बावन्नकशी बर्धन !

ज्येष्ठ पत्रकाराकडून ऐकलेला एक प्रसंग असा आहे – आयटक या तत्कालीन बलाढ्य कामगार संघटनेच्या सर्वोच्च ख्यातकीर्त नेत्याला भेटण्यासाठी मुंबईचा एक पत्रकार नागपूरच्या कार्यालयात वेळेआधी पोहोचला तर तिथे एक माणूस एका बाकावर शांतपणे झोपलेला होता. त्या झोपलेल्या इसमाची झोपमोड न करता तो पत्रकार ‘त्या’ कामगार नेत्याची वाट पाहात थांबला. काही वेळाने …

नव्वदीच्या उंबरठ्यावरचा आशावादी कॉम्रेड !

आत्ममग्न भासणा-या अजय भवनातील एका साध्या खोलीत भाई बर्धन यांची भेट झाली तो, त्यांचा वयाच्या ८८व्या वर्षाचा शेवटचा दिवस होता . चेहे-यावर वार्धक्याच्या खुणा सोडल्या तर १९८०च्या सुमारास पाहिलेली त्यांची ऐट आणि नागपूरच्या पत्रकार भवनात काय किंवा रस्त्यावर काय, मोर्चात मूठ वळवून घोषणा देणारी बर्धन यांची चिरपरिचित सळसळती देहबोली कायम …

या ‘जल जागल्या’ला बळ देऊ यात !

वर्ष सरता-सरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए.आय.एस. चीमा यांनी पाण्याच्या संदर्भात दिलेला निर्णय दूरगामी आहे. प्रकाशित झालेल्या बातम्यांप्रमाणे, कायदा आणि नियम गुंडाळून ठेवत सत्ताधुंदतेत मंजूर करण्यात आलेल्या राज्यातील १८९ सिंचन प्रकल्पांची चौकशी; एव्हढ्यापुरता हा आदेश मर्यादित नाही. राज्यातील पाण्याचा आराखडा तयार करण्यास बाध्य …

हेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही !

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रवास ‘नॅशनल हेरॉल्ड ते अरुण जेटली’ असा झालाय आणि या निमित्ताने अलिकडच्या काही वर्षात, राजकारणात स्वच्छ समजले जाणारे देशातील दोन प्रमुख नेते, कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ अरुण जेटली या दोघांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले आहेत. हेरॉल्ड प्रकरणात संसदेला …

हातचं राखून केलेलं आत्मकथन !

देशाचे ‘सर्वोत्तम पंतप्रधान न होऊ शकलेले शरद पवार’ यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने मिडिया गेला पंधरवडा घाईत होता. असायलाच हवा, कारण या उंचीचा आणि इतकं बहुपेडी व्यक्तिमत्व असलेला नेता महाराष्ट्राने गेल्या पन्नास वर्षात पहिलाच नाही. आमच्या पिढीची पत्रकारिता तर शरद पवार यांची राजकारण आणि शरद जोशी यांनी उभारलेल्या शेतकरी चळवळीच्या करिष्म्यावर फुलली, …

कॉंग्रेसचा स्वघातक कांगावा !

‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरण काही कारण नसताना संसदेत पोहोचवून संसदेचं कामकाज ठप्प करणं हा कॉंग्रेसचा शुद्ध स्वघातक कांगावा, सोनिया गांधी यांच्या आजवरच्या धवल प्रतिमेवर दाटून आलेलं सावट आणि राहुल गांधी यांचा पोरकटपणा आहे; याविषयी तारतम्य बाळगणाऱ्या कोणाही नागरिकाच्या मनात संशय नाही. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाकडे वस्तुस्थिती, नैतिकता आणि राजकीय कांगावा अशा तीन …

कोडग्या नोकरशाहीवर ‘चाबूक’ हाच उतारा !

– ‘मतदार संघात आणि इतरत्रही कामे होत नाहीत त्यामुळे राज्य सरकारच्या पापात वाटेकरी होऊन बदनाम व्हायचे नाही. म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला,’ – शिवसेनेचे कन्नड मतदार संघाचे विधानसभा सदस्य हर्षवर्धन जाधव. (महाराष्ट्र टाईम्स) – ‘दुष्काळ मदतीचा पैसा शेतकऱ्यांना मिळेचना’ – उद्धव ठाकरेंचा फडणवीस सरकारला घरचा आहेर (दिव्य मराठी) -‘CM plan to …

वसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा !

बालवाडी, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात मिळालेल्या ज्ञानाच्या कक्षा जगण्याच्या शाळेत व्यापक होतात, जगतानाच आकलनाच्या कक्षा विस्तारतात. जगण्याच्या शाळेतलं शिक्षण टोकदार, वास्तवदर्शी, सुसंस्कृतपण जोपासणारं, माणुसकीला उत्तेजन देणारं आणि बहुपेडी अनुभवांनी माणसाला समृद्ध करणारं असतं. जन्मल्यावर पहिल्या श्वासापासून हे जगण्याच्या शाळेतलं शिक्षण सुरु होतं आणि जगण्याचा शेवटचा श्वास घेईपर्यंत या शाळेत आपणच …

पुरे करा ही झोंबाझोंबी !

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला राज्याच्या सत्तेत येऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय. राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत कोणाही किमान सुसंस्कृत माणसाला लाज वाटेल अशी झोंबाझोंबी गेल्या वर्षभरात सुरु आहे. अर्थात अलिकडच्या काही दशकात राजकारणात सुसंस्कृत लोक फारच कमी उरलेले आहेत आणि सत्तेसाठी कमरेचं सोडून डोक्याला …

फडणवीसांचा रडीचा डाव !

नोकरशाही सहकार्य करत नाही, अशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे दुसऱ्यांदा केली आहे. ते मुख्यमंत्री झाल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यावर करण्यात आल्यानं ही तक्रार गांभीर्यानं घेणं भाग आहे. या तक्रारीचा एक अर्थ असा की, खुद्द मुख्यमंत्र्याचे ऐकत नाही म्हणजे अन्य मंत्र्यांचेही आदेश ही नोकरशाही पाळत नाही. दुसरं, नोकर मालकाचं …