निवडणुकीतले ‘पुस्तक बॉम्ब’

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असताना संजय बारू आणि पी.सी.पारख यांच्या ‘पुस्तक बॉम्ब’नी काँग्रेस पक्षाची चांगलीच पंचाईत झाली असून त्यामुळे या काँग्रेस नेत्यांची आगपाखडही जोरात सुरु आहे. खरे तर, आज ना उद्या हे वस्त्रहरण होणार होतेच हे ही आगपाखड करताना काँग्रेसजन विसरले आहेत. मनमोहनसिंग हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, एक सज्जन गृहस्थ …

जिना, जसवंतसिंह आणि जुने हिशेब…

‘पंत मेले आणि राव चढले’ असं सरळधोपटपणे राजकारणात कधीच होत नसतंम्हणूनच त्याला राजकारण म्हणतात. राजकारणात ‘दोन अधिक दोन’ ही बेरीज पूर्णपणे राजकारणाची तत्कालीन गरज म्हणून तसेच व्यक्तीसापेक्ष असते, तो हिशेब साडेतीन होऊ शकतो, चार होऊ शकतो, साडेचार होऊ शकतो… काहीही होऊ शकतो. म्हणूनच राजकारणात पंताला मरू द्यायचे नसते त्याचे केवळ …

नेतृत्व बदलाचीही निवडणूक !

१६व्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वात झालेला खांदेपालट. यात फरक इतकाच की काँग्रेसमधला नेतृत्वबदल परिस्थितीच्या रेट्याने हतबल झाल्याने तर भारतीय जनता पक्षातला नेतृत्वबदल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (की सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ?) सत्ताप्राप्तीच्या महत्वाकांक्षेमुळे होतो आहे . देशाच्या स्वांतत्र्य …

तिशीतल्या मतदारांचा दृष्टीकोन… पण, लक्षात कोण घेणार ?

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आता नजरेत आलेले आहे आणि त्यात दिल्लीच्या सातही जागा आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व टप्प्यातील उमेदवार जाहीर झाले आणि पहिल्या टप्प्यातले मतदान संपले आणि की दिल्लीतील राजकीय वर्दळ शांत होईल ती थेट मे महिन्याच्या १०-१२ तारखेपर्यंत. तोपर्यंत कोण सत्तेत येणार याचा साधारण अंदाज आलेला असेल आणि …

नरेंद्र मोदी आणि ‘डार्क हॉर्स’

लोकसभेच्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यातील उमेदवार सर्वच राजकीय पक्षांकडून जवळ-जवळ निश्चित झालेले आहेत. उमेदवारीसाठी सर्वात जास्त रस्सीखेच भारतीय जनता पक्षात झाली आणि दमछाकही याच पक्षाच्या श्रेष्ठींची झाली. ते स्वाभाविकही आहे कारण याच पक्षाच्या नेत्यात एकमेकावर कुरघोडी करण्याची स्पर्धा जास्त होती शिवाय याच पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ( एनडीएचे ) सरकार …

ममतांचा (तात्पुरता ?) मुखभंग!

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तापलेल्या सध्याच्या राजकीय वातावरणात पंतप्रधानपादासाठी इच्छुक अनेकजण आहेत . नरेंद्र मोदी , राहुल गांधी , मुलायमसिंग , जयललिता , मायावती आणि आता ममता बँनर्जी ! शिवाय सुप्त इच्छा बाळगणारे पी.चिदंबरम तसेच डार्क हॉर्स राजनाथसिंह आहेत , नाही नाही म्हणत अरविंद केजरीवाल आहेत , स्पर्धेतून बाहेर पडलेले शरद …

स्वतंत्र विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हवा एक केसीआर !

थंडी निरोप घेते आहे असे वातावरण निर्माण झालेले असताना अचानक वादळवारे सुटले, मुसळधार पाऊस झाला, गारपीट झाली… थंडी पुन्हा वाढली, काढून ठेवलेले स्वेटर्स, कोट दिल्लीकरांनी पुन्हा काढले त्या बदललेल्या वातावरणाच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि देशाच्या सत्तेची महानगरी असलेल्या दिल्लीला खाडकन राजकीय जाग आली कारण अद्याप कोणताही राजकीय पक्ष सर्व …

अगतिकता आणि अपरिहार्यताही…

(लोकमत’च्या १ मार्चच्या अंकात प्रकाशित स्तंभ) प्रत्यक्षात कौल मिळण्यासाठी अजून अवधी असला तरी निवडणूकपूर्व चाचण्या सध्या भारतीय जनता पक्षाला अनुकूल आहेत आणि लोकसभा निवडणुका अगदी हांकेच्या अंतरावर असल्याने दररोज नवनवीन राजकीय समीकरणे आकार घेत आहेत, अस्तिवात असलेली समीकरणे बिघडत आहेत, काही समीकरणे नव्याने जुळवली जात आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या आधी घडते …

असभ्य वर्तनरोग

(‘लोकमत’च्या २२ फेब्रुवारी २०१४च्या अंकात प्रकाशित स्तंभ) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तेलंगण राज्य निर्मितीच्या निमित्ताने सुरु असलेला अभूतपूर्व गोंधळ थांबता थांबत नाहीये. काही सदस्यांकडून इतके ओशाळवाणे, ओंगळवाणे आणि तिरस्करणीयही वर्तन संसदेत घडत आहे की त्याला तमाशा म्हणता येणार नाही कारण, त्यामुळे तमाशाला असणारे कलात्मक मूल्य कमी होईल. खरे तर या अराजकी …