‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष !

पक्क आठवतं, १९७३चा तो जानेवारी महिना होता. नेहेरु युवक केंद्राच्या आम्ही काहींनी औरंगाबाद ते पुणे आणि परत अशी सफर सायकलवरून केली. पुण्यात फिरत असतांना किर्लोस्कर प्रेसची पाटी दिसली आणि मी आत शिरलो. चौकशी करुन ह. मो. मराठे यांना गाठलं आणि त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर…’ या कादंबरीवर भडाभडा बोलायला सुरुवात केली. शिडशिडीत …

असा ‘साधू’ आता होणे नाही !

‘अरुण साधू आता आपल्यात नाहीत’ या सुदेश हिंगलासपूरकरनं पाठवलेल्या एसएमएसनं २५ सप्टेंबरची सकाळ उगवली. दिवसभरावर त्याच बातमीचं गडद मळभ दाटून राहिलं. नांदेडमधील कार्यक्रम त्याच मळभात कसेबसे आटोपून औरंगाबादच्या दिशेने प्रवास करतांना अरुण साधू आठवू लागले. मी काही अरुण साधू यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या सोबतही काम केलेलं नाही; त्यांच्या आणि माझ्या …

नारायण राणेंचं रुदन!

““ एकदा एक बिनशिडाचं तारु भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येकजण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण कि’नारा’ गाठणार यावर मात्र …

मराठवाडा तेव्हा… आणि आता तर राजकीय पोरका!

(आपला देश १५ ऑगस्ट १९४७ला स्वतंत्र झाला हे अंशत: खरं नाही कारण; निझामाच्या तावडीतून स्वतंत्र होऊन देशाचा एक भाग होण्यासाठी हैद्राबाद राज्य आणि त्याचा एक भाग असलेल्या मराठवाड्याला १७ सप्टेबर १९४८ पर्यंत वाट पहावी लागली. २०१७च्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं ठाण्याच्या मराठवाडा जन विकास परिषदेसाठी लिहिलेला हा प्रदीर्घ लेख. दोन …

विखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…

बंगळुरूच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची झालेली हत्त्या जेवढी मानवतेला काळीमा फासणारी आहे त्यापेक्षा जास्त काळीमा फासणारं वर्तन त्या हत्येनंतर बहुसंख्य भारतीय समाजाकडून घडलेलं आहे . गौरी यांच्या रक्ताचे डाग सुकण्याआधीच ज्या टोकाच्या विखारी आणि धर्मांध प्रतिक्रिया दोन्ही बाजुंनी उमटल्या आहेत ; त्यातून या समाजात सामुदायिक शहाणपण, सहिष्णुता …

दक्ष… बिग बॉस देख रहा है!

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक पक्षपाती असल्याची राज्य सरकारने घेतलेली भूमिका असंस्कृतपणाची, न्यायव्यवस्थेचा उपमर्द करण्याची तर आहेच शिवाय, त्यात उद्दामपणा ठासून भरलेला आहे; जॉर्ज ऑरवेलच्या 1984 मधला बिग​ब्रदर जसा प्रत्येकावर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी करडी नजर ठेऊन असतो (‘बिग बॉस देख रहा है…’) तसाच सरकारचा ‘हिटलरी’ इरादा स्पष्ट करणारी आहे; म्हणूनच ते …

गांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप!

जुलै २०१७ स्थळ- नर्मदेचा तीर, बडवानी (बरवानी), मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या प्रशासनानं बुडीत क्षेत्रात येत असल्याचं कारण देत २७ जुलैच्या मध्यरात्री कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी आणि त्यांचे खासगी सचिव महादेवभाई देसाई यांच्या समाधी जेसीबी यंत्राने उध्वस्त केल्या. महात्मा गांधी यांचा अस्थी कलश अज्ञात स्थळी नेऊन ठेवला. महात्मा गांधी हे भारताच्या …

लांच्छनास्पद भ्रष्टाचाराची लक्तरं…

महाराष्ट्राची बहुसंख्य नोकरशाही केवळ मुजोर, नाठाळ आणि असंवेदनशीलच नाही तर भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे; सरकारनं कररुपानं जनतेकडून जमा केलेल्या पैशावर ही बहुसंख्य नोकरशाही डल्ला मारत आहे, असं जे म्हटलं जातं त्यावर लातूरच्या घटनेनं शिक्कामोर्तब तर केलंच आणि त्यापुढे जाऊन भ्रष्टाचार करतांना या नोकरशाहीनं कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळून ठेवण्याची पातळी कशी गाठलेली …

मुख्यमंत्र्याच्या डोईजड झाली नोकरशाही!

गेल्या आठवड्यात विधानसभेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कथित गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेलं टीकास्र बोचरं असलं तरी योग्यच होतं. मेहता आणि मोपलवार यांना मुख्यमंत्री सरंक्षण देत असल्याची विरोधी पक्षांची प्रबळ भावना झाली असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची आजवरची स्वच्छ …

भाजपच्या गोटात : मु. पो. उत्तन !

घडलं ते असं- भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा फोन आला. उपाध्ये म्हणाले, ‘भाजपचे प्रवक्ते आणि विविध चर्चात सहभागी होणारे पक्षाचे प्रतिनिधी (पॅनेलिस्ट) यांचा एक अभ्यासवर्ग उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित केला आहे; त्यात तुम्ही एक एक्स्पर्ट म्हणून सहभागी व्हाल का ?’ मी विचारलं, ‘विषय काय आहे ?’ केशव …