अशा ज्या बातम्या प्रकाशित या संदर्भात प्रकाशित झाल्या आहेत त्या संदर्भ सोडून …

नाथाभाऊंच्या असंतुष्ट भारुडाची सांगता !

हा मजकूर प्रकाशित होईल ; तेव्हा भाजपाचे एक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असेल . या पक्षांतरानं गेले जवळजवळ पावणेतीन वर्ष एकनाथ खडसे यांच्या मनात खदखदणार्‍या असंतोषाच्या भारुडाची सांगता झाली आहे . खरं तर , या सांगतेला तसा उशीरच झाला आहे .  मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यावर …

‘त्या’ पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची धमक दाखवा !

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातले सरकार पाडण्याचा प्रयत्न आयपीएस सेवेतील काही पोलीस अधिका-यांनी केला , असा दावा राज्याचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी एका बड्या वृत्तपत्राच्या वार्ताहराशी बोलतांना केला आणि नंतर ‘मी असं बोललोच नाही’ असं घूमजावही केलं . तोच नाही तर , कोणताही किमान जबाबदार पत्रकार  समोरच नेता काही …

सर्वपक्षीय राजकीय ढोंग !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या संसदेच्या अधिवेशनातला प्रश्नोत्तराचा त्रास गुंडाळण्याच्या सत्ताधारी भाजपच्या इराद्याला काँग्रेससकट अनेक विरोधी पक्षांनी केलेला विरोध आपल्या देशातील संसदीय लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठीचा प्रयत्न आहे , असं जर कुणाला वाटत असेल तर तो शुद्ध भाबडेपणा आहे , हे एकदा सांगून टाकायला हवं . मुळात संसद किंवा विधिमंडळांचं कामकाज सुरळीत चालावं …

धूर्त वृद्धांच्या कचाट्यातली काँग्रेस !

राजस्थानच्या सत्ता संघर्षात सचिन पायलटची तूर्तास झालेली जबर पिछेहाट म्हणजे काँग्रेसमधील धूर्त वृद्धांच्या कळपाचा झालेला विजय समजायला हवा . पक्षातल्या तरुण नेतृत्वाची कायमच कोंडी कारणारा हा सत्ताकांक्षी वृद्धांचा कळपच काँग्रेसच्या आजच्या स्थितीला कारणीभूत आहे . जगनमोहन रेड्डी , हेमंत बिस्व , अशोक तंवर , अजयकुमार , अशोक चौधरी , अजय …

उद्धव अन कळसूत्री बाहुले ? मुळीच नाही !

शिवसेनेची सूत्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडन स्वीकारल्यापासून सप्टेबर २०१९ पर्यंत नुसतीच टीका नाही तर मोठी अवहेलना उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आली . इतकी अवहेलना आणि अनेकदा तर अपमानास्पद भाषा वाटयाला आलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या समकालीन राजकरणातले एकमेव नेते आहेत . त्यात बहुसंख्य माध्यमं , त्यातही विशेषत: मुंबईतील पत्रकार तर जास्तच …

संतपीठाचं ग्रहण खरंच सुटेल ?

महाराष्ट्राचं प्रशासन किती अकार्यक्षम आणि स्वत: केलेल्या घोषणांबद्दल सरकारं किती उदासीन आहेत आहेत , याचं जळजळीत उदाहरण म्हणजे तब्बल ३९ वर्ष रेंगाळलेली संतपीठाची स्थापना आहे ! सरकारी काम अन सहा महिने थांब” ही म्हण तद्दन खोटी असून ही म्हण प्रत्यक्षात “सरकारी काम , कायम थांब” अशी आहे , याची प्रचीती …

उद्धव ठाकरेंचा अनिष्ट पायंडा !

राज्याचे मावळते मुख्य सचिव अजोय मेहता यांची प्रधान सल्लागार या पदावर  नियुक्ती करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिष्ट  पायंडा पाडला आहे ; त्यातून मुख्यमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला नोकरशहावर अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा शिवाय एक पक्षप्रमुख म्हणून जरी आपण मातोश्रीवरुन  उत्तम कारभार हांकत असलो तरी प्रशासक म्हणून काम करतांना …

देवेंद्रच्या वाटेवर उद्धवची पाऊले

संबंधित खात्याच्या  मंत्र्यांना न विचारता मंत्रीमंडळाच्या बैठकीत थेट प्रस्ताव मांडला जाण्याचा आणि त्यातून वाद निर्माण झाला असल्याचा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी केलेला इन्कार लटका आहे ; नोकरशाहीला सरकारपेक्षा वरचढ होण्याची जी वाट देवेन्द्र फडणवीस यांनी प्रशस्त केली त्याच वाटेवर उद्धव ठाकरे यांची पाऊले पडत आहेत असाच त्या घटनेचा अर्थ …