निमित्त – अग्रलेखाच्या अपमृत्यूचं…

अर्धवेळ वार्ताहर ते उप-निवासी मग निवासी संपादक आणि नंतर काही वर्ष नागपूर आवृत्तीचा संपादक असा माझा ‘लोकसता’ या दैनिकातील पत्रकारितेचा प्रवास झाला. त्याकाळात प्रिंट लाईनमध्ये ‘संपादक कुमार केतकर’ सोबत ‘संपादक (नागपूर) प्रवीण बर्दापूरकर’ असा उल्लेख असे; त्याचा मला आजही सार्थ अभिमान आहे. ‘लोकसत्ता’चा संपादक होण्याचं स्वप्न मी पाहिलेलं नव्हतं, ती …

भरकटलेले भुजबळ…

अखेर महाराष्ट्रातील एक दिग्गज राजकीय नेते छगन भुजबळ यांना आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेऊन अटक झाली. त्याआधी त्यांचा पुतण्या, माजी खासदार समीर यांनाही याच आरोपाखाली अटक झालेली होती. मिडियात त्याविषयी बरंच काही प्रकाशित होतंय. छगन भुजबळ यांनी केलेल्या आणि न केलेल्या अनेक प्रकरणाची ‘व्हाऊचर्स’ त्यांच्या नावावर फाडली जातायेत. छगन भुजबळ यांनी …

मोदी जरा नरमले ?

नव्याने उदयाला आलेला विद्यार्थी नेता कन्हैया, चित्रपट अभिनेते अनुपम खेर, राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणं गेल्या पंधरवड्यात गाजली. आपापल्या राजकीय सोयीचा चष्मा लावून कन्हैया आणि अनुपम खेर यांच्या भाषणांवर मुद्रित-इलेक्ट्रॉनिक्स-सोशल मिडीयावर (कांटेकोर शहानिशा न करता नेहेमीच्या घाई-घाईत) केवळ तुफान चर्चाच नाही तर जोरदार कल्ला सुरु आहे; त्या …

आधी राज्य खड्डेमुक्त करा !

‘मेक ईन महाराष्ट्र’सारख्या उपक्रमांना विरोध असण्याचं काहीच कारण नाही. गुंतवणूकदारांना आकर्षित केलंच पाहिजे, त्याशिवाय राज्यात उद्योग येणार तरी कसे? मोठे उद्योग आले की पूरक उद्योग येणार आणि त्यातून रोजगाराची एक मोठी साखळी तयार होणार. ही साखळी ज्या गावात निर्माण होते त्या गावाचा ‘टर्न ओव्हर’ वाढतो. वेगवेगळ्या करांद्वारे राज्याची अर्थव्यवस्था बळकट …

संतपीठाचं त्रांगडं !

“सरकारी काम अन सहा महिने थांब” ही म्हण तद्दन खोटी असून ही म्हण प्रत्यक्षात “सरकारी काम अन ते पूर्ण होणार नाही, कायम थांब” अशी आहे, याची प्रचीती गेली सुमारे छत्तीस वर्ष रेंगाळलेल्या पैठणच्या संतपीठाच्या संदर्भात येते आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी मराठवाडा विकासाचा …

श्रीहरी अणे, महाराष्ट्राला डिवचू नका !

आमचे मित्रवर्य, राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विरुद्ध बरंच काहूर सध्या उठलेलं आहे. त्याचसोबत सरकारच्या विदर्भ तसंच मराठवाड्याला अनुकूल असण्याच्या धोरणांबद्दल कोल्हेकुई सुरु झालेली आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आहेत की विदर्भाचे ?’ अशी नाराजीची भावना प्रकट होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत, अशी टीका उजागर …

आनंद कुळकर्णींच्या टीकास्त्राचा बोध !​

ज्या नोकरशाहीचे सहकार्य मिळत नाही असा राग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळवला त्याच नोकरशाहीतील सहकाऱ्यांकडून दाखव​ल्या​ गेलेल्या असहिष्णुता (ही लेकाची ‘असहिष्णुता’ काही आपली पाठ सोडतच नाहीये!) आणि कद्रू मनोवृत्तीवर टीकास्त्र सोडून आमचे मित्र आणि राज्याचे एक अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी आनंद कुळकर्णी सेवानिवृत्त ​(होऊन लगेच परदेशगमन करते) झाले आहेत. …

जनहितासाठी कामचुकारांना हाकला !

निवृत्त आयपीएस अधिकारी आणि माझे दीर्घकाळचे स्नेही प्रबीरकुमार चक्रवर्ती यांनी नुकतीच एक लोककथा ई-मेलनं पाठवलीये. सुमारे साडेतीन दशकं राज्य प्रशासनात राहिलेले श्री चक्रवर्ती ‘पीकेबी’ नावाने पोलीस दल तसंच मित्र वर्तुळात ओळखले जातात. त्यांनी पाठवलेली कथा बहुतेक सर्वांना माहिती आहे पण, त्यांचा जो शेवट ‘पीकेबीं’नी केलाय तो सनदी अधिकारी म्हणून बजावलेल्या …

हताशांचं अरण्यरुदन…

आपल्याला काही विषय चघळायला मन:पूर्वक आवडतात. मराठी साहित्य संमेलने हवी का, साहित्य संमेलनांना सरकारने आर्थिक मदत का करावी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कशी चूक किंवा अ-लोकशाहीवादी किंवा तो एक पूर्वनियोजित बनाव आहे; अशा काही विषयांचा त्यात समावेश आहे. या चर्चा संपेस्तवर संमेलनाचं सूप वाजतं की लगेच, …

फडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची नेमकं सांगायचं तर हा मजकूर प्रकाशित होईल त्यादिवशी ४४२ दिवस झालेले असतील. यातून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या सुमारे सव्वा वर्षात सिद्ध केले असले तरी कर्तृत्वाचा ठसा कायमस्वरूपी उमटवण्यासाठी त्यांना अजून बरीच मोठी मजल मारावयाची आहे. अन्य कोणा सहकाऱ्याची प्रतिमा कशी असोही, देवेंद्र …