उद्धव ठाकरें समोरची आव्हानं !

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या जिलेटिनच्या कांड्या प्रकरणातले  वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला नेमकी काय स्फोटक माहिती दिलेली आहे , याची तलवार टांगती असली तरी ज्येष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांचे बॉम्ब मात्र फुसके निघाल्यानं राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार आणि त्यातही मुख्यमंत्री …

मराठीसाठी इष्टापत्ती ठरलेली रावतेंची निराशा !

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना साक्षी ठेवत हृदयाला हात घालणारी भावनात्मक भाषा वापरुन आणि काहीशी झोंबरी टीका केल्यानंतर अखेर मराठी विद्यापीठ तसंच मराठी भाषा भवनासाठी मुंबईतील ऐन मोक्याचा , मरिन ड्राईव्हवरचा भूखंड देण्याचं सरकारनं जाहीर केलं आहे . उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या …

पश्चिम बंगालमधला मत संग्राम

■■ २०१९च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस आणि डाव्यांची मतं पुन्हा भाजपकडे वळली तर मग मात्र पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या चाव्या भाजपच्या  हाती असतील , अन्यथा ८० ते ९०  जागा भाजपा जिंकेल आणि सभागृहातला  प्रमुख विरोधी पक्ष असेल , असा अंदाज आहे . ■■ पश्चिम बंगाल विधानसभा  निवडणुकीचा प्रचार आता टिपेला …

देवेन्द्र फडणवीस – ‘सेल्फ आऊट’ सामनावीर !

या मजकुराचा सुरुवातीचा भाग वाचल्यावर वाचल्यावर राज्यातील सत्तारुढ महाघाडीचे आणि पुढचा मजकूर वाचल्यावर भाजप समर्थक नक्कीच नाराज होतील ; राज्यातल्या महाआघाडी आणि भाजपचे समाजमाध्यमांवरील समर्थक लगेच सरसावून ट्रोलिंग सुरु करतील . पण , जे खरं असेल ते  स्पष्टपणे सांगायला पत्रकारानं कधीच कचरायचं नसतं . म्हणून सांगतो , राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच …

माझ्या महिला सहकारी

■■■ कारण की… ‘माझ्या महिला सहकारी’ या विषयावर दैनिक ‘दिव्य मराठी’नं एक लेख जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मागितला . शब्द मर्यादा होती ७५० ते ८०० आणि माझा लेख झाला हजारावर शब्दांचा . साहजिकच प्रकाशनासाठी मजकूर कमी करावा लागला . ( मुद्रीत माध्यमांच्या ही मजबुरी समजून घ्यायला  मला त्रास होण्याचा प्रश्नच …

हवीतच कशाला वैधानिक विकास मंडळे ?

‘लोकसत्ता’तला एकेकाळचा सहकारी संतोष प्रधान याची वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भातली बातमी वाचण्यात आली . वैधानिक विकास मंडळाचं विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात झालेलं आंदोलन नंतर या मंडळांची स्थापना या सगळ्यांशी वार्ताहर म्हणून माझा फार जवळून संबंध आला . मराठवाड्यातून ज्येष्ठ नेते गोविंदभाई श्रॉफ तर विदर्भातून तत्कालीन खासदार एस .डब्ल्यू . धाबे …

सदा डुम्बरेचं नसणं…

|| नोंद …२४ || ( केवळ माहितीसाठी- सदाचं आडनाव डुम्बरे आहे , डुंबरे नाही ! ) ■■ सदा डुम्बरेच्या मृत्युच्या बातमीनी हृदयात कालवाकालव झाली… अलिकडच्या काही महिन्यात आमच्यात ‘ना कोई बात , ना कोई संदेश ’ असं काहीसं झालेलं होतं . खरं तर , गेल्या आठवड्यातच जी अजुगपणाची नोंद धनंजय गोवर्धने …

कलामांचं राष्ट्रपतीपद आणि थापाडे चंद्र्कांत पाटील !

कोल्हापूर शहराची ख्याती कलापूर म्हणून आहे . या शहरानं अनेक अभिजात गायक , प्रतिभावंत चित्रकार , अभिनेते देणारं . अखाड्याच्या लाल मातीत चितपट करणारे मल्ल देणारं म्हणून , अंबाबाईच्या देवळाचं गाव म्हणून या शहराची ख्याती आहे . ’कलानगरी’ अशी कोल्हापूरची महाराष्ट्राला ओळख आहे . कोल्हापूरच्या चपला अतिशय प्रसिद्ध आहेत पण …

धनंजय गोवर्धने आणि अंतर्धान पावलेला परीक्षित बीडकर !

 नोंद …२३ ज्येष्ठ चित्रकार , नासिकचा अलवार वृत्तीचा धनंजय गोवर्धने माझा जीवलग मित्र आहे . धनंजय  जन्मजात सहृदय आहे . धनंजय माझापेक्षा वयाने मोठा . कलावंत म्हणून त्याचा आवाका अतिशय व्यापक . त्याच्या सहृदयतेमुळेच गेल्या ४२ -४५ वर्षांचं आमचं हे मैत्र टिकून आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही . …

भंडारा अग्नीतांडवात नर्सेसचा बळी…

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्नितांडव प्रकरणी दोन नर्सेस म्हणजे परिचारिकांवर गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली आणि राजा    परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातलं ग . दि . माडगूळकर यांचं , आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या ‘उद्धवा अजब तुझे सरकार ‘ या गाण्याची आठवण झाली . या अग्नीकांडात आधी निरागस बालकांचा आणि आता आगीशी संबंध नसलेल्या २ नर्सेसचा बळी गेला आहे , असाच या …