अजित पवारांचा सर्जिकल स्ट्राईक

आम्हाला शिकवलेली राजकीय पत्रकार आणि भाष्यकारानं पाळावयाची पथ्ये- = राजकारणात दोन अधिक दोन चार असं कधीच नसतं आणि अंतिम ध्येय सत्ता संपादन असतं . त्यामुळे एखादी राजकीय घटना किंवा कृती पूर्ण होईपर्यंत भाष्य करु नये , भाकितं व्यक्त करु नयेत , भाविष्य वर्तवू नये तर फक्त बातमी द्यावी . = …

सत्तेच्या साठमारीत जनहित ही अफवा !

( वरील छायाचित्रात महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले  उपमुख्यमंत्री ) महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रंगमचावर जे कांही सुरु आहे त्यामुळे कांही लोक आनंदी आहेत तर कांही खंतावलेले आहेत ; कांहीना आसुरी आनंद झालाय तर कांही फारच तळमळले आहेत आणि प्रत्येकजण उतावीळपणानं त्याच्या परीने व्यक्त होतो आहे ; प्रकाश वृत्त वाहिन्यांच्या पिसाटलेपणामुळे बावचळून समाज माध्यमावर …

माझ्या (न बि)घडण्याची गोष्ट !

( दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’च्या  २०१९ च्या  दिवाळी  अंकात ,’आमच्या  घडण्याची गोष्ट’ या विषय विभागात प्रकाशित झालेला लेख . अक्षर लेखन- नयन बाराहाते  , नांदेड ) माझ्या घडण्याची गोष्ट सांगायची कशी ? आता मी वयाच्या पासष्टीत आहे पण , अजून  पत्रकार , लेखक आणि महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपली घडण …

जनमताचा अनादर करणारा पोरखेळ !

एक नोव्हेंबरला संध्याकाळी हा मजकूर लिहायला घेतला तेव्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १२ दिवस उलटून गेलेले आहेत आणि भाजप-सेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असलं तरी अजून सरकार मात्र स्थापन झालेलं नाही . सत्ता स्थापनेचा जो कांही खेळ रंगवला गेलेला आहे त्यापेक्षा लहान मुलं भातुकली गंभीरपणे खेळतात याचं भान …

जोर का धक्का धीरे से लगे…

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका जाहिरातीचा आधार घेत सांगायचं झाला तर राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अर्थ महायुतीला आणि त्यातही विशेषत: भाजपला ‘जोर का धक्का धीरे से लगे…’ असा आहे . जनतेनी पुन्हा सत्ता स्थापनेचा कौल तर दिलाय पण , भाजप आणि सेना या दोन्ही पक्षांच्या विधानसभेतील संख्याबळ लक्षणीय कमी करत …

वाढता असुसंस्कृतपणा … 

हा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल हांकेच्या अंतरावर आलेला असेल आणि त्याबद्दल मुद्रीत तसंच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतून निकालाची भाकितं व्यक्त झालेली असतील तेव्हा त्या तपशीलात जाण्यात कांहीच हंशील नाही . मात्र , माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांची पत्रकार परिषद पाहतांना त्यांचा सुसंस्कृतपणा पुन्हा अनुभवयाला मिळाला आणि कवी आरती प्रभू …

देर लगी आने में तुमको…

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि एक निर्विवाद लोकप्रिय नेते राज ठाकरे यांचं प्रचाराच्या  रणधुमाळीत धुमधडाक्यात आगमन झालं आहे . पहिल्याच सभेपासून राज ठाकरे नावाची मुलुखमैदानी तोफ गरजू लागली आहे . माध्यमांत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळू लागलेली आहे यात आश्चर्य ते कांहीच नाही …

पिसाटलेली पत्रकारिता !

माध्यमात आणि त्यातही विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स  माध्यमात लाईव्ह प्रसारणाचं आलेलं फॅड म्हणजे कोणतंही तारतम्य नसलेली , पिसाटलेली आणि अक्षरश: उबग आणणारी पत्रकारिता आहे . अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) न आलेल्या समन्सवरुन देशातील ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनी जो राजकीय इव्हेंट उभा केला त्यात माध्यमे आणि त्यातही विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या अलगद अडकल्यानं …

पवारांना अडचणीत आणणारा कॉम्रेड !

 || देशातील एक दिग्गज नेते शरद पवार यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारा माणूस एक कॉम्रेड आहे आणि ते लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जेवरी या गावचे रहिवासी आहेत . कॉम्रेड माणिक जाधव हे त्यांचे नाव . माणिक जाधव हे समाजवादी , पुरोगामी विचाराचे . ते  जनता दलाच्या चिन्हावर  …

शिकणारे विद्यार्थी आणि शिकवणारे शिक्षक कुठे गेले ?

( मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रस्तुत लेखकाने ‘मराठवाडा इथं कमी पडतो’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा संपादित अंश- ) ज्या विद्यापीठात आपण शिकलो , वावरलो त्याच विद्यापीठात प्रमुख पाहुणा म्हणून येणं हा मला फार मोठा सन्मान वाटतो . इथं येतांना मला आनंद झालेला आहे आणि …